Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, February 26
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»⭕ *शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी उभारलेली प्रतिकृती म्हणजे शेतकरी सन्मान शिल्प* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* ⭕ *लोकसभागातून साकारलेले शेतकरी शिल्प सौर* *प्रकल्पाचेही पालकमंत्रीचा हस्ते लोकार्पण*
धरणगाव

⭕ *शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी उभारलेली प्रतिकृती म्हणजे शेतकरी सन्मान शिल्प* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* ⭕ *लोकसभागातून साकारलेले शेतकरी शिल्प सौर* *प्रकल्पाचेही पालकमंत्रीचा हस्ते लोकार्पण*

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीSeptember 19, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*शेतकऱ्याच्या सन्मानासाठी उभारलेली प्रतिकृती म्हणजे शेतकरी सन्मान शिल्प – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

लोकसभागातून साकारलेले शेतकरी शिल्प, सौर प्रकल्पाचेही पालक मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

*धरणगाव/पाळधी प्रतिनिधी दि. 19 सप्टेंबर – “शेतकऱ्याचे हे शिल्प म्हणजे त्यांच्या श्रमांचा, घामाचा आणि त्यागाचा खरा गौरव आहे,” अशा शब्दांत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांचा सन्मान व्यक्त केला. लोकसभागातून जेसीबी खरेदी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही दिली आणि या जेसीबी चा उपयोग शेतकऱ्यांच्या हितासाठी व्हावा असे स्पष्ट केले. तसेच जिल्ह्यातील शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम अनेक ठिकाणी सुरु असून, जिल्हा “सौरयुक्त” करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोकसभागातून धरणगाव येथे महिला व पुरुष शेतकऱ्यांचे भव्य शिल्प उभारण्यात आले. या शेतकरी सन्मान शिल्पाचे तसेच सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार स्मिताताई वाघ होत्या.*

यावेळी खासदार स्मिताताई वाघ यांनी ऊर्जा बचतीचे महत्व पटवून सांगत, “प्रत्येकाने सौरचा वापर करावा, स्वदेशीचा जास्तीत जास्त अंगीकार करावा,” असे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सतत तत्परता ठेवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संचालक सुदाम पाटील यांनी केले तर आभार शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख गजानन पाटील यांनी मानले. हे शेतकरी सन्मान शिल्प जिल्ह्यात लोकसभागातून उभारले गेलेले पहिलेच कार्य असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले

*यांची होती उपस्थिती*
या वेळी खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील, डी. जी. नाना पाटील, उपजिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख शेखर अत्तरदे, रा. कॉ. तालुकाध्यक्ष श्याम पाटील, मार्केट कमिटीचे सभापती जिजाबराव पाटील, उपसभापती किरण पाटील, संचालक सुदाम पाटील, सुभाषअण्णा पाटील, ईश्वर पाटील, सुनील पवार, ज्ञानेश्वर महाजन, भगवान महाजन, संजय पवार, किशोर झंवर, नाटेश्वर पवार, शेतकी संघाचे अध्यक्ष गजानन पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, विनय भावे, विजय चौधरी, शिरीष बायास, महिला पदाधिकारी कल्पना अहिरे, रेखाताई चौधरी, पुनीलाल महाजन, रविंद्र चव्हाण सर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔥*धरणगाव तालुक्यात ठाकरे गटाला जोरदार धक्का..*🔥 *मा.सभापती यांचा पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश*

February 22, 2026

👁️*जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद* *1060 रुग्णांची नोंदणी; 510 रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया*👁️

February 16, 2026

💥*पाळधी बु व पाळधी खु* *ग्रामपंचायत हद्दीतील भटक्या कुत्र्यांच्या नागरिकांवर हल्ला*💥 ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार पुन्हा उघडीस *नागरिक व शालेय विद्यार्थी मध्ये भीतीचे वातावरण*

February 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.