Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Monday, February 23
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»⭕ *भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरीष्ठ महाविद्यालय पाळधी येथे स्वच्छता हीच सेवा – २०२५ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा* …. *अध्यक्ष स्थानी मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व संस्था अध्यक्ष विक्रम पाटील*⭕
धरणगाव

⭕ *भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरीष्ठ महाविद्यालय पाळधी येथे स्वच्छता हीच सेवा – २०२५ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा* …. *अध्यक्ष स्थानी मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व संस्था अध्यक्ष विक्रम पाटील*⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीSeptember 24, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय पाळधी येथे स्वच्छता हीच सेवा -२०२५ मोहीमेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा…!*
भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन शिबिरामध्ये व्याख्यान सत्र व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा विभागीय समन्वयक, जळगाव प्रा. डॉ. दिनेश पाटील, संस्था अध्यक्ष मा‌. श्री. विक्रमराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. प्रतापराव पाटील, संस्था समन्वयक, व भाऊसो गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. दत्तात्रय कंखरे, मा‌. प्राचार्य प्रा. अजिंक्य जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेकांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम ज्यामध्ये वकृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते. तद्नंतर कार्यक्रमाचे मुख्य वक्ते व मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. दिनेश पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांना संबोधित करत अनमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोपा पूर्वी अध्यक्षीय भाषणात मा. श्री. प्रतापराव पाटील यांनी महाविद्यालयातील सर्व स्वयंसेवकांना व विद्यार्थ्यांना संबोधित करत स्फूर्ती प्रेरणा दिली. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. से. यो. स्वंयसेवीका सुजाता पाटील व दिव्या पाटील यांनी संयुक्तरीत्या केले. तर प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय बाविस्कर यांनी केले‌. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. संजय बाविस्कर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी श्रावणे व सर्व प्राध्यापक वृंदांने अमुल्य असे सहकार्य केले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षककेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरिल कार्यक्रमाचे मंत्री महोदय मा. श्री.गुलाबरावजी पाटील साहेब (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा) यांच्याद्वारे कौतुक केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔥*धरणगाव तालुक्यात ठाकरे गटाला जोरदार धक्का..*🔥 *मा.सभापती यांचा पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश*

February 22, 2026

👁️*जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद* *1060 रुग्णांची नोंदणी; 510 रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया*👁️

February 16, 2026

💥*पाळधी बु व पाळधी खु* *ग्रामपंचायत हद्दीतील भटक्या कुत्र्यांच्या नागरिकांवर हल्ला*💥 ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार पुन्हा उघडीस *नागरिक व शालेय विद्यार्थी मध्ये भीतीचे वातावरण*

February 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.