Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, February 26
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *हातपंप व विजपंप* *देखभाल कर्मचाऱ्यांना पगार व पेन्शन दिवाळीपूर्वी होणार*.. *पाणीपुरवठा व स्वछतामंत्री गुलाबराव पाटील यांची वचनपूर्ती* ⭕
जळगाव जिल्हा

⭕ *हातपंप व विजपंप* *देखभाल कर्मचाऱ्यांना पगार व पेन्शन दिवाळीपूर्वी होणार*.. *पाणीपुरवठा व स्वछतामंत्री गुलाबराव पाटील यांची वचनपूर्ती* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीOctober 8, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*हातपंप व विजपंप देखभाल कर्मचाऱ्यांचा पगार व पेन्शन दिवाळीपूर्वी होणार !*
पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांची वचनपुर्ती

*जळगाव प्रतिनिधी दि. 07 ऑक्टोबर – ग्राम विकास व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय दि. 31.03.1978 व दि. 30.07.1981 नुसार हातपंप /विद्युतपंप देखभाल व दुरुस्ती योजनेची प्रशासकीय यंत्रणा ठरवुन जिल्हा परिषदेला कनिष्ठ अभियंता (यां) , हातपंप यांत्रिकी, विजतंत्री, मदतनीस या सवंर्गातील पदे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर मंजुर करुन ती भरण्यात येवून त्यांचे वेतन व भत्त्याचा खर्च जिल्हा परिषदेतील देखभाल व दुरुस्ती निधीतुन / ग्रा.प.कडील प्राप्त वसुलीतुन भागविण्यात येत होता. परंतु जिल्हा परिषदेच्या अत्यल्प उत्पन्नातुन सदरील कर्मचा-यांचा वेतन व भत्त्यांचा खर्च भागविण्यास आर्थिक अडचण निर्माण होत होती. त्यामुळे हातपंप /विजपंप देखभाल व दुरुस्ती कर्मचा-यांना हलाकीचे जीवन जगावे लागत होते. 40 वर्षापासुन प्रलंबित असलेला प्रश्न पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अथक प्रयत्नातुन जिल्हा परिषद अंतर्गत राज्यातील हातपंप/विजपंप देखभाल व दुरुस्ती करीता कार्यरत नियमित कर्मचा-यांच्या व नियमित पदावरुन सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या वेतन, व सेवानिवृत्ती वेतन व भत्त्यांचे दायीत्वाबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे, ५ जुलै २०२४ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या कर्मचाऱ्यांच्या तसेच नियमित पदांवरून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन व पेन्शनचे दायित्व शासनाने स्वीकारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.*

त्या अनुषंगाने एकुण 1074 हातपंप/विजपंप यंत्रणेतील कर्मचा-यांचे वेतन व सेवानिवृत्ती वेतनाचे दायीत्व शासनाने दिनांक 09 ऑगस्ट 2024 पासुन स्विकारलेले असून प्रथम टप्प्यात शासन निर्णय दिनांक 4 जुन 2025 अन्वये एकुण 32 जिल्हा परिषदेकरीता माहे मार्च ते मे-2025 पर्यतचा एकुण 920.30 लक्ष निधी वितरीत करण्यात आलेला होता. आता नुकतेच निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय दिनांक 7 ऑक्टोंबर 2025 अन्वये 1011.59 लक्ष निधी जिल्हा परिषदांना वितरीत करण्यात आलेला असून ठाणे, पालघर, रत्नागिरी, कोल्हापुर ,जालना, अमरावती जिल्ह्यांनाही लवकरच निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

*पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा कोट*
“ग्रामीण भागातील पाणीपुरवठा टिकवण्यासाठी हातपंप आणि विजपंप कर्मचारी अहोरात्र मेहनत घेतात. अनेक वर्षांपासून ते आर्थिक अडचणीत होते. शासनाने त्यांचा प्रश्न सोडवून दिला आहे.
दिवाळीपूर्वी प्रत्येक कर्मचाऱ्याला पगार व पेन्शन मिळेल; त्यांची दिवाळी आता खऱ्या अर्थाने प्रकाशमय होणार आहे.”
*पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील*

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार*🔶 एरंडोल येथे आदिवासी विकास प्रकल्पाचे उपकार्यालय सुरू होण्यास राज्यस्तरीय बैठकीत मान्यता

February 22, 2026

💥*एकजुटीतूनच खरा विकास; बोरनारला विकासकामांची भेट*💥 *ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या निर्णयशक्तीचे केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह, भक्तनिवास व हॉलचे लोकार्पण

February 21, 2026

🔥*“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !”* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* 🔥 जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन

February 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.