Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, February 26
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *बचत गटाच्या महिलांनो मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* *नशिराबाद येथे महिलांसाठी बहिणाबाई मार्ट उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला 13 विविध व्यवसायिकांची दुकाने सुरू केली आहेत* ⭕
जळगाव जिल्हा

⭕ *बचत गटाच्या महिलांनो मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* *नशिराबाद येथे महिलांसाठी बहिणाबाई मार्ट उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला 13 विविध व्यवसायिकांची दुकाने सुरू केली आहेत* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीOctober 17, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*“बचत गटाच्या महिलांनो, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

*नशिराबाद/ जळगाव प्रतिनीधी दि. 17 ऑक्टोंबर – बचत गटातील प्रत्येक महिला काटकसरी आहे. बचतीचे महत्त्व या महिलांना उत्तमरीत्या समजले आहे. आज या महिला केवळ गृहिणी राहिलेल्या नाहीत, तर उद्योगव्यवसाय क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा दीप प्रज्वलित करत आहेत. उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.*

नशिराबाद येथे महिलांसाठी ‘बहिणाबाई मार्ट’ उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याचे काम सुरू झाले आहे. हे कॉम्प्लेक्स पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी स्थायी व्यवसाय केंद्र तयार होणार आहे. महिलांना आपल्या उत्पादनांची विक्री स्थानिक बाजारपेठेत करण्याची संधी मिळणे म्हणजे ग्रामीण महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी नशिराबाद व परिसरातील महिला बचत गटांच्या लघुउद्योजिकांसाठी उभारण्यात आलेल्या महिला बचत गट मॉलचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या मॉलमध्ये महिलांनी साडी, लेडीज गारमेंट्स, बांगड्या, ब्युटी पार्लर साहित्य, जनरल स्टोअर, फरसाण, स्वीट्स, चाट सेंटर, भाजीपाला विक्री आदी १३ विविध व्यवसायांची दुकाने सुरू केली आहेत. काही दुकाने स्वतःच्या मालकीची असून काही महिलांनी ती भाड्याने घेतली आहेत. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेला हा मॉल हा केवळ व्यवसाय नव्हे, तर महिलांच्या स्वप्नांचा उत्सव ठरला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमांगी टोकेकर यांनी केले, प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक रवींद्र सूर्यवंशी यांनी केले, तर स्वाती सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, गटविकास अधिकारी सरला पाटील, जिल्हा व्यवस्थापक एच. एम. भोई, हायस्कूल चेअरमन पिंटू शेठ पाटील, शहर प्रमुख विकास धनगर, संचालक चंदू भोळे, युवा सेनेचे चेतन बऱ्हाटे, दीपक खाचणे, तसेच महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा प्रमिला सपकाळे, ग्रामसंघ अध्यक्षा सोनल टापरे, सुनिता शिवरामे यांसह नशिराबाद व परिसरातील मोठ्या संख्येने महिला बचत गट सदस्य उपस्थित होत्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार*🔶 एरंडोल येथे आदिवासी विकास प्रकल्पाचे उपकार्यालय सुरू होण्यास राज्यस्तरीय बैठकीत मान्यता

February 22, 2026

💥*एकजुटीतूनच खरा विकास; बोरनारला विकासकामांची भेट*💥 *ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या निर्णयशक्तीचे केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह, भक्तनिवास व हॉलचे लोकार्पण

February 21, 2026

🔥*“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !”* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* 🔥 जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन

February 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.