Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, February 26
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *संबंधाच्या उजेडात झळकलेले* *दीप समाजसेवेतुन दिवाळीचा* *आत्मिक आनंद अनुभवणारे* *ना.गुलाबरावजी पाटील* ⭕ *मंत्री गुलाबराव* *पाटील ,प्रतापराव पाटील व* *विक्रम पाटील यांच्या* *उपस्थितीने दीपावली स्नेह* *मिलन सोहळा उत्साहात पार* *जी. पी.एस मित्र परिवाराचा आगळावेगळा उपक्रम संपन्न* ⭕
जळगाव जिल्हा

⭕ *संबंधाच्या उजेडात झळकलेले* *दीप समाजसेवेतुन दिवाळीचा* *आत्मिक आनंद अनुभवणारे* *ना.गुलाबरावजी पाटील* ⭕ *मंत्री गुलाबराव* *पाटील ,प्रतापराव पाटील व* *विक्रम पाटील यांच्या* *उपस्थितीने दीपावली स्नेह* *मिलन सोहळा उत्साहात पार* *जी. पी.एस मित्र परिवाराचा आगळावेगळा उपक्रम संपन्न* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीOctober 24, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*“संबंधांच्या उजेडात झळकलेले दीप – समाजसेवेतून दिवाळीचा आत्मिक आनंद अनुभवणारे ना. गुलाबराव पाटील”*

पालकमंत्र्यांच्या प्रेरणेतून पाळधीत जी.पी.एस. मित्र परिवाराचा आगळावेगळा उपक्रम

मंत्री गुलाबराव पाटील, प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या उपस्थितीने “दिपावली स्नेह मिलन सोहळा” उत्साहात पार

*पाळधी / जळगाव प्रतिनिधी दि. २२ ऑक्टोंबर – “दिवाळीचा खरा आनंद एकत्र येण्यात आहे. माझे कार्यकर्ते, मित्र आणि गावकरी हेच माझं मोठं कुटुंब आहे. त्यांच्या सोबत बसून फराळ करणे म्हणजे माझ्यासाठी सर्वात मोठा उत्सव आहे. राजकारणातले संबंध नव्हे, तर मनाचे नातेच माणसाला श्रीमंत बनवतात. असे भावनिक उद्गार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संवाद साधताना काढले. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसोबत बसून फराळाचा आनंद घेतला, जुन्या मित्रांशी संवाद साधत हशा आणि जुन्या आठवणींनी भारलेले वातावरण निर्माण केले.पालकमंत्री गुलाबराव पाटील व प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या उपस्थितीने स्नेहसोहळा भावनिक आणि आत्मीयतेच्या रंगाने खुलला.*

दिवाळीचा सण म्हणजे प्रकाश, आनंद आणि ऐक्याचा उत्सव. पण या वर्षी पाळधी गावात दिवाळीचा हा सण एका वेगळ्याच अर्थाने उजळला- कारण इथे दिवे फक्त घरांतच नाही, तर मनांतही पेटले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली जी.पी.एस. मित्र परिवार तर्फे समाजसेवेचा अनोखा उपक्रम आणि *“दिपावली स्नेह मिलन सोहळा”* उत्साहात पार पडला.

*जि.प. चे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांचा समाजसेवेचा उपक्रम*

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जि.प. चे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांनी आपल्या पारंपरिक समाजसेवेचा एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला.जी.पी.एस. मित्र परिवार तर्फे त्यांनी गावातील निराधार, वयोवृद्ध आणि गरजू नागरिकांच्या घरी जाऊन फटाके, फराळ, मिठाई आणि आवश्यक वस्तूंचे वाटप केले. या उपक्रमामुळे ज्यांच्या आयुष्यात दिव्यांचा उजेड कमी आहे, त्या घरांपर्यंत आनंदाचा प्रकाश पोहोचवण्यात आला.

*या वेळी जि.प. चे माजी सदस्य प्रतापराव पाटील म्हणाले की, “दिवाळी म्हणजे केवळ आपल्या घराचा आनंद नव्हे; समाजातील प्रत्येक घर उजळवणे हेच खरी दिवाळी आहे. निराधारांच्या चेहऱ्यावर हसू आणणे – हेच सणाचं खरं समाधान आहे.”गावातील नागरिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “ही दिवाळी केवळ प्रकाशाची नव्हे, तर प्रेम, स्नेह आणि संवेदनशीलतेच्या नात्यांची दिवाळी ठरली.”*

*दिपावली स्नेह मिलन सोहळा” – स्नेह, ऐक्य आणि आठवणींचा उज्ज्वल संगम*

दिवाळी व पाडव्याच्या शुभसंधीवर शासकीय विश्रामगृह, पाळधी येथे आयोजित “दिपावली स्नेह मिलन सोहळ्याला” पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, आणि युवा उद्योजक विक्रम पाटील (विकी बाबा) तसेच जिल्हाभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीने विशेष तेज लाभले.

शिवसेना व युवासेना पाळधी शहर, प्रतापराव पाटील मित्र परिवार, आणि विकी बाबा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा उत्कृष्ट आयोजनात पार पडला. संध्याकाळी चार ते रात्री आठ या काळात झालेल्या कार्यक्रमात पाळधी व परिसरातील नागरिक, सामाजिक व राजकीय मान्यवर, अधिकारीवर्ग आणि तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार*🔶 एरंडोल येथे आदिवासी विकास प्रकल्पाचे उपकार्यालय सुरू होण्यास राज्यस्तरीय बैठकीत मान्यता

February 22, 2026

💥*एकजुटीतूनच खरा विकास; बोरनारला विकासकामांची भेट*💥 *ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या निर्णयशक्तीचे केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह, भक्तनिवास व हॉलचे लोकार्पण

February 21, 2026

🔥*“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !”* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* 🔥 जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन

February 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.