Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, February 26
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *जळगाव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंगची लाट* *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश* ⭕
जळगाव जिल्हा

⭕ *जळगाव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंगची लाट* *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीNovember 13, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*जळगाव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंगची लाट !*

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत उभाठा व राष्ट्रवादी काँग्रेस गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

*जळगाव, दि. १२ नोव्हेंबर (प्रतिनिधी) : – “संघटन हेच आपले सर्वात मोठं शस्त्र आहे. सत्ता ही आपलं ध्येय नाही; लोकांचा विश्वास जिंकणं हेच आपलं खरं बळ आहे. शहरासाठी, विकासासाठी आणि भविष्यासाठी ही एकजूट निर्णायक ठरणार आहे. जुने-नवे सर्व कार्यकर्ते एकत्र राहून, नियोजनबद्ध पद्धतीने काम करा आणि युतीचा भगवा जळगाव महानगरपालिकेवर फडकवा असे आवाहन शिवसेनेचे राज्याचे जेष्ठ नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, यांनी केले.*

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यपद्धतीवर आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास – यामुळे आज जळगाव शहरात शिवसेनेत इनकमिंगची प्रचंड लाट उसळली. जिल्हाप्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या निवासस्थानी असलेल्या शिवसेना कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उभाठा परिसरातील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील असंख्य कार्यकर्त्यांनी “जय महाराष्ट्र!” घोषणांमध्ये शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला.

*उभाठा व राष्ट्रवादी गटातून शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश*
या प्रवेश सोहळ्यात उभाठा परिसरातील माजी नगरसेवक अण्णासाहेब भापसे, चंद्रकांत भापसे, विशाल राठोड, जगन गिरमळकर, दाऊदी सोनवणे, संगीता भारंबे, कविता परदेशी, अनिता भापसे, सुनील भापसे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा पंचशीलाताई सूर्यवंशी, स्मिताताई कांबळे, हर्षवर्धन सूर्यवंशी, विनोद सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनीही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.

*“हा प्रवेश म्हणजे विकासाची पावती” – विष्णू भंगाळे*
जिल्हाप्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे म्हणाले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव महानगरपालिकेसाठी ऐतिहासिक निधी उपलब्ध करून दिला आहे. DPDC योजनेतून रस्ते, गटारी आणि इतर मूलभूत कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्यामुळे शहरात विकासाची नवी दिशा निर्माण झाली आहे. हा प्रवेश केवळ राजकीय नाही, तर विकासाच्या कार्याची पावती असल्याचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख विष्णुभाऊ भंगाळे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला आघाडीच्या सरिता ताई कोल्हे-माळी यांनी केले. तर आभार महानगर प्रमुख कुंदन काळे आणि गणेश सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या ठिकाणी उत्साही घोषणा, भगवे झेंडे आणि शिवसेना जयजयकारांनी परिसर दुमदुमून गेला. यावेळी महिला आघाडी संपर्क प्रमुख सरिता ताई कोल्हे-माळी, माजी नगरसेवक व महानगर प्रमुख कुंदन काळे, गणेश सोनवणे, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवसेना जिल्हा प्रमुख रोहित कोगटा, माजी नगरसेवक दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, हर्षल मावळे, चेतन सनकत, बाळासाहेब चव्हाण, आशुतोष पाटील, अमोल मोरे, सचिन पाटील तसेच विविध पदाधिकारी आणि शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार*🔶 एरंडोल येथे आदिवासी विकास प्रकल्पाचे उपकार्यालय सुरू होण्यास राज्यस्तरीय बैठकीत मान्यता

February 22, 2026

💥*एकजुटीतूनच खरा विकास; बोरनारला विकासकामांची भेट*💥 *ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या निर्णयशक्तीचे केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह, भक्तनिवास व हॉलचे लोकार्पण

February 21, 2026

🔥*“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !”* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* 🔥 जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन

February 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.