Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Wednesday, February 25
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»*ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील* श्यामखेडा, भोणे, बिलखेडा व जांभोरे येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न !
जळगाव जिल्हा

*ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील* श्यामखेडा, भोणे, बिलखेडा व जांभोरे येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न !

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीJanuary 18, 2026No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

श्यामखेडा, भोणे, बिलखेडा व जांभोरे येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न !

*पाळधी / धरणगाव / जळगाव, दि. १७ जानेवारी – ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या पायाभूत सुविधा, मूलभूत गरजांना प्राधान्य आणि सर्वसामान्यांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणारा विकास हाच आपल्या कामाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील विविध गावांत कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी केले.*

ते पुढे म्हणाले की, “गावाचा सर्वांगीण विकास झाल्यावरच गावाची खरी ओळख निर्माण होते. ही ओळख भक्कम करण्यासाठी निधीची कधीही कमतरता भासू दिली नाही. ग्रामपंचायत कार्यालय, चांगले रस्ते, स्मशानभूमी, शैक्षणिक परिसर सुशोभीकरण, मंदिर परिसर विकास या सर्व सुविधा तळागाळात पोहोचवण्यावर आमचा नेहमीच भर आहे. ‘गाव तिथे स्मशानभूमी’ हा उपक्रम आता संपूर्ण जिल्ह्यात राबवला जात आहे. जनसुविधा योजनांतर्गत जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून, सर्वसामान्य माणसाचे जीवन सुकर करणे हाच आमचा खरा उद्देश आहे,” असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठामपणे सांगितले.

धरणगाव तालुक्यातील श्यामखेडा, भोणे, बिलखेडा व जांभोरे या भागांत विविध विकासकामांचे भूमिपूजन व काही ठिकाणी लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. एकूण सुमारे ८ कोटी रुपयांच्या विकासकामांना सुरुवात झाली असून अनेक कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

*या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण*
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत विवरे – जांभोरे–सार्वे खुर्द ते बिलखेडा या १०.५० किमी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण; यात २७ ठिकाणी पाईप व काँक्रीट मोऱ्या तसेच ४१० मीटरचे काँक्रीटीकरण होणार आहे (६ कोटी ५२ लक्ष), धरणगाव ते सार्वे या १ किमी शेतरस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण (४९ लक्ष), श्यामखेडा येथे अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, शाळा परिसर सुशोभीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसवणे (१० लक्ष), बिलखेडा येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम (२० लक्ष), भोणे येथे स्मशानभूमी पोहोच रस्ता, लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात काँक्रीटीकरण व सभागृह बांधकाम (१ कोटी) या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
तर आमदार निधीतून जांभोरे येथे दोन प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण (२० लक्ष), बिलखेडा येथे महानुभव गल्लीतील रस्त्याचे काँक्रीटीकरण व सांत्वन शेड बांधकाम (२१ लक्ष), भोणे येथे स्मशानभूमी पोहोच रस्ता या कामांचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते तथा जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील यांनी केले, तर आभार माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी मानले. यावेळी प्रत्येक गावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे महिलांनी औक्षण करून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. सुरुवातीला एकलव्यांच्या स्मारकाला माल्या अर्पण करण्यात आले.

*यांची होती प्रमुख उपस्थिती*
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी पं. स. सभापती अनिल पाटील, प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, सचिन पाटील, शिवसेना महानगरप्रमुख संतोष पाटील, शहरप्रमुख विलास महाजन, गटविकास अधिकारी के. व्ही. वानखेडे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता जितेंद्र सोनवणे, शाखा अभियंता विशाल पाटील, पोलीस निरीक्षक एस. एच. पवार, पप्पू भावे, मंगलअण्णा पाटील, नाटेश्वर पवार, शेतकी संघ अध्यक्ष गजानन पाटील, मार्केटचे माजी सभापती प्रेमराज पाटील, प्रमोद पाटील, समाधान पाटील, सरपंच संगीता पाटील, अनिता गुजर, चंद्रकांत भदाणे, तसेच संबंधित गावांचे सर्व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे सदस्य तसेच शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख भैया मराठे, तालुकाप्रमुख दीपक भदाणे, नितीन पाटील, विभाग प्रमुख गणेश भिंगारे व शिवसेना युवा सेना पदाधिकारी यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार*🔶 एरंडोल येथे आदिवासी विकास प्रकल्पाचे उपकार्यालय सुरू होण्यास राज्यस्तरीय बैठकीत मान्यता

February 22, 2026

💥*एकजुटीतूनच खरा विकास; बोरनारला विकासकामांची भेट*💥 *ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या निर्णयशक्तीचे केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह, भक्तनिवास व हॉलचे लोकार्पण

February 21, 2026

🔥*“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !”* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* 🔥 जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन

February 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.