Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Wednesday, February 25
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»नेत्र तपासणी ॲम्बुलन्स सर्वसामान्यांसाठी ‘मायेची दृष्टी’ ठरणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील* बाळासाहेबांच्या जयंतीदिनी ‘दृष्टीदान’चा संकल्प : दोन वर्षांत ३३ शिबिरांतून १०,९४० रुग्णांना नवी दृष्टी
जळगाव जिल्हा

नेत्र तपासणी ॲम्बुलन्स सर्वसामान्यांसाठी ‘मायेची दृष्टी’ ठरणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील* बाळासाहेबांच्या जयंतीदिनी ‘दृष्टीदान’चा संकल्प : दोन वर्षांत ३३ शिबिरांतून १०,९४० रुग्णांना नवी दृष्टी

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीJanuary 23, 2026No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*नेत्र तपासणी ॲम्बुलन्स सर्वसामान्यांसाठी ‘मायेची दृष्टी’ ठरणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी ‘दृष्टीदान’चा संकल्प : दोन वर्षांत ३३ शिबिरांतून १०,९४० रुग्णांना नवी दृष्टी

*पाळधी / जळगाव प्रतिनिधी – सेवा हेच शिवसेनेचे खरे व्रत आहे. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचलीच पाहिजे, हेच बाळासाहेबांचे स्वप्न होते. आज या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सच्या माध्यमातून गरिबांच्या दारात आरोग्य पोहोचत आहे. हीच बाळासाहेबांना खरी मानवंदना आहे. जोपर्यंत समाजातील शेवटचा माणूस सुखरूप होत नाही, तोपर्यंत ही सेवा अखंड सुरू राहणार असून लवकर शिवसृष्टी उभारण्याचा मानस पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.*

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर समाजसेवेचा संकल्प अधिक दृढ करत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जीपीएस मित्र परिवाराच्या अत्याधुनिक नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले.या प्रसंगी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली “जनतेचे विश्वासू आरोग्यदूत” म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जीपीएस ग्रुपने आतापर्यंत
👉 ३३ मोफत नेत्र तपासणी शिबिरे,
👉 २९,२६० रुग्णांची तपासणी,
👉 १०,९४० मोतिबिंदू शस्त्रक्रिया
यशस्वीरीत्या पार पाडत हजारो कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाश पेरला आहे. उपस्थितांनी “पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आमच्यासाठी खरे अर्थाने ‘दृष्टीदाता’ आहेत,” अशा भावना व्यक्त केल्या.

आतापर्यंत रुग्णांना तपासणीसाठी पाळधी येथे यावे लागत होते. मात्र ग्रामीण भागातील वृद्ध व गरजू रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन आता ही अत्याधुनिक ॲम्बुलन्स थेट गावोगावी जाऊन तपासणी करणार आहे. तपासणी नंतर आवश्यक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुढील उपचारासाठी पाठवले जाणार असून, ही ॲम्बुलन्स सर्वसामान्यांसाठी खऱ्या अर्थाने *‘मायेची दृष्टी’* ठरणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी परिसर “बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद”, “जय भवानी, जय शिवराय” अशा घोषणांनी दुमदुमून गेला.

*विकासकामांना वेग – गावागावात प्रगतीचा धडाका*
पोखरी, पोखरी तांडा, पाळधी बु. व पाळधी खु. येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन लवकर आपण झाले यात
पोखरी–वराड रस्त्याचे डांबरीकरण, गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मराठी व उर्दू शाळांसाठी नव्या खोल्या बांधकाम, पाळधी खुर्द येथे संविधान भवन, ठीक ठिकाणी ब्लॉक बसविणे, अल्पसंख्याक समाजासाठी शादीखाना हॉल, एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण
अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कामांमुळे परिसराच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी जीपीएस ग्रुपमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. जनतेच्या विश्वासामुळेच हे सेवायज्ञ अखंड सुरू आहे,” असे ते म्हणाले. जीपीएस ग्रुपचे सदस्य प्रशांत झंवर यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. आभार GPS स्कूल कॅम्पचे चेअरमन विक्रम पाटील यांनी मानले.

*प्रमुख उपस्थिती*
पाळधी बु. सरपंच विजय पाटील, पाळधी खु. सरपंच लक्ष्मीबाई शरद कोळी, उद्योजक शरद कासट, दिलीप बापू पाटील, उपसरपंच निसार शेख, शमिना शरीफ देशपांडे, तालुका प्रमुख डी.ओ.पाटील, शिवराज पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, सचिन पवार माजी जि.प. सदस्य गोपाळ चौधरी, पवन सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, भाजपचे माजी जि.प. उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील,
माजी जि.प. सदस्य सौ. माधुरीताई अत्तरदे, भाजप तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, किशोर झंवर, जिजाबराव पाटील, तालुका सरचिटणीस माधव पाटील, निर्दोष पवार, शिवसेना तालुका संघटक रवींद्र चव्हाण, चिंचपुरा सरपंच कैलास पाटील, माजी कृ.उ.बा. उपसभापती संजय पवार, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, सभापती विकास पाटील, नातेश्वर पवार, कृ.उ.बा. समिती सभापती प्रेमराज पाटील, नंदलाल पाटील, जनाआप्पा कोळी, शेतकी संघ सभापती गजानन पाटील, माजी पंचायत समिती सभापती अनिल पाटील व राजू पाटील, यांच्यासह धरणगाव नगरसेवक, शिवसेना, युवासेना, जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार*🔶 एरंडोल येथे आदिवासी विकास प्रकल्पाचे उपकार्यालय सुरू होण्यास राज्यस्तरीय बैठकीत मान्यता

February 22, 2026

💥*एकजुटीतूनच खरा विकास; बोरनारला विकासकामांची भेट*💥 *ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या निर्णयशक्तीचे केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह, भक्तनिवास व हॉलचे लोकार्पण

February 21, 2026

🔥*“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !”* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* 🔥 जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन

February 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.