Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, February 22
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»ताज्या बातम्या»⭕*जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील* ⭕ बिलखेडा येथे 33/11 केव्ही नवीन उपकेंद्राचे भूमीपूजन ; AIIB योजनेतून जळगाव ग्रामीणला 32 कोटींची वीज बळकटीकरणाची गती
ताज्या बातम्या

⭕*जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील* ⭕ बिलखेडा येथे 33/11 केव्ही नवीन उपकेंद्राचे भूमीपूजन ; AIIB योजनेतून जळगाव ग्रामीणला 32 कोटींची वीज बळकटीकरणाची गती

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीFebruary 13, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

बिलखेडा येथे 33/11 केव्ही नवीन उपकेंद्राचे भूमीपूजन ; AIIB योजनेतून जळगाव ग्रामीणला 32 कोटींची वीज बळकटीकरणाची गती

*पाळधी/धरणगाव प्रतिनिधी | दि. 13 फेब्रुवारी – मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी व ग्रामीण भागातील वीज पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जळगाव ग्रामीण मतदारसंघात विकासाची गती कायम ठेवून नागरिकांना दर्जेदार सुविधा देणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव तालुक्यातील बिलखेडा येथे 33/11 केव्ही क्षमतेच्या नवीन वीज उपकेंद्राच्या भूमीपूजन प्रसंगी बोलत होते.*

शासनाच्या Asian Infrastructure Investment Bank (AIIB) योजनेअंतर्गत जळगाव ग्रामीण मतदारसंघातील वीज वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी सुमारे रु. 32 कोटींच्या उपकेंद्र, ट्रान्सफॉर्मर व वीज वाहिन्यांच्या कामांना मंजुरी मिळाल्याने ग्रामीण भागातील वीज पुरवठ्यास मोठा आधार मिळणार आहे. यामुळे शेती, लघुउद्योग तसेच घरगुती ग्राहकांना अखंड व सुरळीत वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

*जळगाव ग्रामीण मतदारसंघातील मंजूर कामे*
रु. 8.17 कोटी खर्चातून शिरसोली, भोणे-बिलखेडे, जळगाव खुर्द व टाकरखेडा येथे 4 नवीन उपकेंद्रे
रु. 4.20 कोटी निधीतून भादली बु., बोरगाव, चांदसर व सोनवद येथे 4 अतिरिक्त रोहीत्र
रु. 3.67 कोटी खर्चातून 89 ठिकाणी 100/200 केव्हीए नवीन रोहीत्र
रु. 1.35 कोटी निधीतून 43 ठिकाणी रोहीत्र क्षमतावाढ
रु. 1.14 कोटी निधीतून पाळधी उपकेंद्राची क्षमतावाढ
रु. 13.56 कोटी निधीतून 10 ठिकाणी शेतीपंप व गावठाण वीज वाहिनी विलगीकरण

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील यांनी केले. त्यांनी मंजूर 33/11 केव्ही उपकेंद्र व संबंधित वीज वितरण कामांची माहिती दिली. सूत्रसंचालन युवा सेनेचे भैया मराठे यांनी केले तर आभार बापू भदाणे सर व शाखा प्रमुख गोपाल भदाणे यांनी मानले.

*या नवीन उपकेंद्रामुळे बिलखेडा, भोणे, जांभोरे व सार्वे परिसरातील सुमारे 750 शेती ग्राहकांना दिवसा 8 तास वीज तसेच 1,235 घरगुती ग्राहकांना 24 तास वीजपुरवठा उपलब्ध होणार असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.*

*प्रमुख उपस्थिती*
वीज वितरणचे कार्यकारी अभियंता निलेश सोनगीरे, इन्फ्राचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, माजी सभापती प्रेमराज पाटील, मुकुंदराव नन्नवरे, अनिल पाटील, भाजपचे डी. जी. पाटील, सुभाषअण्णा पाटील, माजी जि. प. सदस्य माधुरीताई अत्तरदे, ठेकेदार सुजित पाटील, रा. कॉ. चे ज्ञानेश्वर महाजन, उपसरपंच दिलीप भदाणे, देविदास भदाणे, युवासेनेचे दीपक भदाणे, शाखा प्रमुख गोपाल भदाणे, आखाडू सोनवणे, शेतकी संघाचे गजानन पाटील, समाधान पाटील, रवी चव्हाण सर, विलास महाजन, भानुदास विसावे यांच्यासह परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

⭕*आधी मतदान मग सारे काम* *शहरातील दिव्यांगांनी स्वयंस्फूर्त मतदान करून सुदृढांसमोर आदर्श निर्माण करावा….* *डिस्ट्रिक्ट आयकॉन मुकुंद गोसावी* ⭕

January 14, 2026

⭕ *जिल्ह्यातील ३७१ गावांना आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण मंजूर ..* ⭕ ⭕ *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण निर्णय* ⭕

December 6, 2025

🏆🥇 *जीपीएस महाविद्यालय पाळधी येथील विध्यार्थ्यांचे* *तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय* *क्रीडा स्पर्धे मध्ये घवघवीत यश* *जी पी एस च्या खेळाडूंनी आपल्या परिश्रम चिकाटी आणि* *उत्तम कामगिरी करत शाळेचा व पालकांचा अभिमान उंचावला* *या कामगिरी मुळे संस्थेचे संचालक विक्रम पाटील व प्रतापराव पाटील यांनी विध्यार्थी मित्रांचे अभिनंदन केले* 🥇🏆

October 7, 2025
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.