Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Saturday, June 13
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»*जिल्ह्यात अतिवृष्टी भागात मदतीसाठी प्रशासन सज्ज* *पालकमंत्र्याचे जनतेला दक्षता घेण्याचे आवाहन* *जामनेर पाचोरा मुक्ताईनगर तालुक्यामध्यें पिकांचे ,घराचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान* *प्रशासन तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे बाधित कुटुंबापर्यन्त मदतीचा हात पोहोचवला जाईल*
जळगाव जिल्हा

*जिल्ह्यात अतिवृष्टी भागात मदतीसाठी प्रशासन सज्ज* *पालकमंत्र्याचे जनतेला दक्षता घेण्याचे आवाहन* *जामनेर पाचोरा मुक्ताईनगर तालुक्यामध्यें पिकांचे ,घराचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान* *प्रशासन तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे बाधित कुटुंबापर्यन्त मदतीचा हात पोहोचवला जाईल*

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीSeptember 16, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":2},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*जिल्ह्यात अतिवृष्टी भागात मदतीसाठी प्रशासन सज्ज;*
*पालकमंत्र्यांचे जनतेला दक्षता घेण्याचे आवाहन*

*जळगाव, दिनांक 16 सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये १५ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या प्रमाणावर झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने बचाव व मदतकार्य सुरू केले असून बाधित नागरिकांसाठी शाळांमध्ये निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.*

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना घाबरून न जाता दक्षता घेण्याचे आवाहन केले असून त्यांनी म्हटले की, *“प्रशासन तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. प्रत्येक बाधित कुटुंबापर्यंत मदतीचा हात पोहोचवला जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. नदी-नाल्याजवळ जाणे टाळावे तसेच गुरेढोरे, शेतीसाहित्य सुरक्षित स्थळी हलवावे. प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवा आणि संयम बाळगा.”*

जामनेर येथील नेरी, जामनेर, वाकडी, शेंदुर्णी आणि तोंडापूर या गावाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मौजे नेरी बु. येथे २१ ते ४० घरांमध्ये पाणी शिरले असून पशुधनाचे नुकसान झाले आहे. नेरी दिगर येथे १५ ते २० घरांमध्ये व ५ दुकानांमध्ये पाणी साचले असून एक कुटुंब शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. माळपिंप्री येथे पिकांचे मोठे नुकसान झाले असून सुनसगाव खुर्द व सुनसगाव बु. या गावांचा संपर्क तुटला आहे.
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव व बरखेडी या दोन मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. शिंदाड, गहुले, वडगाव कडे, सातगाव डोंगरी, वाडी, शेवाळे व वाणेगाव या ६ ते ७ गावांमध्ये नदी-नाल्यांना पूर आला आहे. साधारणतः ३५० ते ४०० कुटुंबांना सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. मौजे शिंदाड येथे तब्बल ४०० जनावरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा व जोधनखेडा गावात घरांमध्ये पाणी शिरले असून पूरपरिस्थिती आहे. काकोडा गावातील किरण मधुकर सावळे वय 28 हे दुर्दैवाने पुराच्या पाण्यात वाहून गेले. संबंधीत तालुक्यांचे प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल व कृषी खात्याचे अधिकारी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करत आहेत. बाधित कुटुंबांसाठी तातडीने अन्न, पिण्याचे पाणी व बिछायतची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने सांगितले की, आपत्तीग्रस्तांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी शांतता व संयम बाळगून प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांसह, जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🌳*जळगावच्या केळी उत्पादकांसाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश !*🌳 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी पुढाकार

June 10, 2026

💥*उद्या कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक*💥

June 9, 2026

🌧️*वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या शेती नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश !*🌧️

June 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.