Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, February 26
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महिला बचत गटाच्या खाऊ गल्ली चे उद्घाटन* ⭕ ⭕ *जळगाव करासाठी नवी खाऊ गल्ली स्वादाचा अनुभव* ⭕
जळगाव जिल्हा

⭕ *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महिला बचत गटाच्या खाऊ गल्ली चे उद्घाटन* ⭕ ⭕ *जळगाव करासाठी नवी खाऊ गल्ली स्वादाचा अनुभव* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीSeptember 20, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महिला बचत गटाच्या खाऊ गल्ली चे उद्घाटन !*

जळगावकरांसाठी नवी खाऊ गल्ली -.नव्या स्वादाचा अनुभव

*जळगाव प्रतिनिधी दि.20 सप्टेंबर – खाऊ गल्ली या उपक्रमातून नागरिकांना वर्षभर महिला बचत गटांनी बनवलेली उत्पादने उपलब्ध होणार असून, ग्रामीण महिलांच्या हातच्या पारंपरिक, सुगरणींच्या चविष्ट पदार्थांची खाऊ गल्लीमध्ये खास चव चाखता येणार आहे. महिला बचत गटांच्या आर्थिक स्वावलंबनाचे हे नवे पर्व आहे. 22 जुलै रोजी सुरू करण्यात आलेले बहिणाबाई मार्ट व खाऊ गल्ली ग्रामीण महिलांना बारमाही उत्पन्नाचा स्रोत ठरेल व त्यांच्या कलेला हक्काचे व्यासपीठ मिळेल,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी केले.*

जळगावकरांच्या चवीला नवा रंग आणि महिला बचत गटांच्या स्वावलंबनाला नवे पंख देणारा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या पुढाकारातून आज शहरात सुरू झाला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महिला बचत गटाच्या खाऊ गल्लीचे उद्घाटन जिल्हा परिषद बचत भवन, राजकमल टॉकीजजवळ, उत्साहात पार पडले.

*दोन महिन्यांच्या आत साकारले स्वप्न*

२२ जुलै रोजी बहिणाबाई मार्टचे उद्घाटन करताना पालकमंत्र्यांनी खाऊ गल्ली सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या दिशेने कर्तव्यदक्ष अशा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पुढाकार घेत अवघ्या( दोन महिन्यांत महिला बचत गटांच्या माध्यमातून खाऊ गल्ली साकारली.

*उपस्थित मान्यवर*
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार राजूमामा भोळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रनेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णूभंगाळे, शिवसेनेच्या संपर्क प्रमुख सरीता ताई कोल्हे- माळी, महिला बचत गटांच्या सी. आर. पी. आणि प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होते.

*खाऊ गल्ली खवय्यांसाठी नंदनवन ठरेल – मिनल करनवाल*

खाऊ गल्लीत महिला बचत गटांना स्वतंत्र स्टॉल देण्यात आले असून, नाममात्र भाड्यात नागरिकांना पारंपरिक चवीचा आनंद घेता येणार आहे. जळगावच्या मध्यवर्ती भागातील ही खाऊ गल्ली खवय्यांसाठी नंदनवन ठरेल आणि महिलांच्या स्वावलंबनाचे नवे मापदंड निर्माण करेल,” असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी व्यक्त केला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार*🔶 एरंडोल येथे आदिवासी विकास प्रकल्पाचे उपकार्यालय सुरू होण्यास राज्यस्तरीय बैठकीत मान्यता

February 22, 2026

💥*एकजुटीतूनच खरा विकास; बोरनारला विकासकामांची भेट*💥 *ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या निर्णयशक्तीचे केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह, भक्तनिवास व हॉलचे लोकार्पण

February 21, 2026

🔥*“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !”* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* 🔥 जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन

February 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.