Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Tuesday, April 21
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *महावितरण कंपनीच्या विविध योजनांची प्रलंबीत कामे तात्काळ पूर्ण करावीत* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील* *पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की अतिवृष्टीत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप ठरलेल्या कालमर्यादित पूर्ण करण्यात येणार असून निकष बाजूला ठेवून मदत केली जाणार आहे* ⭕
जळगाव जिल्हा

⭕ *महावितरण कंपनीच्या विविध योजनांची प्रलंबीत कामे तात्काळ पूर्ण करावीत* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील* *पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की अतिवृष्टीत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप ठरलेल्या कालमर्यादित पूर्ण करण्यात येणार असून निकष बाजूला ठेवून मदत केली जाणार आहे* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीSeptember 26, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*महावितरण कंपनीच्या विविध योजनांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत-पालकमंत्री गुलाबराव पाटील*

*जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मंजूर असलेली महावितरण कंपनीची विविध योजनांची प्रलंबित कामे कालबद्ध कार्यक्रम तयार करून तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेत.*

जिल्हाधिकारी कार्यालयातील, जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित महावितरण कंपनी, कृषी विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल ,अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मंजूर कामांना महावितरण कडून गती मिळणे आवश्यक असून यासाठी संबंधित तालुक्यातील लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन कामे तात्काळ पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.

*पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, अतिवृष्टीत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यात येणार असून, सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.*

पीएम किसान योजनेची प्रकरणे निकाली काढून, सौर ऊर्जा प्रकल्प, पीएम-कुसुम व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, गतीने राबवून शेतकऱ्यांना लाभ द्यावा, नादुरुस्त रोहित्रे व विजेच्या खांबांची दुरुस्ती करून वीजपुरवठा नियमीत करावा, असे निर्देश त्यांनी दिले. स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करून पारदर्शक बिलिंग व विजेची बचत याबाबत माहिती गावागावांत पोहोचवावी, असेही ते म्हणाले.

ग्रामीण भागात वायरमन गावात वास्तव्यास नसल्याबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत असून त्याबाबत कठोर भूमिका घेऊन संबंधितांना नोटीस देण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच तारांची चोरी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीत आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील व आमदार अमोल पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील वीजपुरवठ्याच्या समस्या व अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली. त्यावर महावितरणकडून सकारात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.

या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, प्रत्येक तालुक्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून प्रलंबित कामे पूर्ण करावीत, जल जीवन मिशन साठी वीजपुरवठा सुरू ठेवावा. कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. जिल्हाधिकारी यांनी यावेळी महावितरण व कृषी विभागाच्या सध्या स्थितीत सुरू असलेल्या कामकाजा संदर्भात सादरीकरण केले.

या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२५ अंतर्गत चोपडा येथील *“पर्यावरणपूरक मानाचा गणपती”* या मंडळाने प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते चोपडा नगरपरिषदेचा सत्कार करण्यात आला. तसेच कृषी विभागाच्या *‘महाविस्तार – शेतकऱ्याचा डिजिटल मित्र’* या AI ॲपचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

📌*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*📌 तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर

April 21, 2026

🚌*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप*🚌 *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

April 20, 2026

🔥*दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन*🔥

April 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.