Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, April 19
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»⭕ *गावाची एकजूट हीच खरी ताकद* ⭕ *विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कल्याने खुर्द येथील सीताई माता मंदिर डोम सभागृह बांधकामाचे शुभारंभ
धरणगाव

⭕ *गावाची एकजूट हीच खरी ताकद* ⭕ *विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कल्याने खुर्द येथील सीताई माता मंदिर डोम सभागृह बांधकामाचे शुभारंभ

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीSeptember 28, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*गावाची एकजूट हीच खरी ताकद ; विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री गुलाबराव*

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते डोम सभागृह बांधकामाचा शुभारंभ !

*धरणगाव तालुका प्रतिनिधी दि. 28 सप्टेंबर – गाव, वाडा-वस्तीचा विकास म्हणजेच राज्याचा विकास असतो. कल्याणे खुर्दच्या ग्रामस्थांनी गाव विकासासाठी दाखवलेली एकजूट हेच खरे सामर्थ्य आहे. आगामी काळात गावाच्या विकासाकरिता कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही,” असा ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.*

कल्याणे खुर्द (ता. धरणगाव) येथे श्री सिताई माता मंदिर परिसरात उभारण्यात येणाऱ्या डोम (घुमट) सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. या कामासाठी तब्बल ₹२२ लाख २५ हजार निधी मंजूर झाला असून, गावाच्या सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना नवे व्यासपीठ लाभणार आहे.

ग्रामपंचायतीस नुकतेच आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सरपंच अनिल पाटील व उपसरपंच सुलाबाई पाटील माजी सरपंच काशिनाथ बिदेसिंग पाटील व ग्रामविकास अधिकारी सौ. सोनाली सपकाळे यांचा सत्कार केला.

*यांची होती उपस्थिती*
सदर कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हा प्रमुख ऍड. शरद माळी, पी. एम. पाटील, शिवसेना तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, नारायण आप्पा सोनवणे, सरपंच परिषदचे तालुकाध्यक्ष कैलास पाटील, भोद खुर्द सरपंच संदीप पाटील, भोद बुद्रुक सरपंच मिलिंद बागुल, कल्याणे होळ सरपंच रणजीत पाटील, माजी सरपंच राजेंद्र सुपडू पाटील, भीमसिंग पाटील, ग्रा.पं. सदस्य प्रमोद पाटील, हितेंद्र पाटील, झनकाबाई भिल्ल, सुभाष पाटील, सुरेश फौजी, अशोक थोरात, माजी नायब तहसीलदार सुरेश पारखे, सुनील बोरसे, सोपान बोरसे, केवल पाटील, दीपक राणा, संजय पाटील, पवन पाटील, किशोर पाटील, प्रमोद मोरे, झुंबर हटकर, आत्माराम थोरात, धनराज थोरात, हेमलाल पाटील, योगराज पाटील, प्रल्हाद पाटील, विनोद बोरसे, केवल पाटील, पुरुषोत्तम बोरसे, कॉन्ट्रॅक्टर वाल्मीक पाटील शिवसैनिक, महायुतीचे पदाधिकारी – कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी सौ. सोनाली सपकाळे यांनी केले. प्रास्ताविकात सरपंच अनिल पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांची माहिती दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*धडाकेबाज कारवाई! ३२ गुन्ह्यांचा सराईत आरोपी जेरबंद; उत्कृष्ट कामगिरीबद्दल एपीआय कंडारे यांचा एसपींकडून गौरव*🔶

April 17, 2026

💥*बाबासाहेबांचे विचारच समाजपरिवर्तनाची खरी ताकद” – युवा नेते प्रतापराव पाटील*💥 पाळधी व पिंप्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

🚆 *पाळधी रेल्वे स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना दिलासा; प्रतापराव पाटील यांच्याकडून २५० पाण्याचे जार उपलब्ध*🚆 प्रतापराव यांच्या कडून माणुसकीचे दर्शन जीपीएस मित्र परिवार चे अनमोल सहकार्य

April 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.