Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Tuesday, April 21
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *शासकीय नोकर नव्हे, जनतेचे सेवक व्हा- पालकमंत्री गुलाबराव पाटील* *जळगाव नियुक्ती पत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न* ⭕
जळगाव जिल्हा

⭕ *शासकीय नोकर नव्हे, जनतेचे सेवक व्हा- पालकमंत्री गुलाबराव पाटील* *जळगाव नियुक्ती पत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीOctober 4, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

 

*शासकीय नोकर नव्हे, जनतेचे सेवक व्हा – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

जळगावात नियुक्ती पत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न

*जळगाव, दि. ४ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय नोकरीत रुजू होताना आपल्या मनात केवळ ‘नोकरी’ ही भावना न ठेवता ‘जनतेची सेवा’ हीच भावना ठेवा. शासकीय नोकर म्हणून नव्हे तर जनतेचे सेवक म्हणून काम करा,” असे भावनिक प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.*

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित अनुकंपा भरती २०२५ अंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील उमेदवार, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) लिपिक टंकलेखक भरती २०२३ मधून निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्ती आदेश वितरण सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते

या वेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे गुलाबराव पाटील म्हणालेकी, “तुमच्याकडे आलेल्या प्रत्येक नागरिकाशी चांगले वागा. प्रामाणिकपणे, तणावरहित वातावरणात आपली कर्तव्य बजावा. आपल्या कुटुंबियांनी संकटात तुम्हाला घडविले, वाढविले, शिक्षण दिले – त्यांची जबाबदारी सांभाळा. जनतेची सेवा हीच खरी देवपूजा आहे. फिटनेस सांभाळत, आनंदाने आणि उत्साहाने काम करा. जनतेची नाळ जोडली गेली तरच अधिकारी म्हणून तुमची खरी ओळख निर्माण होईल.

खासदार स्मिताताई वाघ म्हणाल्या की, “नोकरी ही केवळ रोजगार नाही तर समाजाची सेवा करण्याची संधी आहे. प्रामाणिकपणे काम केले तर पुढची पिढी तुमचा गौरव करेल. जनतेच्या सेवेतून तुमची आठवण कायम राहिली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, , “राज्य शासनाने एकाच वेळी दहा हजार नियुक्त्या देऊन मोठे कार्य केले आहे. समाजातील गरजू नागरिकांना नेहमी सहकार्य करा. नोकरी करताना जनतेचे आशीर्वाद मिळाले पाहिजेत,” असे त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपस्थित उमेदवारांना आवाहन केले,“सेवेत असताना निस्वार्थ भावनेने काम करा. समस्यांचे निराकरण शोधण्याची क्षमता विकसित करा. कार्यक्षमतेत इतकी प्रगती करा की वरिष्ठ अधिकारी स्वतः तुमच्याकडे येतील. संयम, प्रामाणिकपणा आणि आरोग्य याकडे लक्ष द्या.”

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल आणि जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनीही नवनियुक्त कर्मचाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

*३१३ उमेदवारांना नियुक्ती आदेश*
शासनाच्या “१५० दिवसांच्या उपक्रमांतर्गत” झालेल्या या सोहळ्यात गट ‘क’ संवर्गातील ४१, गट ‘ड’ संवर्गातील १४७ आणि एमपीएससीद्वारे शिफारस झालेले १२५ असे एकूण ३१३ उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व आस्थापना विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले. कार्यक्रमात नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधानाची झळाळी दिसत होती. त्यांनी शासन व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

📌*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*📌 तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर

April 21, 2026

🚌*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप*🚌 *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

April 20, 2026

🔥*दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन*🔥

April 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.