Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Tuesday, April 21
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *संचालक मंडळ ठरले प्रगतीचे प्रतीक -पालकमंत्री गुलाबराव पाटील* *४.५० कोटींच्या विकास कामांनी बाजार समितीचे विकासद्वार खुले.पालकमंत्रीच्या हस्ते लोकार्पण* *दररोज लिलाव तात्काळ पेमेंट – आमदार चंद्रकांत सोनवणे* ⭕
जळगाव जिल्हा

⭕ *संचालक मंडळ ठरले प्रगतीचे प्रतीक -पालकमंत्री गुलाबराव पाटील* *४.५० कोटींच्या विकास कामांनी बाजार समितीचे विकासद्वार खुले.पालकमंत्रीच्या हस्ते लोकार्पण* *दररोज लिलाव तात्काळ पेमेंट – आमदार चंद्रकांत सोनवणे* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीOctober 5, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*संचालक मंडळ ठरले प्रगतीचे प्रतीक – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

४.५० कोटींच्या विकास कामांनी बाजार समितीचे विकासद्वार खुले ; पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

दररोज लिलाव, तात्काळ पेमेंट – आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे

*जळगाव/चोपडा, दिनांक ४ ऑक्टोंबर (जिमाका वृत्तसेवा): – संचालक मंडळाच्या मनात आलं तर बाजार समितीची नक्की प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. शेतकऱ्याच्या रक्तमासातून उभी राहिलेली ही संस्था अधिक बळकट व्हायला हवी असे प्रतिपादन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.*

चोपडा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बाजार समितीच्या आवारात झाले त्या वेळी ते बोलत होते.

*या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण !*
या विकास कामांत मुख्य मार्केट यार्डमधील शॉपिंग व हॉल बांधकाम, गलंगी येथे गोडाऊन भूमिपूजन, बाजार समितीच्या गोडाऊन मागील भिंत दुरुस्ती, शेतकरी निवासाच्या मागे वॉल कंपाऊंड बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आणि एका नवीन जेसीबी मशिनचे लोकार्पण करण्यात आले असून एकूण ४.५० कोटी रुपयांचा निधीच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आपल्या मनोगतात म्हणाले की, मागील काळात पंधरा-पंधरा दिवस लिलाव होत नव्हते. मात्र आता दररोज लिलाव होत असून शेतकऱ्यांना लगेच पेमेंट मिळते. संचालक मंडळाने कोट्यवधी रुपयांची उलाढाल वाढवली आहे. नव्या जेसीबी मशिनमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

*यांची होती उपस्थिती*
या कार्यक्रमास माजी आमदार लताताई सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, दूध संघाचे संचालक रोहित निकम, सभापती नरेंद्र पाटील, उपसभापती विनायकराव चव्हाण, रावसाहेब पाटील (संचालक), गोपाल पाटील, शिवराज पाटील, विजय पाटील, सुनिल जैन, किरण देवराज, मनोज सनेर, नंदकिशोर सांगोरे, सौ. कल्पनाताई पाटील, सुनिल अग्रवाल, सूर्यभान पाटील नितीन पाटील, रोहिदास सोनवणे (सचिव), जितेंद्र देशमुख (उपसचिव), चंद्रशेखर पाटील, राजेंद्र पाटील, नामदेव पाटील, विकास पाटील, प्रताप अण्णा पाटील, कांतीलाल पाटील सर, पिंटू पावरा, सौ. आनिताताई शिरसाठ, सौ. संध्याताई महाजन, सौ. शीतलताई देवराज, ए.के. गंभीर सर, राकेश पाटील, रविंद्र सोनवणे, गोपल चौधरी, सौ. सुरेखा कोळी, सौ. मनीषा पाटील, गिरीश देशमुख आणि नवलसिंह राजे पाटील यांच्यासह संचालक मंडळ, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, रोहित निकम व ऍड. शिवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आर. एस. पाटील यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

📌*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*📌 तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर

April 21, 2026

🚌*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप*🚌 *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

April 20, 2026

🔥*दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन*🔥

April 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.