Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Tuesday, April 21
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *पूरग्रस्त बांधवांसाठी जळगाव सीए परिवाराचा मदतीचा हात – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद* ⭕ ⭕ *ICAI जळगाव शाखेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधींसाठी रुपये 51 हजाराचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सादर करण्यात आला* ⭕
जळगाव जिल्हा

⭕ *पूरग्रस्त बांधवांसाठी जळगाव सीए परिवाराचा मदतीचा हात – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद* ⭕ ⭕ *ICAI जळगाव शाखेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधींसाठी रुपये 51 हजाराचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सादर करण्यात आला* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीOctober 10, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*पूरग्रस्त बांधवांसाठी जळगाव सीए परिवाराचा मदतीचा हात – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद*

*पाळधी/जळगाव प्रतिनीधी दि.10 ऑक्टोंबर – राज्यात विविध भागांत आलेल्या विक्राळ पुरामुळे शेकडो घरे उद्ध्वस्त झाली, शेती पाण्याखाली गेली आणि अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. या कठीण परिस्थितीत महाराष्ट्र सरकारच्या मदतीच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी समाजातील सर्व घटकांना मदतीचे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते.*

या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ICAI जळगाव शाखेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹51 हजाराचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सादर करण्यात आला.

या प्रसंगी ICAI जळगाव शाखेचे चेअरमन CA हितेश आगीवाल, कोषाध्यक्ष CA लक्ष्मीकांत लाहोटी, कार्यकारी मंडळ सदस्य CA नचिकेत जाखेटीया व CA हितेश जैन उपस्थित होते.

विशेष म्हणजे, ICAI जळगाव शाखा ही देशातील पहिली शाखा ठरली आहे, ज्यांनी सामाजिक बांधिलकीतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस थेट योगदान दिले आहे. जळगाव सीए परिवाराने दाखवलेली ही मदत ही केवळ आर्थिक देणगी नसून पूरग्रस्त बांधवांशी असलेल्या सामाजिक जबाबदारीची आणि माणुसकीची जाणीव आहे.

*या वेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन संकटग्रस्त बांधवांना मदतीचा हात द्यावा. सीए परिवाराने दाखवलेली संवेदनशीलता आणि बांधिलकी ही प्रेरणादायी आहे. त्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करताना जळगाव सीए परिवाराचे आभार मानले आणि जिल्ह्यातील इतर संस्थांनीही अशाच प्रकारे पुढे यावे, असे आवाहन केले.*

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

📌*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*📌 तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर

April 21, 2026

🚌*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप*🚌 *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

April 20, 2026

🔥*दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन*🔥

April 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.