Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Tuesday, April 21
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»*एक दिवस आयुष्य प्रसाद हे मुख्य सचिव होतील* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन* *आयुष्य प्रसाद यांचे मनोगत – अहंकार सोडा सर्व लोक माझे आहेत*
जळगाव जिल्हा

*एक दिवस आयुष्य प्रसाद हे मुख्य सचिव होतील* – *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन* *आयुष्य प्रसाद यांचे मनोगत – अहंकार सोडा सर्व लोक माझे आहेत*

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीOctober 18, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*“एक दिवस आयुष्य प्रसाद हे मुख्य सचिव होतील” – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन*

*जळगाव प्रतिनीधी दि. १७ ऑक्टोंबर – “सर्वसामान्य जनतेची कामे करणारा आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद आहेत,” अशा शब्दांत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मावळते जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या कार्याचे कौतुक केले. ते जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या निरोप समारंभात व नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी बोलत होते.*

*एक दिवस मुख्य सचिव होतील आयुष्य प्रसाद*

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने सर्व विभागांना सोबत घेऊन, एकसंघपणे काम केले पाहिजे. आयुष्य प्रसाद यांनी महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, महानगरपालिका आदी सर्व विभागांना एकत्र आणत टीमवर्कची उत्तम उदाहरणे निर्माण केली. वडाचे झाड कितीही मोठे असले तरी त्याच्या पारंब्या जमिनीत असतात; तसेच आयुष्य प्रसाद यांनी आपल्या पदाचा गर्व न बाळगता जमिनीवर राहून सर्वसामान्यांची कामे केली. “त्यांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकसंपर्क अद्वितीय आहेत. ते गोरगरिबांचे प्रश्न संवेदनशीलतेने सोडवतात. अशा अधिकाऱ्यांचा निश्चित अभिमान आहे. जळगावमध्ये काम केलेले अनेक जिल्हाधिकारी पुढे राज्याचे मुख्य सचिव झाले आहेत. माझे मन सांगते – आयुष्य प्रसाद हे देखील एक दिवस महाराष्ट्राचे मुख्य सचिव होतील. त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांचा प्रामाणिक दृष्टिकोन आणि सर्वांशी जपलेले सौहार्द पाहता हे नक्की घडेल.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या प्रभावी शेरोशायरीने सभागृहात उपस्थित सर्वांची मने जिंकली.

*आयुष्य प्रसाद यांचे मनोगत: “अहंकार सोडा, सर्व लोक माझे आहेत”*

आपल्या निरोप समारंभात बोलताना आयुष्य प्रसाद म्हणाले, “जळगाव जिल्ह्यात काम करताना अनेक उत्तम अनुभव मिळाले. सर्व लोक माझे आहेत, आणि हे सर्व यश जनतेचे आहे. मी जे काही शिकलो ते इथल्या लोकांमुळेच. प्रशासकीय पद हे सेवेसाठी असते, गर्वासाठी नाही – म्हणून अहंकार कधीही बाळगू नका,” असे ते म्हणाले.
नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

*नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची प्रतिक्रिया*

“निरोप समारंभात मान्यवरांचे विचार ऐकताना मला बरेच शिकायला मिळाले,” असे सांगत रोहन घुगे म्हणाले, “प्रत्येक वेळी निरोप समारंभ होतोच असे नाही – तो आपल्या कामामुळे मिळतो. त्यामुळे चांगले काम करणे हेच माझे ध्येय राहील.”

कार्यक्रमास आमदार राजूमामा भोळे, किशोर पाटील, मंगेश चव्हाण, पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, श्रीमती इंद्रायणी मिश्रा, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांनी केले, तर आभार उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

📌*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*📌 तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर

April 21, 2026

🚌*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप*🚌 *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

April 20, 2026

🔥*दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन*🔥

April 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.