Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Tuesday, April 21
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *मी आधी वारकरी ,मग राजकारणी* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* ⭕ ⭕ *पालकमंत्रीचा सन्मानपत्र देऊन झाला गौरव 500 पेक्षा जास्त किर्तनकारांची उपस्थिती* ⭕ ⭕ *दरवर्षी 300 कलाकारांना मानधन देण्यासाठी कॅबिनेट मध्ये ठोस मागणी करणार* ⭕
जळगाव जिल्हा

⭕ *मी आधी वारकरी ,मग राजकारणी* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* ⭕ ⭕ *पालकमंत्रीचा सन्मानपत्र देऊन झाला गौरव 500 पेक्षा जास्त किर्तनकारांची उपस्थिती* ⭕ ⭕ *दरवर्षी 300 कलाकारांना मानधन देण्यासाठी कॅबिनेट मध्ये ठोस मागणी करणार* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीOctober 26, 2025No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*“मी आधी वारकरी, मग राजकारणी”* – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यां सन्मानपत्र देवुन झाला गौरव ; 500 पेक्षा जास्त कीर्तनकारांची उपस्थिती

*पाळधी /जळगाव प्रतिनीधी दि. 25 ऑक्टोंबर – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या भावनिक आणि विनोदी शैलीत सर्व वारकऱ्यांची मने जिंकली. “मी आधी वारकरी आणि मग राजकारणी आहे. कीर्तनकारांची सेवा हीच माझी ऊर्जा आहे. जीवात जीव असेपर्यंत वारकऱ्यांच्या सेवेसाठी काम करणार आहे. जिल्ह्यातील वारकरी व कीर्तनकार समाजासाठी हा मेळावा संघटनात्मक सशक्तीकरणाचा नवा अध्याय असून वारकऱ्यांची सेवा म्हणजेच समाधान राजकारणा पलीकडे पात्र आणि गरजू व्यक्तींना मदत करणे हेच माझे धर्मकार्य आहे. प्रत्येक तालुक्यात वारकरी भवन उभारण्यासाठी देखील प्रयत्नशील आहे. कीर्तन हे समाज परिवर्तनाचं मंदिर आहे, आणि कीर्तनकार हे त्या मंदिराचे पुजारी आहेत. वारकऱ्यांचे कुटुंब संकटात असताना शासन आणि आम्ही वैयक्तिकरित्या त्यांच्या पाठीशी उभे आहोत.*

ट्रस्टच्या मागण्यांना प्रतिसाद देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “दरवर्षीच्या मानधन योजनेत 300 कलाकारांना सामावून घेण्यासाठी आणि त्यात 150 वारकरी कलावंतांना मानधन देण्यासाठी मी कॅबिनेटमध्ये ठोस मागणी करणार आहे. तसेच पाच तालुके मिळून तीन ठिकाणी भव्य आरोग्य शिबिरे आयोजित करू.” जिल्ह्यातील एक हजार वारकरी कीर्तनकारांचा विमा काढण्यासाठी कटिबद्ध आहे.

श्री गुरु मोठे बाबा वारकरी सेवा ट्रस्टतर्फे सुगोकी लॉन येथील भव्य सभागृहात जिल्हास्तरीय वारकरी पदाधिकारी मेळावा व संत पूजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातील कीर्तनकार मार्फत ट्रस्टच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या भव्यदिव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टचे अध्यक्ष गोप्रेमी ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर यांनी केले, तर प्रस्ताविक ह.भ.प. प्रा. सी.एस. पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन ह.भ.प. सुशील महाराज यांनी मानले.

*मागण्या*
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष व प्रेमी ह भ प गजानन महाराज वरसाडेकर यांनी मागणी केली की,
1️⃣ दरवर्षी मिळणाऱ्या 100 कलाकार मानधन योजनेत 300 कलाकारांना मानधन द्यावे, त्यापैकी 50 टक्के मानधन वारकरी संप्रदायातील पात्र कलावंतांना द्यावे.
2️⃣ वारकरी संप्रदायातील कुटुंबासाठी आरोग्य शिबिरे जिल्ह्यातील पाच तालुक्यांनुसार तीन ठिकाणी आयोजित करावीत.
3️⃣ वारकऱ्यांचा अपघात विमा काढण्यात यावा.

*कार्यक्रमाचे वैशिष्ट्य*
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वारकरी संप्रदायातील एकता, भक्ती, भावनिकता आणि संत परंपरेचा जागर. सभागृहात “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. ट्रस्टमार्फत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना “आधुनिक श्रावण बाळ” म्हणून गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्राचे बहारदार वाचन निवेदक व नाट्यकलावंत हर्षल पाटील यांनी केले.

यावेळी नाट्य कर्मी तथा निवेदक हर्षल पाटील यांनी सांगितले की, गुलाबभाऊ म्हणजे आधुनिक काळातील श्रावण बाळ आहेत,” असे सांगताना हर्षल पाटील म्हणाले, “वारकऱ्यांची सेवा असो की कलावंतांच्या समस्यांचे निराकरण गुलाब भाऊंचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या अंगी असलेली भक्तीभावाची झलक प्रत्येक कार्यात दिसून येते. सन्मानपत्राचे बहारदार वाचन हर्षल पाटील यांनी केले.

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जीपीएस ग्रुपचे आधारवड प्रतापराव पाटील यांचे प्रतिपादन

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचा सिंहाचा वाटा राहिला. ते म्हणाले, घरातून मिळालेल्या संतसेवेच्या संस्कारांनुसार आम्ही संत पूजन असो वा गुरुकृपा सेवा – अशा प्रत्येक उपक्रमात सदैव सहभागी राहू.

*यांची होती उपस्थिती*
कार्यक्रमात ह.भ.प. गोविंद महाराज, रवींद्र हरणे महाराज, पांडुरंग महाराज आवरकर, प्रतिभा सोनवणे, समाधान भोजेकर महाराज यांच्यासह असंख्य वारकरी उपस्थित होते.
सभागृह भक्तिरस, कीर्तनाचा जोश आणि गुलाबराव पाटील यांच्या थेट हृदयाला भिडणाऱ्या भाषणाने भारावले होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

📌*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*📌 तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर

April 21, 2026

🚌*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप*🚌 *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

April 20, 2026

🔥*दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन*🔥

April 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.