Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, February 26
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *भुसावळ नगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहा* ⭕ ⭕ *भुसावळ म्हणजे शिवसेनेच्या जनादराचे जंक्शन* ⭕ ⭕ *बूथ मजबूत करा* *१९९१ पासून भुसावळ* *शिवसेनेचा बालेकिल्ला* *पालकमंत्री गुलाबरावजी पाटील*
जळगाव जिल्हा

⭕ *भुसावळ नगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहा* ⭕ ⭕ *भुसावळ म्हणजे शिवसेनेच्या जनादराचे जंक्शन* ⭕ ⭕ *बूथ मजबूत करा* *१९९१ पासून भुसावळ* *शिवसेनेचा बालेकिल्ला* *पालकमंत्री गुलाबरावजी पाटील*

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीNovember 4, 2025No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*“भुसावळ नगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहा – पालकमंत्री गुलाबराव पाटील”*
*किंवा*
*भुसावळ म्हणजे शिवसेनेच्या जनादराचे जंक्शन – पालकमंत्री गुलाबराव पाटील”*

बुथ मजबूत करा : एकजुटीने काम करण्याचा निर्धार

*भुसावळ प्रतिनिधी दि. २ नोहेंबर – भुसावळ शहर व तालुका हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला असून “भुसावळ फक्त रेल्वे जंक्शन नाही, तर शिवसेनेचा जनादराचे जंक्शन आहे. १९९१ पासून आजपर्यंत हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तीन नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समित्यांवर भगवा फडकलेला आहे. पूर्वीप्रमाणेच भुसावळला गतवैभव प्राप्त करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने सज्ज व्हावे. “सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच युतीचा विचार असून , “नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत पुन्हा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासून तयारीला लागा. प्रत्येक बुथ मजबूत करा, कारण बुथच विजयाचा पाया आहे. असे प्रतिपादन शिवसेनेचे जेष्ठ नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते भुसावळ येथील संतोषी माता हॉल मध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.*

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, भुसावळ नगरपालिकेच्या पन्नास जागा आणि नगराध्यक्षपदाची एक जागा – अशा एकूण ५१ जागांवर लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे.” “भुसावळ शहरासाठी डीपीडीसी मधून शहर रस्ते विकासासाठी ४९ कोटींचा निधी दिला आहे. तसेच अमृत-२ योजनेतून १३६ कोटी रुपयांचा पाणीपुरवठा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. जल जीवन मिशनअंतर्गत पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी एमजीपीच्या ५ योजनांसाठी ५५ कोटी आणि जिल्हा परिषदेमार्फत ३२ गावांसाठी ३० कोटी, अशा एकूण ८५ कोटी रुपयांच्या मंजुरीदिल्याचे आवर्जून सांगितले.

*भुसावळ नगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचीही तयारी ठेवा – आ. चंद्रकांत पाटील*

“शिवसैनिकांनी भुसावळ नगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचीही तयारी ठेवावी,” असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. पक्षाची ताकद आणि जनतेचा विश्वास यांच्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भगवा पुन्हा फडकवण्याचे लक्ष्य ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभी असलेली पक्षसंघटना आहे. कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करण्याचे, जनतेशी सातत्याने संवाद ठेवण्याचे आणि विकासाचे अजेंडे समोर ठेवून प्रचार करण्याचे आवाहन मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.

मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ पाटील यांनी केले तर प्रास्ताविक माजी नगरसेवक दिपक धांडे यांनी केले, तर कार्यक्रमस्थळी भगवे झेंडे, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांचा आवाज आणि “जय भवानी” जय शिवराय च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भगवेमय झाले होते.

*शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश*
मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामध्ये माजी नगराध्यक्षा माधुरी पालक, माजी नगरसेवक अमोल इंगळे, मनसेचे शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, उबाठाचे उप जिल्हा प्रमुख कैलास लोखंडे, रूपाली चौधरी (ठोसर) व गिरीश नेमाडे यांची पत्नी व शिंदी येथील सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा नेमाडे, मनसेचे पदाधिकारी राहुल सोनटक्के, मंगेश भावे, सुजित शिंदे, गोपाळ कोळी, चेतन राजपूत, शुभम सैनिक, दुर्गेश सहानी, लोकेश ठाकूर, नोशांक चौधरी, शिवम गायकवाड, सचिन राऊत, सामाजिक कार्यकर्ते हितेश तायडे, गणेश पाटील सर, मयूर बऱ्हाटे, उबाठाचे कैलास जाधव, राहुल पवार, निळकंठ पवार, राहुल सोनवणे व विजय रायपुरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

*उपस्थित मान्यवर*
कार्यक्रमास जळगाव विभागाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, स्थानिक जिल्हाप्रमुख समाधान महाजन, महिला जिल्हाप्रमुख नंदाताई निकम, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पवन भोळे, बबलू बऱ्हाटे, ज्येष्ठ शिवसैनिक विलास मुळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष माळी, शहर प्रमुख पवन नाले, महिला तालुकाप्रमुख वर्षा तल्लारे, महिला शहर प्रमुख दीपाली बऱ्हाटे, श्रद्धा गायकवाड, उपतलुका प्रमुख जितेंद्र नागपुरे, सुरेश कोल्हे, गजानन पालोदे, वरणगाव शहर प्रमुख दुर्गेश बेदरकर, जळगाव महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, दिलीप पोकळे, हर्शल मावळे , विलास वंजारी, अल्पसंख्याक आघाडीचे सैयद जाफर अली यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*ठळक वैशिष्ट्ये*
स्व. जिल्हाप्रमुख राजेंद्र व माजी शहर प्रमुख स्व. निळकंठ फालक ऊर्फ पंच्छी यांनी 2009 मध्ये संतोषी माता हॉलमध्ये घेतलेल्या शेवटच्या मेळाव्याची आठवण काढत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. नाहटा चौफुली ते कार्यक्रमस्थळापर्यंत भगवे झेंडे, आकर्षक बॅनर्स करू वातावरण भगवामय झाले होते. ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या रोषणाईत पालकमंत्रींचे जोरदार स्वागत करण्यात आले. धनुष्यबाण रांगोळ्या लक्ष वेधून घेत होत्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार*🔶 एरंडोल येथे आदिवासी विकास प्रकल्पाचे उपकार्यालय सुरू होण्यास राज्यस्तरीय बैठकीत मान्यता

February 22, 2026

💥*एकजुटीतूनच खरा विकास; बोरनारला विकासकामांची भेट*💥 *ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या निर्णयशक्तीचे केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह, भक्तनिवास व हॉलचे लोकार्पण

February 21, 2026

🔥*“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !”* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* 🔥 जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन

February 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.