Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Tuesday, April 21
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण आढावा बैठक पार* *केळी पीकविमा निर्यात सुविधा केंद्राच्या वाढीसाठी ठोस चर्चा* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* ⭕
जळगाव जिल्हा

⭕ *जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण आढावा बैठक पार* *केळी पीकविमा निर्यात सुविधा केंद्राच्या वाढीसाठी ठोस चर्चा* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीNovember 5, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण आढावा बैठक पार*

केळी पीकविमा, निर्यात सुविधा केंद्रांच्या वाढीसाठी ठोस चर्चा

*मुंबई,/जळगाव प्रतिनिधी दि. 5 नोव्हेंबर – जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि केळी निर्यात क्षमतेत वाढ घडवून आणण्यासाठी आज मंत्रालयात उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि पणन व राजशिष्टाचार जयकुमार रावल तसेच रावेरचे आ.अमोल जावळे यांच्यासह पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी विभाग, सहकार व संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.*

बैठकीत केळी पीकविमा योजनेअंतर्गत प्रलंबित दावे निकाली काढण्याच्या प्रक्रियेतील तांत्रिक अडथळे दूर करण्याचे तसेच जिल्ह्यातील केळी निर्यात सुविधा केंद्रांची संख्या आणि क्षमता वाढविण्याचे ठोस निर्णय घेण्यात आले. तसेच केळी निर्यात साखळी अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबतही सखोल चर्चा झाली. तसेच केळी पीकविमा दाव्यांची तातडीने सोडवणूक केली जाईल, निर्यात सुविधा केंद्रांना आवश्यक परवानग्या व पायाभूत सुविधा जलद गतीने पुरवल्या जातील, आणि शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाचे सक्रिय सहकार्य राहिलं असे सांगण्यात आले.

बैठकीदरम्यान जळगाव जिल्ह्याला “ *केळी निर्यात केंद्र”* म्हणून राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यासाठी सर्वंकष धोरण राबविण्याचा संकल्प करण्यात आला. शेतकऱ्यांना विमा दावे तातडीने मंजूर व्हावेत, निर्यात प्रक्रियेत सुलभता यावी आणि जिल्ह्यातील केळी उद्योग अधिक संघटित पद्धतीने विकसित व्हावा, यासाठी शासनाने प्रयत्न गतीमान करण्याचा निर्णय घेतला.

*या वेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “जळगावचा शेतकरी मेहनती, प्रयोगशील आणि बाजारपेठेचा अभ्यासू आहे. त्याच्या हक्काचे रक्षण करणे आणि त्याच्या उत्पादनाला योग्य मूल्य मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. केळी उद्योगाला जागतिक दर्जा देण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.*

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

📌*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*📌 तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर

April 21, 2026

🚌*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप*🚌 *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

April 20, 2026

🔥*दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन*🔥

April 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.