Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Wednesday, February 25
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»⭕ *बांभोरी गावं झाले एकसंघ – गावांन घेतली शिवबंधनाची शपथ* *पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वावर गावाला पुन्हा ठाम विश्वास* *शेकडो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश* ⭕
धरणगाव

⭕ *बांभोरी गावं झाले एकसंघ – गावांन घेतली शिवबंधनाची शपथ* *पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वावर गावाला पुन्हा ठाम विश्वास* *शेकडो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेत प्रवेश* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीNovember 8, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*बांभोरी गावं झाले एकसंघ – गावानं घेतली शिवबंधनाची शपथ !*

पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वावर गावाचा पुन्हा ठाम विश्वास !

*पाळधी/धरणगाव प्रतिनिधी दि. 6 नोव्हेंबर – बांभोरीचं प्रेम मी कधी विसरणार नाही, सहा वेळांपैकी पाच वेळा या गावानं मला भरभरून साथ दिली. आज हेच गाव पुन्हा एकदिलानं शिवसेनेच्या भगव्या छत्राखाली आलं आहे. गावाला सन्मान मिळावा म्हणून पंचायत समिती सभापती व मार्केट कमिटी सभापती पदांचा मान दिला. बांभोरीचा विश्वास कायम राखणं हे माझं कर्तव्यच आहे. असं भावनिक प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. ते बांभोरी येथे झालेल्या भव्य शिवसेना प्रवेश सोहळा प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे हे होते.*

*गावात एकच जयघोष – यांनी बांधले शिवबंधन*
धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात नुकताच भगव्या एकतेचा महासोहळा पार पडला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर अखंड विश्वास ठेवत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत आबा पाटील, तालुका संघटक लीलाधर पाटील, वि.का. सोसायटीचे चेअरमन उमेश पाटील, व्हा. चेअरमन रावण पाटील, संचालक सुनील माळी, सुनील पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते धनराज, भगवान, भागवत पाटील आदींसह जणू काही संपूर्ण बांभोरी गावानं शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते भगवा रुमाल टाकून या सर्वांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमस्थळी ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, आणि जय भवानी जय शिवराय च्या घोषणांनी बांभोरी गावात उत्साहाची लाट उसळली. संपूर्ण वातावरण भगवामय आणि जोशपूर्ण झालं होतं.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लीलाधर पाटील यांनी केले, सूत्रसंचालन युवा सेनेचे भय्या मराठे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिवसैनिक पोपट पाटील यांनी मानले.

व्यासपीठावर जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उप जिल्हाप्रमुख पी. एम. पाटील, तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, अनिल पाटील, मार्केट कमिटीचे सभापती प्रेमराज पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रतापराव पाटील, सचिन पवार, उपसरपंच सुनंदा पाटील, शहर प्रमुख विलास महाजन, गटनेते पप्पू भावे, वाल्मिक पाटील, प्रशांत देशमुख, नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या ऐतिहासिक शिवबंधन सोहळ्याचे नियोजन व आयोजन विरभान पाटील, पोपट पाटील, वसंत पाटील, लीलाधर पाटील, सुकलाल पाटील, भगवान पाटील, भागवत पाटील, सुनील पाटील, संजय पाटील, सज्जन पाटील, रविंद्र पाटील, धनराज पाटील, राहुल पाटील, वैभव पाटील, दीपक पाटील, कैलास पाटील,जगदीश भोसलें, सुनील माळी, शांताराम पाटील,अनिल पाटील, दीपक पाटील, राजेंद्र पाटील, किशोर पाटील आदींनी जबाबदारी सांभाळत कार्यक्रम भव्यदिव्य पद्धतीने पार पाडला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔥*धरणगाव तालुक्यात ठाकरे गटाला जोरदार धक्का..*🔥 *मा.सभापती यांचा पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचा उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश*

February 22, 2026

👁️*जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद* *1060 रुग्णांची नोंदणी; 510 रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया*👁️

February 16, 2026

💥*पाळधी बु व पाळधी खु* *ग्रामपंचायत हद्दीतील भटक्या कुत्र्यांच्या नागरिकांवर हल्ला*💥 ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार पुन्हा उघडीस *नागरिक व शालेय विद्यार्थी मध्ये भीतीचे वातावरण*

February 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.