Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Saturday, June 13
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *जीपीएस मित्र परिवार आयोजित नेत्र शिबिराला प्रचंड प्रतिसाद ८१० रुग्णांची तपासणी २३० मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी निवड* *मोफत जेवण व मोफत ट्रॅव्हलिंग* *मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील सकाळ पासून शिबिरात ठाण मांडून होते* ⭕
जळगाव जिल्हा

⭕ *जीपीएस मित्र परिवार आयोजित नेत्र शिबिराला प्रचंड प्रतिसाद ८१० रुग्णांची तपासणी २३० मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी निवड* *मोफत जेवण व मोफत ट्रॅव्हलिंग* *मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील सकाळ पासून शिबिरात ठाण मांडून होते* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीDecember 9, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जिपीएस मित्र परिवार आयोजित नेत्र शिबिराला प्रचंड प्रतिसाद; ८१० रुग्णांची तपासणी, २३० मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड

पाळधी :
मा.ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जिपीएस मित्र परिवारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला रविवारी नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

पहाटेच नागरिकांनी शिबिरस्थळी मोठी गर्दी केली. सकाळी सात वाजेपासून नोंदणीला सुरुवात झाली आणि दिवसभरात एकूण ८१० रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३० रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड होऊन त्यांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात पाठविण्यात आले.

रुग्णांच्या नोंदणीपासून तपासणी, निदान आणि पुढील प्रक्रियेपर्यंत स्वतंत्र व्यवस्था शिबिरात उपलब्ध होती. उपस्थित प्रत्येकासाठी नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात आली होती. संपूर्ण सेवा विनामूल्य दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

दृष्टीदान या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अनेक रुग्णांनी व ज्येष्ठ नागरिकांनी नेत्यांचे आभार व्यक्त केले. समाजोपयोगी कामात सातत्याने पुढाकार घेणाऱ्या गुलाबराव पाटील, प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शंकरा हॉस्पिटलची तज्ञ टीम, डॉ. राहुल चौधरी डॉ विजय ब्राम्हणे , असद अन्वर सायली उटेकर वैशाली राऊत पाळधी व चांदसर आरोग्य केंद्रातील कर्मचारी वृंद तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय चव्हाण सर डॉ निखिल शिंदे डॉ ऋषिकेश झंवर डॉ प्रीती पाटील संदीप पाटील हर्ष भट रिकुल चव्हाण तसेच जिपीएस मित्र परिवार, शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

जलपुरवठा क्षेत्रातील कार्यामुळे ‘पाणीवाला बाबा’ म्हणून ओळख निर्माण झालेल्या नेत्यांची आता नागरिकांमध्ये ‘दृष्टी देणारा बाबा’ म्हणूनही नवी प्रतिमा तयार होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*युवाउद्योजक यश सुनील मंत्री ( अयांश ऑटो ) वाढदिवस निमित्ताने जीपीएस मित्र परिवाराला केली अनोखी भेट*🔶

June 13, 2026

🌧️*घाईची पेरणी टाळा; समाधानकारक पाऊसानंतरच खरीप हंगामाला सुरुवात करा !🌧️* भविष्यातील दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शेतकऱ्यांना कळकळीचे आवाहन

June 13, 2026

🌳*जळगावच्या केळी उत्पादकांसाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश !*🌳 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी पुढाकार

June 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.