Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Saturday, June 13
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕*जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र* *शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद* *१४१० रुग्णांची नोंदणी; ५१० रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया*⭕
जळगाव जिल्हा

⭕*जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र* *शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद* *१४१० रुग्णांची नोंदणी; ५१० रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया*⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीJanuary 8, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद
१४१० रुग्णांची नोंदणी; ५१० रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया
पाळधी (ता. धरणगाव) |
मा. ना. गुलाबराव पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून तसेच जि. प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नातून जिपीएस मित्र परिवारातर्फे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा मोठा व अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
सकाळी ७ वाजेपासून गावागावातून आबालवृद्ध नागरिकांनी नेत्र तपासणीसाठी गर्दी केली. शिबिरात एकूण १४१० रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी ५१० रुग्णांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.
शिबिरात सहभागी रुग्णांसाठी नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे रुग्णांकडून कोणताही मोबदला न घेता सर्व सेवा पूर्णतः मोफत देण्यात आल्या. या दृष्टीदान उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून लाभार्थी रुग्णांनी आयोजक व नेत्यांचे आभार मानले.
या शिबिरासाठी शंकरा हॉस्पिटलची संपूर्ण टीम, पाळधी आरोग्य केंद्राचे कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चव्हाण, डॉ. ऋषिकेश झंवर तसेच जिपीएस मित्र परिवार, शिवसेना व युवासेना कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*युवाउद्योजक यश सुनील मंत्री ( अयांश ऑटो ) वाढदिवस निमित्ताने जीपीएस मित्र परिवाराला केली अनोखी भेट*🔶

June 13, 2026

🌧️*घाईची पेरणी टाळा; समाधानकारक पाऊसानंतरच खरीप हंगामाला सुरुवात करा !🌧️* भविष्यातील दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शेतकऱ्यांना कळकळीचे आवाहन

June 13, 2026

🌳*जळगावच्या केळी उत्पादकांसाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश !*🌳 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी पुढाकार

June 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.