
*कामांच्या क्वालिटीमध्ये तडजोड खपवून घेणार नाही – मंत्री गुलाबराव पाटीलांचा इशारा*
गावोगावी कामांचा झपाटा; दर्जेदार पायाभूत सुविधांचा शुभारंभ
*जळगाव प्रतिनिधी | दि. १९ जानेवारी – ग्रामीण भागातील दैनंदिन गरजांशी थेट संबंधित असलेल्या रस्ते, स्मशानभूमी, शाळा, अंगणवाडी व धार्मिक स्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देत असून, या परिसरातील जनतेचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे. त्याच विश्वासाच्या जोरावर अधिकाधिक निधी खेचून आणून परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न आहे. ही सर्व कामे दर्जेदार व मुदतीत पूर्ण झाली पाहिजेत. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा ठाम इशारा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.*
दर्जेदार विकासालाच प्राधान्य देण्यात येत असून, कामांच्या गुणवत्तेबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेतली. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विकासकामांमुळे गावांच्या मूलभूत सुविधांना चालना मिळणार असून ग्रामीण जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा, चिंचोली, धानवड व उमाळे या गावांमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये कुसुंबा येथे गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरणासाठी ६० लाख रुपये, दोन ठिकाणी स्मशानभूमी बांधकामासाठी २० लाख रुपये, चिंचोली येथे दोन वर्गखोल्या बांधकामासाठी २४ लाख, गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरणासाठी २० लाख, मंदिर चौक परिसर सुशोभीकरणासाठी १० लाख, मोरी बांधकामासाठी ७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. धानवड येथे दोन वर्गखोल्या बांधकामासाठी २४ लाख, अंगणवाडी इमारत बांधकामासाठी ११ लाख, स्मशानभूमी बांधकामासाठी १० लाख तसेच गावांतर्गत काँक्रिटीकरणासाठी २० लाख रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. उमाळे येथे गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण १० लाख, स्मशानभूमी बांधकाम १० लाख, महादेव मंदिरालगत नाल्यावर बंधारा बांधकामासाठी १० लाख तसेच उमाळा फाटा ते महादेव मंदिरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरणासाठी २० लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व तर काहीं कामांचे लोकार्पण करण्यात आले.
*शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन*
कुसुंबा येथे शिवसेना पंचायत समिती गणाच्या शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडले.
यावेळी बोलताना मध्यप्रवरा पाटील म्हणाले की, *कुसुंब्यात उघडलेलं हे संपर्क कार्यालय म्हणजे जनतेच्या हक्कासाठी उघडलेलं दार आहे. शिवसेना सत्तेसाठी नाही, सेवेसाठी उभी आहे. इथून प्रत्येक कार्यकर्त्याने सामान्य माणसाचा आवाज बनायचं आहे. काम करा, लोकांसोबत रहा, आणि शिवसेना म्हणून ठाम उभे राहण्याचे आवाहन केले.*
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते तथा जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले तर आभार तालुका प्रमुख शिवराज पाटील यांनी मानले. ढोल-ताशांच्या गजरात, महिलांच्या औक्षणाने व फटाक्यांच्या जल्लोषात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रत्येक गावात भव्य स्वागत करण्यात आले.
*यांची होती प्रमुख उपस्थिती*
प्रत्येक गावातील कार्यक्रमा प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख संतोष पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, माजी सभापती नंदलाल पाटील, जनाआप्पा पाटील (कोळी), मनोरमा पाटील, तालुकाप्रमुख शिवराज पाटील, या गावांतील सरपंच संभाजी पवार, किरण घुगे, राजू पाटील, भारती पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, मिलिंद चौधरी, भाऊसाहेब पाटील, गट विकास अधिकारी सरला पाटील, उपजिल्हा प्रमुख रवी कापडणे, युवासेना जिल्हा प्रमुख रोहीत कोगटा, भ.वि.जमातीचे चे जिल्हा प्रमुख राजू पाटील, उपसरपंच पिंटू पाटील, प्रवीण परदेशी, आकाश पाटील, दुध संघाचे संचालक रमेशआप्पा पाटील, शेतकी संघाचे ब्रिजलाल पाटील, संजय घुगे, योगेश सोनवणे, अतुल घुगे, जितू पोळ, चेतन पोळ, विजय पाटील, विनोद पवार, फिरोज तडवी, दीपक पाटील, योगेश सोनवणे, संदीप पाटील, रामकृष्ण काटोले, नगरसेवक गणेश सोनवणे, मनोज चौधरी, दिलीप पोकळे, तसेच उपसरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, संचालक, शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.