Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Tuesday, April 21
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕*हनुमान जयंती हा श्रद्धा, शक्ती आणि सेवाभाव जागवणारा दिवस – पालकमंत्री गुलाबराव पाटील*⭕ हनुमान जयंतीनिमित्त एकलग्न व बोरगाव खुर्द येथे २५ लाखांच्या आमदार निधीतून सभा मंडपांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
जळगाव जिल्हा

⭕*हनुमान जयंती हा श्रद्धा, शक्ती आणि सेवाभाव जागवणारा दिवस – पालकमंत्री गुलाबराव पाटील*⭕ हनुमान जयंतीनिमित्त एकलग्न व बोरगाव खुर्द येथे २५ लाखांच्या आमदार निधीतून सभा मंडपांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीApril 2, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

https://jalgaonjanmat.com/wp-content/uploads/2026/04/VID-20260402-WA0068.mp4

*हनुमान जयंती हा श्रद्धा, शक्ती आणि सेवाभाव जागवणारा दिवस – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

हनुमान जयंतीनिमित्त एकलग्न व बोरगाव खुर्द येथे २५ लाखांच्या आमदार निधीतून सभा मंडपांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

*पाळधी/धरणगाव/जळगाव प्रतिनिधी | दि. २ एप्रिल (हनुमान जयंती) – हनुमान जयंती हा केवळ सण नसून श्रद्धा, शक्ती आणि सेवाभाव जागवणारा दिवस आहे. मारुती मंदिर ही आपल्या गावांची श्रद्धास्थाने असून त्यांचा विकास म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान आहे. मंदिर परिसर सुशोभित करण्यासाठी व भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,” अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.*

धरणगाव तालुक्यात हनुमान जयंतीच्या पवित्र व उत्साहपूर्ण वातावरणात एकलग्न (१० लाख) व बोरगाव खुर्द (१५ लाख) येथे आमदार निधीतून मारुती मंदिर परिसरात सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन मोठ्या जल्लोषात पार पडले. बांभोरी बुद्रुक येथील उजाड मारुती मंदिर परिसरात तीर्थक्षेत्रातून सुशोभीकरणासाठी साठी 10 लक्ष तर जळगाव तालुक्यातील खिर्डी येथे आमदार निधीतून मारुती मंदिर परिसरात सभा मंडपासाठी 20 लक्ष निधी मंजूर करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम (विकी बाबा) पाटील यांच्या नियोजनातून अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर पार पडलेल्या या भूमिपूजनामुळे दोन्ही गावांमध्ये भक्तिभाव, उत्साह आणि विकासाची नवी ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.पी.एस. शाळेचे उपशिक्षक पी. एन. जाधव सर व युवा सेनेचे भैया मराठे यांनी केले, तर प्रास्ताविक तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य व युवा नेते प्रतापराव पाटील यांनी केले.

*यांची होती उपस्थिती*
बोरगाव खुर्द येथे सरपंच दिनकर पाटील बुद्रुकचे सरपंच ज्ञानेश्वर मराठे, युवा सेनेचे भैया मराठे, ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, नंदू पाटील, गोविंदा पाटील, लक्ष्मण पाटील, निंबा कंखरे, गोरख पाटील, किशोर मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. तर एकलग्न येथे उत्तम पाटील, गयभू पाटील, दामोदर पाटील, प्रल्हाद पाटील,अंगणवाडी जिल्हा महिला प्रमुख सौ. प्रेमलताताई पाटील, आत्माराम पाटील, नामदेव पाटील, रमेश भराडी, राजू जोगी, गोरख जोगी, ज्ञानेश्वर भराडी, माजी सरपंच राजू बडगुजर, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, मंगल भिल, भगवान पाटील,

जि.प. शाळेचे सर्व शिक्षक, युवा सेनेचे शाखा प्रमुख मनोज पाटील, डी. एन. जाधव सर तसेच परिसरातील भाविक भक्त आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

📌*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*📌 तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर

April 21, 2026

🚌*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप*🚌 *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

April 20, 2026

🔥*दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन*🔥

April 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.