Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Tuesday, April 21
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕*बिलवाडी गावाजवळील पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील*⭕ गावाच्या एकजुटीचे कौतुक; विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा

⭕*बिलवाडी गावाजवळील पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील*⭕ गावाच्या एकजुटीचे कौतुक; विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन उत्साहात संपन्न

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीApril 3, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*बिलवाडी गावाजवळील पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

गावाच्या एकजुटीचे कौतुक; विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन उत्साहात संपन्न

*बिलवाडी / जळगाव/पाळधी प्रतिनिधी दि. 3 एप्रिल – “बिलवाडी गावाने नेहमीच मला भरभरून प्रेम आणि सहकार्य दिले आहे. गावातील ग्रामस्थांची एकजूट ही खरोखरच कौतुकास्पद आहे. गावाजवळील नदीवर पुलाचे काम लवकरच मंजूर करणार असून गावातील चौकाचे सुशोभीकरणही करण्यात येईल. अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ते बिलवाडी येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.*

*या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन*
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय संरक्षण भिंत, दलित वस्तीत सामाजिक सभागृह (बौद्ध विहार) व स्मशानभूमीला संरक्षण भिंतीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच गावांतर्गत काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. कार्यक्रम जल्लोषपूर्ण वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पालकमंत्री यांचे ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे शाल श्रीफळ व बुके देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री.साळुंखे सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख धोंडू जगताप यांनी मानले.

*यांची होती प्रमुख उपस्थिती*
सरपंच दिनोद पाटील, उपसरपंच कविता पाटील, जि. प. सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदू बाबा पाटील, उपजिल्हाप्रमुख रवी कापडणे, ग्रा. पं. सदस्य आबा मिस्तरी, अनिल पाटील, सुपडू गायकवाड, समाधान गुजर, लताबाई पाटील, डॉक्टर भरत पाटील, भगवान पाटील, योगराज गुजर, ह.भ.प. धनराज महाराज, सुधाकर सोनवणे, पोलीस पाटील सुवर्णाताई उमरे, साहेबराव वराडे, सचिन पाटील, बापू थोरात, समाधान बडगुजर, डॉ. सुधाकर पाटील, विजय आमले, राजू पाटील, महेंद्र राजपूत, गोरख पाटील, विश्वनाथ मंडपे, संदीप सुरळकर यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी तसेच बिलवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

📌*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*📌 तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर

April 21, 2026

🚌*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप*🚌 *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

April 20, 2026

🔥*दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन*🔥

April 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.