Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Monday, April 27
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕*मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान – पालकमंत्री गुलाबराव पाटील*⭕ पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हास्तरीय समिती बैठकीत योजनेचा सखोल आढावा
जळगाव जिल्हा

⭕*मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान – पालकमंत्री गुलाबराव पाटील*⭕ पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हास्तरीय समिती बैठकीत योजनेचा सखोल आढावा

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीApril 24, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हास्तरीय समिती बैठकीत योजनेचा सखोल आढावा

*जळगाव, दिनांक 24 एप्रिल (जिमाका): राज्य शासनाची मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी योजना आहे. या योजनेची संबंधित यत्रणांनी जिल्हयात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.*

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात “मुख्यमंत्री बळीराजा, शेतपाणंद, रस्ते, योजना” जिल
जिल्हास्तरीय समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंजुषा घाटगे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यकारी अभियंता संजय राठोड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, जिल्हा नियोजन अधिकारी भरत साळुंखे, सा.बा.चे कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना” केवळ कागदावरची योजना नसून बळीराजाच्या आयुष्यात बदल घडवणारी आहे. त्यामुळे या कामात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असे सांगून त्यांनी पुढे स्पष्ट केले की, रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत अधिकारी वर्गाने विशेष दक्षता घ्यावी आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघात समित्या स्थापन करून स्थानिक आमदारांना विश्वासात घेत कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. “चार चाकी आणि इतर गाड्यांच्या सोयीपेक्षा शेतात जाणाऱ्या बैलांच्या पावलांचा विचार करणारी ही योजना आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे,” असे सांगत त्यांनी योजनेचे महत्त्व अधोरेखित केले. या योजनेची अंमलबजावणी 50 टक्के ग्राम सडक योजना व 50 टक्के जिल्हा परिषद यांनी करावी. योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येक विधानसभा संघ निहाय 14 डिसेंबर, 2025 च्या शासन निर्णयानुसार 25 किलोमीटरचे एक क्लस्टर तयार करुन कामास सुरुवात करण्यात यावी. अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यावेळी म्हणाले, जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी आठवडयातून एक वेळेस या संदर्भात बैठक घेऊन या कामांना गती दयावी. तालुक्यातील आमदारांना संबंधित अधिका-यांनी भेटून त्यांच्या सूचनेप्रमाणे काम सुरु करावे, असे त्यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती घाटगे यांनी यो योजनेबाबत माहितीचे सादरीकरण केले.

मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना सुरू झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात निविदा प्रक्रियेला प्रारंभी अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने काहीसा विलंब झाला. मात्र, नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांमध्ये 9 ठेकेदार पात्र ठरले असून दर कमी करून प्रस्ताव समितीकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला.
याबैठकीत जिल्हयाच्या प्रति तास दरास (एल 1) ला जिल्हयास्तरीय समितीने मान्याता दिली.
**********

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🔶*रक्तदानातून जपली मानवतेची परंपरा” – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिबिर उत्साहात संपन्न*🔶 प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५५ पेक्षा जास्त बाटल्या रक्तसंकलन

April 26, 2026

📌*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*📌 तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर

April 21, 2026

🚌*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप*🚌 *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

April 20, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.