Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Monday, June 1
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव तालुका»⭕*कलीयुगातून तरण्याकरिता भगवंताचे नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन — ह.भ.प. रामेश्वर महाराज*⭕ पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त भव्य अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास उत्साहात प्रारंभ
जळगाव तालुका

⭕*कलीयुगातून तरण्याकरिता भगवंताचे नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन — ह.भ.प. रामेश्वर महाराज*⭕ पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त भव्य अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास उत्साहात प्रारंभ

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीMay 28, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*कलीयुगातून तरण्याकरिता भगवंताचे नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन — ह.भ.प. रामेश्वर महाराज*

पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त भव्य अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास उत्साहात प्रारंभ

*पाळधी /धरणगाव/जळगाव (प्रतिनिधी) 27 मे : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पालधी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास काल अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. जीपीएस ग्रुप व युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या नेतृत्वात व नियोजनाखाली आयोजित या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर हरिनाममय झाला.*

*“कलीयुगातून तरून जाण्याकरिता भगवंताचे नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे,” असे मार्मिक प्रतिपादन ह.भ.प. रामेश्वर महाराज पाळधीकर यांनी आपल्या रसाळ कीर्तनातून केले. नामस्मरणामुळे मन शुद्ध होते, जीवनाला दिशा मिळते आणि भगवंताशी नाते दृढ होते, असे सांगताना त्यांनी संत साहित्य, अभंग आणि संतवचनांच्या माध्यमातून नामभक्तीचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे उलगडून सांगितले. त्यांच्या ओघवत्या वाणीला उपस्थित भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.*

पाळधी येथे उभारण्यात आलेला भव्य मंडप, आधुनिक साऊंड सिस्टिम, आकर्षक व भव्यदिव्य व्यासपीठ तसेच भाविकांसाठी करण्यात आलेल्या सर्व सुखसोयी हे या सप्ताहाचे विशेष आकर्षण ठरत आहे. एकावेळी पाच हजारांहून अधिक भाविक बसू शकतील अशी भव्य व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण परिसरात भक्ती, अध्यात्म आणि संतविचारांचा जागर अनुभवायला मिळत आहे.

या भक्तिमय सोहळ्यास ह.भ.प. ईश्वरलाल महाराज पाळधीकर, ह.भ.प. गजानन महाराज वरसाडेकर, ह.भ.प. गोपाल महाराज दोनगावकर, मृदंग सम्राट ह.भ.प. यज्ञेश महाराज आळंदीकर, गायनाचार्य ह.भ.प. मयूर महाराज तसेच ह.भ.प. परमेश्वर महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात सप्ताहाच्या पहिल्या दिवसाचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पालधी परिसरात सुरू झालेल्या या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहामुळे संपूर्ण पंचक्रोशीत भक्तिरसाची उधळण झाली असून, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

💥*”माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे यांचे प्रतिपादन*💥 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात जल्लोषपूर्ण कीर्तनसेवा

June 1, 2026

🚆*मा ना गुलाबरावजी पाटील यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ,,व प्रतापराव पाटील यांना विधानपरिषद चे उमेदवारी मिळावी या साठी दोनगाव खुर्द च्या ग्रामस्थ यांचे श्री संत गजानन महाराज ला साकडे ,,*🚆

May 31, 2026

🚍*पालकमंत्री यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने दोनगाव ते शेगांव वारी*🚍 ४ लक्झरी गाड्यामधून भाविक शेगांव कडे प्रस्थान

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.