Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Monday, June 1
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»*पाळधी येथे हरिनाम कीर्तन महोत्सवाला भाविकांचा जनसागर; प्रतापराव पाटील यांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक*
जळगाव जिल्हा

*पाळधी येथे हरिनाम कीर्तन महोत्सवाला भाविकांचा जनसागर; प्रतापराव पाटील यांच्या संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक*

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीMay 29, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

यावेळी युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या संवेदनशीलतेचे अत्यंत हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळाले. कीर्तन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्याने एक लहान मुलगी आपल्या कुटुंबापासून हरवली होती. अचानक आई-वडिलांपासून दूर झाल्याने ती घाबरलेली व रडत होती. ही बाब लक्षात येताच प्रतापराव पाटील यांनी तात्काळ त्या मुलीजवळ जाऊन तिला धीर दिला, तिची विचारपूस करत शांत करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांच्या मदतीने त्या मुलीच्या आई-वडिलांचा शोध सुरू केला. काही वेळातच तिच्या पालकांचा शोध घेण्यात यश आले आणि मुलीला सुरक्षितपणे तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या मुलीला सुखरूप पाहून पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
या प्रसंगामुळे उपस्थित भाविकांनी प्रतापराव पाटील यांच्या माणुसकीपूर्ण, संवेदनशील आणि समाजाभिमुख स्वभावाचे भरभरून कौतुक केले. सामाजिक कार्य हे केवळ भाषणांत नसून प्रत्यक्ष कृतीतून दिसून येते, याची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा आली.
सदरच्या या कार्यात जीपीएस मित्र परिवाराचे जेष्ठ सदस्य प्रशांत झंवर यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य करत मुलीच्या पालकांचा शोध घेण्यासाठी मदत केली. त्यांच्या या तत्परतेमुळे एक मोठी चिंता काही क्षणांत दूर झाली आणि कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

💥*”माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे यांचे प्रतिपादन*💥 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात जल्लोषपूर्ण कीर्तनसेवा

June 1, 2026

🚆*मा ना गुलाबरावजी पाटील यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ,,व प्रतापराव पाटील यांना विधानपरिषद चे उमेदवारी मिळावी या साठी दोनगाव खुर्द च्या ग्रामस्थ यांचे श्री संत गजानन महाराज ला साकडे ,,*🚆

May 31, 2026

🚍*पालकमंत्री यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्ताने दोनगाव ते शेगांव वारी*🚍 ४ लक्झरी गाड्यामधून भाविक शेगांव कडे प्रस्थान

May 31, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.