Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Wednesday, June 10
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕*संत आणि शूरवीरांमुळेच महाराष्ट्राची संस्कृती व अस्मिता टिकून आहे – ह.भ.प. संग्राम महाराज भंडारे*⭕ राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात पाचव्या दिवसाची प्रभावी कीर्तन सेवा; मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त विशेष सन्मान
जळगाव जिल्हा

⭕*संत आणि शूरवीरांमुळेच महाराष्ट्राची संस्कृती व अस्मिता टिकून आहे – ह.भ.प. संग्राम महाराज भंडारे*⭕ राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात पाचव्या दिवसाची प्रभावी कीर्तन सेवा; मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त विशेष सन्मान

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीJune 2, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*संत आणि शूरवीरांमुळेच महाराष्ट्राची संस्कृती व अस्मिता टिकून आहे – ह.भ.प. संग्राम महाराज भंडारे*

राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात पाचव्या दिवसाची प्रभावी कीर्तन सेवा;

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त विशेष सन्मान

*पाळधी/धरणगाव जळगाव, दि. १ जून – “संतांनी समाजाला अध्यात्म, सदाचार आणि मानवतेचा मार्ग दिला, तर शूरवीरांनी धर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाचे रक्षण केले. संत आणि शौर्यपरंपरेच्या संस्कारांमुळेच महाराष्ट्राची संस्कृती व अस्मिता आजही तेजस्वी आहे,” असे प्रतिपादन ह.भ.प. संग्राम महाराज भंडारे यांनी केले.*

ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी संतांच्या विचारांतून प्रेरणा घेत स्वराज्याची उभारणी केली. आजच्या नेतृत्वानेही संतविचार, नैतिक मूल्ये आणि लोकसेवेचा आदर्श स्वीकारण्याची गरज आहे.

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा देताना संग्राम महाराजांनी पालकमंत्र्यांच्या संत, संस्कृती आणि समाजकार्याप्रती असलेल्या जिव्हाळ्याचाही गौरवपूर्ण उल्लेख केला.

कीर्तनात त्यांनी संत तुकोबारायांच्या अभंगांतील समाजप्रबोधन, भक्ती आणि मानवतेचा संदेश उलगडून सांगितला. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरेतील प्रेरणादायी संबंधांचेही त्यांनी प्रभावी निरूपण केले. त्यांच्या ओजस्वी वाणीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
यावेळी नामदार गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त ह.भ.प. संग्राम महाराज भंडारे यांनी संत तुकोबारायांची पवित्र पगडी व आळंदी वर्णाचे उपरणे भेट म्हणून
पालकमंत्र्यांच्या वतीने प्रतापराव पाटील यांनी हा सन्मान स्वीकारला.

*यांची होती विशेष उपस्थिती*
या भव्य कीर्तन सोहळ्यासाठी श्री ह.भ.प. गौप्रेमी गजाननजी महाराज वरसाडेकर, ईश्वरलाल जी महाराज पाळधीकर ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर यज्ञेश महाराज माळी, कैलास महाराज पवार, मयूर महाराज दरेकर, परमेश्वर महाराज पारधीकर, निंबा महाराज वाघडूतकर, अनिल महाराज एकलग्नकर, गोपाल महाराज दापूरेकर गोपाल महाराज डोणगावकर जितेंद्र महाराज डोणगावकर सुजित महाराज जळगावकर शशिकांत महाराज भवर खेडेकर यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर महाराज मंडळी उपस्थित होती.

*हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण*

जीपीएस ग्रुप तसेच युवा नेते व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम (विकी बाबा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. भव्य नियोजन, उत्कृष्ट व्यवस्था आणि संतविचारांच्या संगतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.

टाळ-मृदंगाचा निनाद, विठ्ठलनामाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात कीर्तन सेवा उत्साहात संपन्न झाली. हजारो भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला असून या महोत्सवामुळे संपूर्ण पंचक्रोशीत भक्ती, अध्यात्म आणि संतविचारांचा जागर निर्माण झाला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🌳*जळगावच्या केळी उत्पादकांसाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश !*🌳 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी पुढाकार

June 10, 2026

💥*उद्या कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक*💥

June 9, 2026

🌧️*वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या शेती नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश !*🌧️

June 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.