Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, June 11
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»*लोकप्रेमाचा महासागर उसळला…!* 💥*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा विक्रमी वर्षाव*💥 सुमारे दहा तास शुभेच्छा स्वीकारल्या; हजारो कार्यकर्त्यांच्या प्रेमाने पाळधी भगवामय
जळगाव जिल्हा

*लोकप्रेमाचा महासागर उसळला…!* 💥*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा विक्रमी वर्षाव*💥 सुमारे दहा तास शुभेच्छा स्वीकारल्या; हजारो कार्यकर्त्यांच्या प्रेमाने पाळधी भगवामय

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीJune 6, 2026No Comments4 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*लोकप्रेमाचा महासागर उसळला…!*

*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा विक्रमी वर्षाव*

सुमारे दहा तास शुभेच्छा स्वीकारल्या; हजारो कार्यकर्त्यांच्या प्रेमाने पाळधी भगवामय

*पाळधी/धरणगाव जळगाव, दि. ५ जून : राजकारणात अनेक नेते असतात, पण जनतेच्या हृदयावर राज्य करणारे नेते फार थोडे असतात. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेची मुलुखमैदान तोफ गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाळधी येथे लोकप्रेमाचा अक्षरशः महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले.*

जी.पी.एस. कॅम्पस हायस्कूलसमोरील विशाल पटांगणावर सकाळी साडेसात वाजल्यापासूनच शुभेच्छुकांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. दुपार, संध्याकाळ आणि रात्रीपर्यंत सुरू राहिलेल्या या अभिष्टचिंतन सोहळ्यात तब्बल पाच हजारांहून अधिक मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे सलग दहा तास गुलाबभाऊंनी प्रत्येक शुभेच्छुकाला हसतमुखाने भेटत शुभेच्छा स्वीकारल्या.

*हार-तुर्‍यांऐवजी ज्ञानदानाचा अभिनव उपक्रम*
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सामाजिक विचारांची प्रचिती यंदाच्या वाढदिवसालाही आली. हार, फुले आणि दिखाऊ भेटवस्तूंना फाटा देत हजारो शुभेच्छुकांनी ३० हजारांहून अधिक वह्या, शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वस्तू भेट देऊन वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली.

*वाढदिवस आणि पर्यावरण दिनाचा सुंदर संगम*
आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रत्येक शुभेच्छुकाला एक झाड देण्यात आले. “एक झाड… भावी पिढ्यांसाठी जीवनाचा श्वास!” हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. याचवेळी पाळधी परिसरात भव्य *’ऑक्सिजन पार्क’* उभारण्या त येणार असून त्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.. बारा ते पंधरा फूट उंचीची मोठी झाडे लावून भविष्यात हा परिसर हिरवागार करण्याचा संकल्प करण्यात आला.

*दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलींचे वाटप*
वाढदिवसाच्या निमित्ताने समाजहिताचे अनेक उपक्रम राबविण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलींचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

*पुणेरी पगडी, राजस्थानी साफा आणि वारकरी वेशातून सन्मान
शुभेच्छुकांनी गुलाबभाऊंवर प्रेमाचा वर्षाव करत विविध पारंपरिक पद्धतींनी त्यांचा सत्कार केला. कुणी पुणेरी पगडी बांधली, कुणी राजस्थानी साफा चढविला, तर कुणी वारकरी वेश, शाल, श्रीफळ, फेटे आणि गांधी टोपी देऊन सन्मान केला. काहींनी तर हनुमानाची गदा भेट देत त्यांच्या लढवय्या नेतृत्वाचा गौरव केला.*

*भगवामय झाला पाळधीचा परिसर*
सभास्थळ परिसर पूर्णपणे भगवामय झाला होता. सर्वत्र भगवे झेंडे, आकर्षक बॅनर्स, घोषणांचा गजर आणि शिवसैनिकांचा उत्साह पाहून दसरा मेळाव्याची आठवण होत होती.

*लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचे शाहीर संग्राम जोशी व त्यांच्या टीमने गुलाबभाऊ अभिष्टचिंतन दमदार पोवाड्यांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.*

*ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गगनभेदी घोषणांनी वातावरण दणाणून गेले.*

*राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव
उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, शिक्षण मंत्री दादा भुसे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मंत्री सुरेशदादा जैन, आमदार एकनाथ खडसे यांच्यासह राज्यातील अनेक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.*

*यांनी दिल्या प्रत्यक्ष शुभेच्या*
यावेळी उद्योगपती अशोक जैन, आमदार राजूमामा भोळे, आमदार अमोलदादा पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे,आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे, आमदार किशोर आप्पा पाटील, सोनवणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, रावसाहेब पाटील, माजी खासदार उन्मेश पाटील JDCC बँकेचे चेअरमन व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार महिला आघाडीच्या सहसंपर्कप्रमुख सरिता कोल्हे-माळी, शोभाताई चौधरी, उपजिल्हाप्रमुख रवी कापडणे, अनिल भोळे, पी. एम. पाटील, महानगरप्रमुख संतोष पाटील, युवासेना जिल्हाध्यक्ष रोहित कोपटा, भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर महाजन, संजय महाजन, जि.प. सदस्य प्रतापराव पाटील, पवन सोनवणे, गोपाल चौधरी, पाळधीचे सरपंच विजय पाटील, शरद कोळी, माजी सभापती राजेंद्र चव्हाण, डॉ. कमलाकर पाटील, प्रेमराज पाटील, रमेश आप्पा पाटील, अर्जुन पाटील, सचिन पवार, भानुदास विसावे, समाधान चिंचोरे, नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, हर्षल मावळे, आशुतोष पाटील, ॲड. पोकळे , भुसावळ प्र. नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांच्यासह जिल्हाभरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, उपस्थित मान्यवरांच्या मोठ्या संख्येइतकाच सामान्य नागरिकांचा आणि शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभागही या अभिष्टचिंतन सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरला. 🚩

💐 विश्वास, प्रेम आणि नात्यांचा उत्सव
राजकीय शक्तीने गर्दी जमवता येते; पण जनतेच्या मनातील प्रेम विकत घेता येत नाही. पाळधीच्या मैदानावर उसळलेली ही गर्दी कोणत्याही राजकीय समीकरणाची नव्हे, तर जनतेच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाची, आत्मीयतेची आणि प्रेमाची साक्ष होती.
हार संपतील… फुले कोमेजतील… पण जनतेच्या मनात गुलाबभाऊंबद्दल फुललेलं प्रेम कायम ताजंच राहील!
🚩 शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा जसा उत्सव असतो, तसाच पाळधीतील गुलाबभाऊंचा वाढदिवस हा जनतेच्या प्रेमाचा आणि निष्ठेचा महोत्सव ठरला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🌳*जळगावच्या केळी उत्पादकांसाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश !*🌳 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी पुढाकार

June 10, 2026

💥*उद्या कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक*💥

June 9, 2026

🌧️*वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या शेती नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश !*🌧️

June 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.