Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Tuesday, April 21
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *कुंभार समाज कष्टाळू आणि एकजुटीचा त्यांचा विकासासाठी सैंदव कटिबद्ध* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* *धरणगावात संत गोरोबाकाका सामाजिक सभागृहाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील* *यांच्या हस्ते लोकार्पण* *कुंभार समाजासाठी 35 लाखाचा निधी* ⭕
जळगाव जिल्हा

⭕ *कुंभार समाज कष्टाळू आणि एकजुटीचा त्यांचा विकासासाठी सैंदव कटिबद्ध* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* *धरणगावात संत गोरोबाकाका सामाजिक सभागृहाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील* *यांच्या हस्ते लोकार्पण* *कुंभार समाजासाठी 35 लाखाचा निधी* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीNovember 2, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*कुंभार समाज कष्टाळू आणि एकजुटीचा – त्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील*

धरणगावात संत गोरोबाकाका सामाजिक सभागृहाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

कुंभार समाजासाठी ३५ लाखांचा निधी – एकजुटीच्या बळावर साकारले भव्य दिव्य सभागृह

*धरणगाव / जळगाव प्रतिनिधी दि. 1 नोहेंबार – “कुंभार समाज हा मेहनती आणि प्रामाणिक समाज आहे. त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध आहे. धरणगावमध्ये आतापर्यंत अनेक सामजिक सभागृहे मंजूर केली असून त्यातील हे पहिले सभागृह लोकार्पित होत आहे, याचा मला विशेष आनंद आहे. समाज बांधवांनी एकजुटीने काम करावे आणि या सभागृहाचा उपयोग समाजहिताच्या विविध उपक्रमांसाठी करावा.*

पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज धरणगाव येथे कुंभार समाजासाठी बांधण्यात आलेल्या संत गोरोबाकाका सामाजिक सभागृहाचे लोकार्पण भव्य आणि उत्साही वातावरणात पार पडले. या सभागृहासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.

*या प्रसंगी संत शिरोमणी गोरोबाकाका समाज पंच मंडळ, धरणगाव यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंच मंडळाचे अध्यक्ष गोविंद कुंभार, उपाध्यक्ष देविदास कुंभार, सचिव भगवान कुंभार, तसेच सर्व सदस्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार केला.*

सभागृहाचे बांधकाम अत्यंत भव्य आणि आकर्षक स्वरूपात झाले असून, यामुळे कुंभार समाजाला सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांसाठी एक सुसज्ज मंच उपलब्ध झाला आहे. यावेळी चर्मकार समाजाचे भानुदास विसावे कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर कापडे, कैलास माळी सर यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सखाराम मोरे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर काकडे यांनी मानले.

*यांची होती उपस्थिती*
कार्यक्रमास नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामविलास झंवर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर काकडे, उपाध्यक्ष सुभाष पंडित, सचिव सखाराम मोरे, तसेच विलास न्हावकर, घनश्याम , संजय न्हावकर, संतोष काकडे, रविंद्र मोरे, शहर प्रमुख विलास महाजन, माजी गटनेते पप्पू भावे, चर्मकार समाजाचे नेते भानुदास विसावे, कैलास माळी, एड. संजय महाजन, शिरीष बयस, पवन महाजन, वासुदेव चौधरी, विजय महाजन, सुरेश महाजन, माजी नगराध्यक्ष अंजली विसावे, बुटा पाटील, पापा वाघरे, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कुंभार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

📌*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*📌 तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर

April 21, 2026

🚌*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप*🚌 *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

April 20, 2026

🔥*दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन*🔥

April 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.