Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Tuesday, April 21
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕ *औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांचा हिताला प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील* ⭕ ⭕ *पालकमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जमीन मोजणीला हिरवा कंदील* ⭕
जळगाव जिल्हा

⭕ *औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांचा हिताला प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील* ⭕ ⭕ *पालकमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जमीन मोजणीला हिरवा कंदील* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीDecember 7, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य !* – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे जमीन मोजणीला हिरवा कंदील

*जळगाव, दि. ६ डिसेंबर : जळगाव तालुक्यात नव्या एमआयडीसी उभारणीसाठी जमीन मोजणीला शेतकरी बांधवांनी सकारात्मक संमती दर्शवली आहे. “विकासाच्या नावाखाली कोणाच्याही हक्काचा तडजोड होऊ देणार नाही. जमिनीच्या मोबदल्यात प्रत्येक शेतकऱ्याला योग्य, समाधानकारक आणि कायदेशीर भरपाई मिळाल्याशिवाय कोणतीही प्रक्रिया पुढे जाणार नाही, असा ठाम विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.*

जळगाव तालुक्यातील मौजे पिंपळे, चिंचोली आणि कुसुंबे या गावांत नवीन औद्योगिक वसाहत उभारणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री व जिल्हा महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

पालकमंत्री पाटील म्हणाले की,
जळगावच्या औद्योगिक विकासाबरोबरच शेतमालाला नवे बाजार, तरुणांना रोजगार आणि परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास हा शासनाचा उद्देश आहे. शेतकऱ्यांच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य देतच पुढील निर्णय घेण्यात येतील. तुमच्या हक्काचा प्रत्येक पैसा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या आश्वासक, सकारात्मक आणि ठाम भूमिकेमुळे शेतकरी बांधवांनी मोजणीस तत्पर सहकार्याची ग्वाही दिली.

*जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हिताला जिल्हा प्रशासनाचे नेहमीचं प्राधान्य आहे. शेत व जागेची मोजणी झाल्यानंतर दर मंजुरीची पुढील कार्यवाही करण्यात येईल. नव्या औद्योगिक वसाहतीमुळे जळगाव जिल्ह्यात रोजगार, गुंतवणूक आणि आर्थिक मूल्यवर्धनासाठी नवे मार्ग खुले होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.*

मोजणी दरम्यान शेतीच्या अचूक हद्दींची पडताळणी होवुन झाडे, सिंचन सुविधा व पिकस्थिती नोंदी ही संपूर्ण माहिती संकलित करून सर्वंकष अहवाल उद्योगमंत्री व एमआयडीसीच्या सचिवांसमोर सादर केला जाईल. त्यानंतरच अंतिम निर्णय होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

*बैठकीस मान्यवरांची उपस्थिती*
बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, प्रांताधिकारी विनय गोसावी, MIDC चे
प्रादेशिक अधिकारी श्री. घाटे, चिंचोली, पिंपळे आणि कुसुंबे येथील शेतकरी बांधव, भूसंपादन अधिकारी व वकील बांधव उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

📌*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*📌 तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर

April 21, 2026

🚌*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप*🚌 *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

April 20, 2026

🔥*दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन*🔥

April 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.