Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Tuesday, April 21
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»गाव तिथे विकास, शेतरस्त्यांना प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील* चावलखेडा–पष्टाने रस्ता ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान ; विकास कामांचा झंजावात
जळगाव जिल्हा

गाव तिथे विकास, शेतरस्त्यांना प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील* चावलखेडा–पष्टाने रस्ता ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान ; विकास कामांचा झंजावात

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीJanuary 24, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*गाव तिथे विकास, शेतरस्त्यांना प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

चावलखेडा–पष्टाने रस्ता ठरणार शेतकऱ्यांसाठी वरदान ; विकास कामांचा झंजावात

*पाळधी / जळगाव प्रतिनिधी – ‘गाव तिथे विकास’ हेच आपले ध्येय आहे. आगामी काळात शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शेतरस्त्यांवर विशेष भर दिला जाणार असून, मी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. चावलखेडा – पष्टाने बु. रस्ता हा शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार असून, या रस्त्याचे काम दर्जेदार व टिकाऊ पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होऊन शेतकऱ्यांचा वेळ, खर्च आणि श्रम वाचतील. गावाचा विकास हा गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे तो अधिक वेगाने घडतो. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ग्रामस्थांनी अशीच एकजूट कायम ठेवावी,” असे आवाहनही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.*

धरणगाव तालुक्यातील चावलखेडा–पष्टाने बु. या ६ किमी रस्त्याचे दर्जोन्नती करून खडीकरण व डांबरीकरण; यात १७ ठिकाणी पाईप व काँक्रीट मोऱ्या तसेच २०० मीटरचे गावाजवळ काँक्रीटीकरण होणार आहे (३ कोटी ५३ लक्ष), तसेच चिंचपूरा – वराड रस्ता डांबरीकरण (अंतिम टप्पा) 2 किमी – ६० लक्ष, वराड बु., एकलगन, वराड खु. येथे गावांतर्गत काँक्रीटीकरण प्रत्येकी १० लक्ष, चिंचपुरा स्मशानभूमी संरक्षण भिंत – १० लक्ष या कामांचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन माजी सभापती अनिल पाटील व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते तथा जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी केले तर आभार तालुका प्रमुख डी.ओ.पाटील यांनी मानले. महिलांच्या औक्षणाने व फटाक्यांच्या जल्लोषात व ढोल-ताशांच्या गजरात, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रत्येक गावात भव्य स्वागत करण्यात आले. गावागावातून पायी मिरवणूक काढण्यात आली.

या प्रसंगी तालुका प्रमुख डी. ओ. पाटील, माजी सभापती अनिल पाटील, मुकुंदराव नन्नवरे, सचिन पवार माजी जि.प. सदस्य गोपाळ चौधरी, भाजपचे माजी जि.प. उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील, माजी पंचायत समिती सभापती अनिल पाटील, नायब तहसीलदार लक्षमण सातपुते, गट विकास अधिकारी के. व्ही. वानखेडे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता जितेंद्र सोनवणे, शाखा अभियंता विशाल पाटील, कृ.उ.बा. समिती सभापती प्रेमराज पाटील, विभाग प्रमुख टिकाराम पाटील, सोमनाथ पाटील, मंगलअन्ना पाटील निर्दोष पवार, शिवसेना तालुका संघटक रवींद्र चव्हाण, या भागातील सरपंच कैलास पाटील,राजू पाटील, सचिन पाटील, शाखा प्रमुख भीमराव पाटील, यांच्यासह शिवसेना, युवासेना, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

📌*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*📌 तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर

April 21, 2026

🚌*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप*🚌 *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

April 20, 2026

🔥*दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन*🔥

April 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.