Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Saturday, June 13
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕*RTE मधील १ किमी हवाई अंतराची जाचक अट हायकोर्टाकडून रद्द!*⭕ *सामाजिक कार्यकर्ते किरण माळी यांच्या निवेदनासह संघर्षाला मोठे यश; लाखो विद्यार्थ्यांना दिलासा*
जळगाव जिल्हा

⭕*RTE मधील १ किमी हवाई अंतराची जाचक अट हायकोर्टाकडून रद्द!*⭕ *सामाजिक कार्यकर्ते किरण माळी यांच्या निवेदनासह संघर्षाला मोठे यश; लाखो विद्यार्थ्यांना दिलासा*

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीMarch 10, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*RTE मधील १ किमी हवाई अंतराची जाचक अट हायकोर्टाकडून रद्द!*

*_​सामाजिक कार्यकर्ते किरण माळी यांच्या निवेदनासह संघर्षाला मोठे यश; लाखो विद्यार्थ्यांना दिलासा._*

​पाळधी /धरणगाव (प्रतिनिधी):
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) २५% मोफत प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने लादलेली शाळेपासून घराच्या १ किलोमीटर हवाई अंतराची जाचक अट नागपूर खंडपीठाने रद्द ठरवली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला असून, सामाजिक कार्यकर्ते किरण आनंदा माळी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
*​काय होता नेमका वाद*
राज्य सरकारने यावर्षी आर.टी.ई. नियमांत बदल करून घरापासून शाळेचे अंतर ३ किलोमीटरऐवजी १ किलोमीटर केले होते. तसेच नोंदणीकृत भाडेकराराची सक्ती केली होती. या अटींमुळे अनेक ग्रामीण आणि शहरातील गरीब मुले प्रवेशापासून वंचित राहत होती. या अन्यायाविरोधात सामाजिक कार्यकर्ते किरण माळी यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री ना. दादा भुसे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना वारंवार निवेदने देऊन ही अट रद्द करण्याची मागणी लावून धरली होती.
​१० पेक्षा अधिक वृत्तपत्रांनी घेतली होती दखल
या विषयाचे गांभीर्य ओळखून पुण्यनगरी, सकाळ, दिव्य मराठी, सनातन प्रभात, देशोन्नती यांसह १० पेक्षा अधिक प्रमुख वृत्तपत्रांनी किरण माळी यांच्या मागणीची दखल घेत वृत्त प्रसिद्ध केले होते. सोशल मीडियावरही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला जाब विचारला होता. अखेर न्यायदेवतेने या प्रकरणाची गंभीर दखल घेत १ किमीची अट रद्द करून गरिबांच्या मुलांना न्याय दिला आहे.
_​”हा विजय माझा एकट्याचा नसून राज्यातील त्या प्रत्येक गरीब विद्यार्थ्याचा आणि पालकाचा आहे, ज्यांच्या शिक्षणासाठी आम्ही लढा दिला._ _१० मार्च ही अंतिम मुदत असताना न्यायालयाने दिलेला हा निर्णय लोकशाहीचा विजय आहे.”_
— किरण आनंदा माळी (सामाजिक कार्यकर्ते)
​आता या निर्णयामुळे आर.टी.ई. प्रवेशासाठी पुन्हा एकदा ३ किलोमीटर अंतराची मर्यादा लागू होणार असून, यामुळे पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🌧️*घाईची पेरणी टाळा; समाधानकारक पाऊसानंतरच खरीप हंगामाला सुरुवात करा !🌧️* भविष्यातील दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शेतकऱ्यांना कळकळीचे आवाहन

June 13, 2026

🌳*जळगावच्या केळी उत्पादकांसाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश !*🌳 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई साठी पुढाकार

June 10, 2026

💥*उद्या कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक*💥

June 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.