Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Saturday, June 13
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»धरणगाव»पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या पर्यटन विभागाच्या शासकीय कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळल्याने तब्बल ७ कामगार जखमी झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर 💥*मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आले मदतीला धावून*💥
धरणगाव

पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या पर्यटन विभागाच्या शासकीय कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळल्याने तब्बल ७ कामगार जखमी झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर 💥*मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आले मदतीला धावून*💥

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीMarch 16, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव प्रतिनिधी : धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या पर्यटन विभागाच्या शासकीय कामादरम्यान मोठी दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळल्याने तब्बल ७ कामगार जखमी झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसराचा पर्यटन विकास प्रकल्प पर्यटन विभागामार्फत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून राबवला जात आहे. गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी बांधकामाचे काम सुरू आहे. मात्र आज काम सुरू असतानाच अचानक बांधकामाचा स्लॅब कोसळल्याने कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला.
या दुर्घटनेत ७ कामगार जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापैकी २ कामगारांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कामगारांना कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेले सेफ्टी शूज, हेल्मेट यांसारखी सुरक्षा साधने देण्यात आली होती का, तसेच कामगारांचा विमा काढण्यात आला होता का, याबाबतही आता चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली, बांधकामात हलगर्जीपणा झाला का, याबाबत प्रशासनाकडून चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

*लोकप्रेमाचा महासागर उसळला…!* 💥*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा विक्रमी वर्षाव*💥 सुमारे दहा तास शुभेच्छा स्वीकारल्या; हजारो कार्यकर्त्यांच्या प्रेमाने पाळधी भगवामय

June 6, 2026

💥*आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस; विविध लोकोपयोगी उपक्रमांसह पाळधी येथील गांधी चौकात जाहीर सभेचे आयोजन*💥 🚩शिवसेना नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहणार उपस्थिती🚩

June 4, 2026

🚩*पाळधीला लाभले पंढरपूरचे स्वरूप; हरिनामाच्या गजराने दुमदुमली संपूर्ण पंचक्रोशी*🚩 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची भक्तिमय सांगता; ७० ते ८० कीर्तनकार-प्रवचनकारांची उपस्थिती, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.