Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Friday, July 17
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»✒️जळगाव ग्रामीण मतदारसंघातील SIR मोहिमेच्या अंतिम टप्प्यासाठी BLA बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन✒️ *”BLO सोबत खांद्याला खांदा लावून काम करा; लोकशाहीच्या सेवेसाठी सज्ज व्हा” – पालकमंत्री गुलाबराव पाटील* BLA यांना मानधनाचे वितरण; दिलेला शब्द पाळत कार्यकर्त्यांचा केला सन्मान
जळगाव जिल्हा

✒️जळगाव ग्रामीण मतदारसंघातील SIR मोहिमेच्या अंतिम टप्प्यासाठी BLA बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन✒️ *”BLO सोबत खांद्याला खांदा लावून काम करा; लोकशाहीच्या सेवेसाठी सज्ज व्हा” – पालकमंत्री गुलाबराव पाटील* BLA यांना मानधनाचे वितरण; दिलेला शब्द पाळत कार्यकर्त्यांचा केला सन्मान

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीJuly 4, 2026No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील SIR मोहिमेच्या अंतिम टप्प्यासाठी BLA बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन

*”BLO सोबत खांद्याला खांदा लावून काम करा; लोकशाहीच्या सेवेसाठी सज्ज व्हा” – पालकमंत्री गुलाबराव पाटील*

BLA यांना मानधनाचे वितरण; दिलेला शब्द पाळत कार्यकर्त्यांचा केला सन्मान

*पाळधी/धरणगाव, दि. ४ जुलै : “BLA हा प्रत्येक बूथचा किल्लेदार आणि समन्वयक आहे. विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेच्या अंतिम टप्प्यात BLO सोबत खांद्याला खांदा लावून गांभीर्याने काम करा आणि लोकशाहीच्या सेवेसाठी सज्ज व्हा. राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राज्यातील दीड लाखांहून अधिक शिवसेनेच्या BLA कार्यकर्त्यांचा विमा उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक BLA ने सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी,” असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.*

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील सुगोकी रिसॉर्ट येथे जळगाव ग्रामीण मतदारसंघातील विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेच्या अंतिम टप्प्यानिमित्त आयोजित शिवसेनेच्या BLA कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील नियोजन स्पष्ट करत जळगाव ग्रामीण मतदारसंघातील BLA यांना मानधनाचे वितरण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

बैठकीत मोहिमेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अंतिम टप्प्यातील नियोजन, BLO व BLA यांच्यातील समन्वय, घरभेटी, नवमतदार नोंदणी, स्थलांतरित नागरिकांशी संपर्क तसेच प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक कार्यपद्धतीबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले.

*यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा Enumeration Form (EF) भरून डिजीटाईझ करण्यात आला.*

तसेच,स्विय सहायक श्री. प्रथमेश मोहोड यांनी पुढील टप्प्यातील BLA यांची भूमिका, जबाबदाऱ्या व कर्तव्ये याबाबत सविस्तर मार्गदर्शन करत सादरीकरण (Presentation) केले. जळगाव जिल्ह्यात SIR मोहिमेच्या अंमलबजावणीत जळगाव ग्रामीण मतदारसंघ तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती त्यांनी दिली.

*मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “आतापर्यंत मॅपिंगचे काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले असून आता प्रत्यक्ष घरभेटींचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. घर बंद असल्यास पुन्हा भेट द्या, बाहेरगावी असलेल्या नागरिकांशी संपर्क साधा, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, स्थलांतरित महिला आणि नवमतदारांपर्यंत स्वतःहून पोहोचा. प्रत्येक BLA ने BLO सोबत समन्वय राखून प्रत्यक्ष पडताळणीनंतरच माहिती नोंदवावी. अचूक मतदार यादी हीच सक्षम लोकशाहीची खरी ताकद आहे.*

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मागील बैठकीत दिलेला शब्द पाळत जळगाव ग्रामीण मतदारसंघातील BLA यांना मानधनाचे वितरण केले. विशेष मतदारयादी पुनरावलोकन मोहिमेत जबाबदारीने व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पाळत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यशैलीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवानेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जळगाव तालुकाप्रमुख शिवराज पाटील यांनी केले, तर आभार धरणगाव तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील यांनी मानले.

*यांची होती उपस्थिती*
यावेळी युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती नंदलाल पाटील, अनिल पाटील, सचिन पवार, रमेश दूध संघाचे संचालक रमेश (आप्पा) पाटील, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, शिवराज पाटील, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सर्व BLA, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🟣🟣*विठू माऊलीच्या चरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे साकडे; ‘बळीराजा, वारकरी आणि सर्वसामान्य जनतेवर कृपादृष्टी राहू दे’*🟣🟣

July 17, 2026

💥*घरोघर पोहोचली मतदार जागर; पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ‘एसआयआर’ मोहिमेला गती*💥 पाळधी परिसरातील विशेष शिबिरांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट; *१६ जुलैच्या विशेष शिबिरात नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह सहभागी व्हावे – युवा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे आवाहन*

July 15, 2026

🟣🟣⭕*’माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला पाळधी बु.मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद*⭕🟣🟣 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आरोग्य महाशिबिर; शेकडो नागरिकांची मोफत तपासणी, उपचार व आरोग्य मार्गदर्शन

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.