Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Wednesday, February 25
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»राजकारण»⭕ *जळगाव उबाठातील युवा नेतृत्वाचा शिवसेनेत प्रवेश* *महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात इंनकमिंग ला वेग* ⭕
राजकारण

⭕ *जळगाव उबाठातील युवा नेतृत्वाचा शिवसेनेत प्रवेश* *महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात इंनकमिंग ला वेग* ⭕

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीNovember 16, 2025No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*जळगावात उबाठातील युवा नेतृत्वाचा शिवसेनेत प्रवेश !*

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात ‘इनकमींग’ ला वेग

*जळगाव प्रतिनिधी | 15 नोव्हेंबर – राज्यात महानगरपालिका निवडणुकांची चाहूल लागलेल्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) मध्ये तरुणांचे प्रवेशाचे सत्र वेग घेत आहे. उबाठा व जळगाव शहरातील महत्त्वाच्या युवा पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत अधिकृत प्रवेश केला. परिसरातील विकासकामांची गती, मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्णयक्षम नेतृत्व आणि तरुणांचा वाढता सहभाग यामुळे नव्या नेतृत्वाचा ओढा शिवसेनेत लक्षणीय वाढताना दिसत आहे.*

*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन*
कार्यक्रमात बोलताना राज्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, गेल्या चार – पाच वर्षांत आम्ही जळगाव शहराला विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला असला तरी अजूनही अनेक कामे प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांनी अठरा तास काम करणारा, निर्णयक्षम आणि जनतेशी दांडगा जनसंपर्क ठेवणारा असा लौकिक निर्माण केला. नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची खरी परीक्षा आता जवळ आली आहे. शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण सर्वसामान्यांची लहान – मोठी कामे प्रामाणिकपणे करा, पाय जमिनीवर ठेवा, संयम बाळगा आणि सेवेकरी बना. युती होवो अथवा न होवो, आपण लढण्यासाठी सदैव तयार राहा असा मोलाचा सल्ला देत एकच नेता – बाळासाहेब, एकच झेंडा – भगवा झेंडा, आणि एकच विचार – देशप्रेम असून जळगावच्या विकासासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शिंदे साहेबांनी घेतलेले निर्णय हे ऐतिहासिक ठरले आहेत. त्यामुळेच आज तरुण, महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे हे होते

*शिवबंधन बांधून झालेले प्रवेश*
पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून प्रवेश करणाऱ्यांमध्ये
उबाठा युवा सेना महागर प्रमुख यश सपकाळे, शहर प्रमुख गजानन कोळी, रवींद्र सोनवणे, डॉ. सपना प्रशांत मोरे, डॉ. प्रशांत मोरे, मागासवर्गीय महानगर प्रमुख ncp शरद पवार गट नितीन मोरे, मेहरूण सरपंच नलुबाई सोनवणे, रवींद्र सोनवणे, अरुण राऊत, महेंद्र सोनवणे, चेतन ठाकरे यांच्यासह शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.

जिल्हाप्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे म्हणाले की, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या वचनांची वचनपूर्ती करून जळगाव शहरासाठी DPDC योजनेतून कोट्यवधींचा निधी मिळवून दिला. शहराच्या मूलभूत सुविधांच्या उभारणीत हा निधी ऐतिहासिक ठरला आहे. आजचा प्रवेश हा केवळ राजकीय घटना नसून जळगावच्या विकासावर तरुणांनी दाखवलेल्या विश्वासाचा मजबूत ठसा असल्याचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले.

*यांची होती प्रमूख उपस्थिती*
कार्यक्रम स्थळी उत्साही घोषणा, भगवे झेंडे आणि शिवसेनेच्या जयजयकारांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मान्यवर महानगरप्रमुख व माजी नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, संतोष सोनवणे, संतोष पाटील,माजी नगरसेवक अण्णा भापसे, गजानन देशमुख, नवनाथ दारकुंडे, एड. दिलीप पोकळे, चेतन सनकट, युवा सेनेचे विस्तारक किशोर भोसले, युवासेनेचे जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, उप जिल्हाप्रमुख स्वप्निल परदेशी, मनोज अहुजा, आशुतोष पाटील, शंतनू नारखेडे, अजय देशमुख, विकी भापसे, सुरेश भापसे, कृ.ऊ. बा. संचालक कमलेश सपकाळे, अमोल मोरे, सचिन पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक गणेश सोनवणे आणि कुंदन काळे यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

⭕ *जिल्ह्यातील ३७१ गावांना आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण मंजूर ..* ⭕ ⭕ *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण निर्णय* ⭕

December 6, 2025

💥 *विकासाच्या बळावर नशिराबाद नगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकणार* *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा ठाम विश्वास* *राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा पंकज महाजन ,लीना महाजन व कैलास व्यवहारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश* 💥

November 10, 2025

💥 *मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विकासकार्यातून तरुणाईचा भगव्या वर विश्वास* *राष्ट्रवादी – उ बा ठा ला जळगाव ग्रामीण मध्ये खिंडार* 🔥

November 8, 2025
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.