
*पाळधी शहरातील क्रॉंकिटीकरणं रस्त्यांचे ते आठवडे बाजारामधील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण*
*वाहतुकीची कोंडी टळणार असल्याने नागरिकांना दिलासा*
*पाळधीची विकासाकडे वाटचाल*
*ना.गुलाबराव पाटील यांच्या निधीतून*
पाळधी बु व पाळधी खु येथील मुख्य रस्ता म्हणजे पाळधी बाजार पेठ ते सावदा चौफुली व डॉ व्ही के चौधरी यांच्या दवाखान्यापासून ते शनिंनगर पर्यत हा मुख्य रस्ता ना गुलाबरावजी पाटील मार्गदर्शनाने व मा.जिल्हा परिषद सदस्य युवानेते प्रतापराव पाटील प्रयत्नांनी मुख्य रस्ते काँक्रीटीकरण पूर्ण करून रहदारी साठी मार्ग मोकळा करण्यात आले आहे या मध्ये पाळधी बाजर पेठ येथील काँक्रीटीकरण झाल्या मुळे सर्व प्रकारचे व्यापारिवर्गात आनंद उत्साव्हाचे वातावरण पसरले आहे
यात प्रामुख्याने हे काँक्रीटीकरण चे कामे न नफा व तोटा या तत्वावर संमधीत ठेकेदार यांच्या कडून करून घेतले आहे या साठी मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी स्वतः त्या ठिकाणी उभे राहून काम पूर्ण करून घेतले आहे
पाळधी खु येथील डॉ व्ही के चौधरी यांच्या दवाखान्या पासून ते शनिनगर पर्यत जो रस्ता झाला असून आजूबाजूचे खेडे गावातील शेतकरी,छोटे मोठे व्यापारी व शाळेत येणाऱ्या विद्यार्थी मित्रा मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे या बद्दल पाळधी बु व खु व आजूबाजूचे खेड्यातील रहिवासी यांनी ना.गुलाबरावजी पाटील व प्रतापराव पाटील यांचे आभार आणले आहे सदर काँक्रीटीकरनाचा लागणारा निधी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी उपलब्ध करून दिला त्या बद्दल त्यांचे आभार….