Close Menu
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Friday, July 17
Facebook X (Twitter) Instagram
Jalgaon Janmat
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव तालुका
  • धरणगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
Jalgaon Janmat
Home»जळगाव जिल्हा»⭕*बहिणाबाईंचे जीवनतत्त्वज्ञान भावी पिढीसाठी प्रेरणेचे विद्यापीठ : पालकमंत्री गुलाबराव पाटील*⭕ बहिणाबाईंच्या जीवनचरित्रावरील संशोधन, शेती व विशेषतः केळी संशोधनाशी संबंधित उपक्रमांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य; विद्यापीठातील अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि अत्याधुनिक सभागृहाचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

⭕*बहिणाबाईंचे जीवनतत्त्वज्ञान भावी पिढीसाठी प्रेरणेचे विद्यापीठ : पालकमंत्री गुलाबराव पाटील*⭕ बहिणाबाईंच्या जीवनचरित्रावरील संशोधन, शेती व विशेषतः केळी संशोधनाशी संबंधित उपक्रमांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य; विद्यापीठातील अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि अत्याधुनिक सभागृहाचे उद्घाटन

संपादक : प्रशांत झवर | आबा माळीBy संपादक : प्रशांत झवर | आबा माळीJuly 6, 2026No Comments4 Mins Read
WhatsApp Facebook Twitter
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

*बहिणाबाईंचे जीवनतत्त्वज्ञान भावी पिढीसाठी प्रेरणेचे विद्यापीठ : पालकमंत्री गुलाबराव पाटील*

बहिणाबाईंच्या जीवनचरित्रावरील संशोधन, शेती व विशेषतः केळी संशोधनाशी संबंधित उपक्रमांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य; विद्यापीठातील अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि अत्याधुनिक सभागृहाचे उद्घाटन

*जळगाव, दि. ५ जुलै : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच ए.पी.जे. अब्दुल कलाम भवनातील अत्याधुनिक सुसज्ज सभागृहाचे उद्घाटन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रविवारी (दि. ५ जुलै) संपन्न झाले. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय एल. माहेश्वरी होते.*

यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, विद्यापीठ सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन, महापौर दीपमाला काळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, नितीन झाल्टे, ॲड. अमोल पाटील, प्रा. सुरेखा पालवे, प्रा. पवित्रा पाटील, अधिष्ठाता प्रा. जगदीश पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी रवींद्र पाटील, अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

*उद्घाटकीय भाषणात पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जीवन आणि साहित्य संपूर्ण समाजाला दिशा देणारे असून विद्यापीठात उभारण्यात आलेला हा अर्धाकृती पुतळा केवळ स्मारक नसून भावी पिढीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरेल. बहिणाबाईंचे जीवनतत्त्वज्ञान हेच एक प्रेरणेचे विद्यापीठ आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनसंघर्षाची, विचारांची आणि साहित्याची प्रेरणा या स्मारकातून सातत्याने मिळत राहील. यावेळी त्यांनी बहिणाबाईंची प्रसिद्ध कविता “माझी माय सरस्वती माले शिकवते बोली” सादर करत मातृभाषा, शिक्षण आणि संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले.*

यावेळी त्यांनी विद्यापीठात ‘बाळासाहेब ठाकरे सेंटर फॉर एक्सलन्स’ उभारण्यासाठी शासन स्तरावरून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थी वसतिगृहाची इमारत विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. बहिणाबाईंच्या जीवनचरित्रावरील संशोधन, शेती तसेच विशेषतः केळी संशोधनाशी संबंधित उपक्रमांना शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेला बहिणाबाईंचा पुतळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल. खानदेशातील बोलीभाषा समृद्ध असून तिच्याविषयी न्यूनगंड बाळगण्याची आवश्यकता नाही. उलट खानदेशातील विविध बोलीभाषांवर संशोधन होऊन त्यांचे संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठ सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी बहिणाबाईंच्या साहित्याचा जागतिक स्तरावर प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी जैन इरिगेशनच्या बहिणाबाई ट्रस्ट आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे सांगितले. बहिणाबाईंच्या कविता अधिकाधिक भाषांमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मनोगत व्यक्त करताना बहिणाबाईंच्या जीवनातून प्रतिभेला कोणत्याही सामाजिक किंवा शैक्षणिक मर्यादा अडथळा ठरू शकत नाही, हा महत्त्वपूर्ण संदेश मिळतो, असे सांगितले. अहिराणी आणि लेवा यांसारख्या स्थानिक बोलीभाषांचे संवर्धन अत्यावश्यक असून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अहिराणी भाषेच्या भाषांतराची सुविधा विकसित करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

सामाजिक कार्यकर्ते किशोर चौधरी यांनी बहिणाबाईंच्या कविता त्यांच्या मूळ बोलीभाषेतच जतन होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांच्या साहित्याचे आधुनिकीकरण करताना मूळ भाषेचे सौंदर्य आणि वैशिष्ट्य अबाधित राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठात उभारण्यात आलेले हे स्मारक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे ठरेल, असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू प्रा. विजय एल. माहेश्वरी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून बहिणाबाईंच्या अर्धाकृती पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे तसेच समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानले. बहिणाबाईंच्या कविता या अनुभवातून जन्माला आलेल्या असून डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही त्यांचे जीवनतत्त्वज्ञान विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित मार्गदर्शन करणारे आहे. या पुतळ्यामुळे विद्यार्थ्यांना बहिणाबाईंच्या कार्याची नव्याने ओळख होऊन त्यातून प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी ‘केळी निर्यात व्यवस्थापन’ या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विद्यापीठाच्या सिलेज प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात आलेल्या ‘सिलेज निट्रो बॅक’ आणि ‘सिलेज ब्ल्यूटी’ या उत्पादनांच्या माहितीपत्रकांचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमात विद्यापीठ आणि आयआयटी चेन्नई यांच्यात झालेल्या कराराअंतर्गत विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रशिक्षण अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी बहिणाबाई चौधरी अर्धाकृती पुतळा उभारणीसाठी कार्यरत विद्यापीठस्तरीय समितीचे अध्यक्ष व सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये समितीचे अध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, प्रा. व. पू. होले, किशोर चौधरी, आर्किटेक्ट नितीन पारगावकर, मूर्तिकार दीपक थोपटे, यशवंत गरुड आणि अभियंता राहुल पाटील यांचा समावेश होता. तसेच ए.पी.जे. अब्दुल कलाम भवनातील सभागृह उभारणीमध्ये योगदान दिल्याबद्दल अभियंता एस. आर. पाटील, आर्किटेक्ट योगेंद्र गुजराथी, अभियंता बी. डी. पाटील, अभियंता सुनील नेमाडे, कंत्राटदार राकेश पाटील आणि अमर कासट यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन खेमराज पाटील आणि प्रा. वीणा महाजन यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले.

या समारंभास अधिसभा सदस्य दीपक पाटील, नितीन ठाकूर, केदारनाथ कवडीवाले, प्रा. एच. एम. पाटील यांच्यासह अधिसभा, विद्या परिषद व विविध प्राधिकरणांचे सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
  • Website

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

Related Posts

🟣🟣*विठू माऊलीच्या चरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे साकडे; ‘बळीराजा, वारकरी आणि सर्वसामान्य जनतेवर कृपादृष्टी राहू दे’*🟣🟣

July 17, 2026

💥*घरोघर पोहोचली मतदार जागर; पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने ‘एसआयआर’ मोहिमेला गती*💥 पाळधी परिसरातील विशेष शिबिरांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट; *१६ जुलैच्या विशेष शिबिरात नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह सहभागी व्हावे – युवा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे आवाहन*

July 15, 2026

🟣🟣⭕*’माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाला पाळधी बु.मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद*⭕🟣🟣 पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आरोग्य महाशिबिर; शेकडो नागरिकांची मोफत तपासणी, उपचार व आरोग्य मार्गदर्शन

July 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 Jalgaon Janmat. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.