*धरणगाव तालुक्यात ठाकरे गटाला मोठा धक्का …* धरणगाव तालुक्यातील गारखेडा येथील माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व माजी सरपंच किशोर प्रताप पाटील यांचा आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील व मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत पाळधी येथील पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या निवासस्थानी प्रवेश सोहळा संपन्न झाला असून जगन महाजन माळी समाज अध्यक्ष , कमलाकर कांशीराम पाटील, जिजाबराव वामन पाटील, गोटू भिवसन पाटील, बाळकृष्ण प्रताप पाटील , विकास सोसायटी चेअरमन संजय मुरलीधर पाटील, भावेश पाटील, योगेश पाटील, महेश पाटील यांच्या प्रवेश सोहळा संपन्न झाला असून या वेळी उपस्थित मध्ये मा.सभापती सचिन पवार, तालुका अध्यक्ष दीपक भदाणे…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार* एरंडोल येथे आदिवासी विकास प्रकल्पाचे उपकार्यालय सुरू होण्यास राज्यस्तरीय बैठकीत मान्यता *पाळधी / जळगाव | प्रतिनिधी दि. 21 फेब्रुवारी – जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसाठी दिलासादायक व महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे उपकार्यालय एरंडोल येथे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. काल जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम २०२६–२७ अंतर्गत आदिवासी विकास विभागाचे मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ही मागणी ठामपणे मांडली होती. त्यास अनुसरून एरंडोल येथे उपकार्यालय सुरू करण्यास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मान्यता…
एकजुटीतूनच खरा विकास; बोरनारला विकासकामांची भेट *ग्रामपंचायत म्हणजे गावाच्या निर्णयशक्तीचे केंद्र – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय, सामाजिक सभागृह, भक्तनिवास व हॉलचे लोकार्पण *बोरनार / पाळधी / जळगाव प्रतिनिधी | दि. २१ फेब्रुवारी – ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे गावाच्या निर्णयशक्तीचे केंद्र आहे. सामाजिक सभागृह व भक्तनिवास या सुविधा म्हणजे गावाच्या संस्कृतीची ओळख आहेत. गावाला मिळालेल्या विकास निधीसोबत गाव एकत्र राहिले तरच खरा विकास होतो. राजकारण येईल-जाईल; पण गावाची एकजूट टिकली पाहिजे. बोरनार गावाने एकोप्याने पुढे जाऊन इतर गावांसाठी आदर्श ठरावे. परमेश्वराच्या अधिष्ठानाशिवाय माणूस मोठा होत नाही. कितीही मोठ्या पदावर गेलो तरी नम्रता, संस्कार आणि देवावर विश्वास…
*“छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे श्वास आणि प्राण !”* *पालकमंत्री गुलाबराव पाटील* जिल्हा प्रशासन व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती यांच्या वतीने आयोजित शहरातील मुख्य कार्यक्रमात, शिवरायांच्या विचारांवर पालकमंत्र्यांचे भावनिक प्रतिपादन *जळगाव प्रतिनिधी दिनांक 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा, विचारांचा आणि आदर्शांचा गौरव करताना, पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे प्राण आणि श्वास आहेत. शिवरायांचा इतिहास फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी आहे,” असे भावनिक प्रतिपादन पालकमंत्र्यानी केले. जिल्हा प्रशासन व जळगाव शहर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.* या…
*जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद* 1060 रुग्णांची नोंदणी; 510 रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया पाळधी (ता. धरणगाव) | मा. ना. गुलाबराव पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून तसेच जि. प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नातून जिपीएस मित्र परिवारातर्फे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा मोठा व अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सकाळी ७ वाजेपासून गावागावातून आबालवृद्ध नागरिकांनी नेत्र तपासणीसाठी गर्दी केली. शिबिरात एकूण 1060 रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी 510 रुग्णांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. शिबिरात सहभागी रुग्णांसाठी नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात…
*जळगाव जिल्हा सौर ऊर्जा स्वावलंबनाकडे – पालकमंत्री गुलाबराव पाटील* बोरगावात ३ मेगावॅट सौर प्रकल्पाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पित; ३२१४ शेतकऱ्यांना दिवसा वीज *बोरगाव / धरणगाव / जळगाव प्रतिनिधी | दि. १५ फेब्रुवारी – “गावाची शक्ती हीच माझी ताकद आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी वीज, पाणी आणि रस्ते यावरच माझा सर्वाधिक भर आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात सीएसआर फंडातून मोठ्या प्रमाणात नाला खोलीकरण केले जाणार आहे तसेच जांभोरे–विवरे, जामगाव–वाघटुकी, निंभोरा–चोरगाव या शेती रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण सुरू असून ग्रामीण भागाचा कायापालट होत आहे. रात्री अंधारात पंप चालवण्यासाठी धावपळ करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देत, जळगाव जिल्ह्याला सौर ऊर्जेच्या माध्यमातून ऊर्जा स्वावलंबनाकडे नेण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव…
पाळधी बु व खु येथील मेन बाजार पेठ येथील मच्छी व चिकन मार्केट मुळे त्या भटक्या कुत्रांच्या वावर जास्त प्रमाणात झाल्या मुळे बाजारपेठ मध्ये व शालेय विद्यार्थी मध्ये भीतीचे वातवरण झाले आहे मांसाचे तुकटे त्याच ठिकाणी टाकल्या जात असल्या मुळे भटके कुत्रे हिंसक झाले असून नागरिकांवर हल्ला होत असल्याचे प्रमाण जास्त झाले आहे त्याच रस्त्यांचे जीपीएस स्कुल, मराठी मुलांची शाळा, उर्दु शाळा, कन्या शाला ,स न झंवर विध्यालय असल्यामुळे हजारो विद्यार्थी त्या रस्त्याने जात असतात पाळधी बाजारपेठ हा आजूबाजू परिसरातील सर्वात मोठा बाजरपेठ असल्यामुळे खेडे पाड्यावरील नागरिक पाळधी बाजार करण्यासाठी जास्त प्रमाणात येतात माझे मित्र प्रशांत झंवर यांचा मुलगा कॉलेज…
*जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील* बिलखेडा येथे 33/11 केव्ही नवीन उपकेंद्राचे भूमीपूजन ; AIIB योजनेतून जळगाव ग्रामीणला 32 कोटींची वीज बळकटीकरणाची गती *पाळधी/धरणगाव प्रतिनिधी | दि. 13 फेब्रुवारी – मुख्यमंत्री कृषी सौर योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी व ग्रामीण भागातील वीज पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जळगाव ग्रामीण मतदारसंघात विकासाची गती कायम ठेवून नागरिकांना दर्जेदार सुविधा देणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते धरणगाव तालुक्यातील…
दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश *जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, परीक्षा प्रक्रिया कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षांना सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे.* दि. २५/११/२०२५ रोजी शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील मार्गदर्शनानुसार राज्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या संदेशात नमूद केले की, “विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा…
*जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !* ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करण्याचे पालकमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन *पाळधी/जळगाव | प्रतिनिधी, दि. ८ फेब्रुवारी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे व पर्याय निवडीतील चुकांमुळे काही पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा एकदा ई-केवायसी करून माहिती दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून, यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला ठोस व स्पष्ट निर्देश दिले असून, जिल्ह्यातील…