Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

*अभिष्टचिंतनातून संस्कारांचा महोत्सव; अक्रूर महाराजांच्या कीर्तनातून त्याग, भक्ती आणि राष्ट्रभक्तीचा संदेश* गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त जीपीएस ग्रुपचा राज्यस्तरीय कीर्तन सप्ताह; ३५ कीर्तनकारांची उपस्थिती ठरली विशेष आकर्षण *पाळधी/धरणगाव/जळगाव, प्रतिनिधी दि. २ जून : पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जीपीएस ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय कीर्तन सप्ताहात सातव्या दिवशी ह.भ.प. अक्रूर महाराज साखरे (गेवराईकर) यांच्या ओजस्वी, रसाळ आणि विचारप्रवर्तक कीर्तनाने भाविकांना भक्ती, संस्कार आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.* युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली व नियोजनातून साकारलेल्या या सप्ताहाला हजारो भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभत आहे. *आपल्या कीर्तनात…

Read More

*”भगवंताशी नाते जोडल्याशिवाय जीवनाला खरी शांती नाही” – युवाचार्य संतोषजी महाराज आढावणे पाटील* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाळधीत भव्य कीर्तन महोत्सव; हजारो भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती, भक्तिरसात न्हाऊन निघाला परिसर *पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) : “मनुष्य कितीही श्रीमंत, यशस्वी किंवा प्रतिष्ठित झाला तरी त्याच्या जीवनाला खरी शांती, समाधान आणि आनंद हा केवळ भगवंताच्या भक्तीतूनच प्राप्त होतो. देवाशी जोडलेले दृढ नाते हेच जीवनातील सर्वात मोठे बळ असून त्याशिवाय जीवनाला पूर्णत्व प्राप्त होत नाही,” असे प्रतिपादन युवाचार्य ह.भ.प. संतोषजी महाराज आढावणे पाटील यांनी केले.* राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जीपीएस परिवार, युवा…

Read More

*संत आणि शूरवीरांमुळेच महाराष्ट्राची संस्कृती व अस्मिता टिकून आहे – ह.भ.प. संग्राम महाराज भंडारे* राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात पाचव्या दिवसाची प्रभावी कीर्तन सेवा; मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त विशेष सन्मान *पाळधी/धरणगाव जळगाव, दि. १ जून – “संतांनी समाजाला अध्यात्म, सदाचार आणि मानवतेचा मार्ग दिला, तर शूरवीरांनी धर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाचे रक्षण केले. संत आणि शौर्यपरंपरेच्या संस्कारांमुळेच महाराष्ट्राची संस्कृती व अस्मिता आजही तेजस्वी आहे,” असे प्रतिपादन ह.भ.प. संग्राम महाराज भंडारे यांनी केले.* ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी संतांच्या विचारांतून प्रेरणा घेत स्वराज्याची उभारणी केली. आजच्या नेतृत्वानेही संतविचार, नैतिक मूल्ये आणि लोकसेवेचा आदर्श स्वीकारण्याची गरज आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा…

Read More

*”माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे यांचे प्रतिपादन* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात जल्लोषपूर्ण कीर्तनसेवा *पाळधी / धरणगाव / जळगाव प्रतिनिधी, दि. ३० मे – “माणसातला देव माणूस म्हणजे आदरणीय गुलाबराव पाटील. समाजसेवा, धर्मकार्य आणि वारकरी संप्रदायाच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर केलेले कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. समाजहितासाठी केलेल्या सेवाकार्याचा वारसा पुढील पिढीने जपणे हीच खरी संतसेवा आहे,” असे प्रतिपादन साध्वी सोनाली दीदी करपे यांनी केले.* पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पाळधी येथे आयोजित भव्य राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात चौथ्या दिवसाची…

Read More

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या ५ जून रोजी होत असलेल्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त साधून दोनगावं ते शेगांव यात्रा आज मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली या यात्रेचे नियोजन दोनगाव खु येथील सरपंच श्री भागवत दयाराम पाटील यांनी केले असुन आपल्या लाडक्या नेत्याला गजानन महाराज यांचा आशीर्वाद लाभो या सदभावनाने यात्रे चे स्वरून देण्यात आले असून यात्रा आज दिनांक ३१ रोजी सकाळी ५ वाजता पाळधी येथून निघाली आहे आपल्या नेत्यांचा अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने श्री भागवत पाटील यांनी दोनगाव ते शेगाव यात्रेचे नियोजन केले त्या यात्रेत सहभागी झालेली भाविकांनी आभार मानले आहे

Read More

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या ५ जून रोजी होत असलेल्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त साधून दोनगावं ते शेगांव यात्रा आज मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली या यात्रेचे नियोजन दोनगाव खु येथील सरपंच श्री भागवत दयाराम पाटील यांनी केले असुन आपल्या लाडक्या नेत्याला गजानन महाराज यांचा आशीर्वाद लाभो या सदभावनाने यात्रे चे स्वरून देण्यात आले असून यात्रा आज दिनांक ३१ रोजी सकाळी ५ वाजता पाळधी येथून निघाली आहे आपल्या नेत्यांचा अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने श्री भागवत पाटील यांनी दोनगाव ते शेगाव यात्रेचे नियोजन केले त्या यात्रेत सहभागी झालेली भाविकांनी आभार मानले आहे

Read More

*पाळधीत भक्तीचा महाकुंभ; बाल कीर्तनकार ज्ञानेश्वर माऊलींच्या कीर्तनाने हजारो भाविक मंत्रमुग्ध* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त भव्य हरिनाम सप्ताहात स्त्री सन्मानाचा प्रभावी जागर *पाळधी/धरणगाव/जळगाव (प्रतिनिधी, दि. २८ मे) : पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र पाळधी येथे जीपीएस ग्रुप व युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित भव्य अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहात भक्ती, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळत आहे. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी अवघ्या ११ वर्षीय बाल कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज जाऊरकर यांनी आपल्या ओजस्वी, रसाळ आणि प्रभावी कीर्तनातून हजारो भाविकांना मंत्रमुग्ध करत स्त्री सन्मानाचा जागर घडविला.*…

Read More

यावेळी युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या संवेदनशीलतेचे अत्यंत हृदयस्पर्शी उदाहरण पाहायला मिळाले. कीर्तन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्याने एक लहान मुलगी आपल्या कुटुंबापासून हरवली होती. अचानक आई-वडिलांपासून दूर झाल्याने ती घाबरलेली व रडत होती. ही बाब लक्षात येताच प्रतापराव पाटील यांनी तात्काळ त्या मुलीजवळ जाऊन तिला धीर दिला, तिची विचारपूस करत शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांच्या मदतीने त्या मुलीच्या आई-वडिलांचा शोध सुरू केला. काही वेळातच तिच्या पालकांचा शोध घेण्यात यश आले आणि मुलीला सुरक्षितपणे तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या मुलीला सुखरूप पाहून पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. या…

Read More

*कलीयुगातून तरण्याकरिता भगवंताचे नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन — ह.भ.प. रामेश्वर महाराज* पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त भव्य अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास उत्साहात प्रारंभ *पाळधी /धरणगाव/जळगाव (प्रतिनिधी) 27 मे : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पालधी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहास काल अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. जीपीएस ग्रुप व युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या नेतृत्वात व नियोजनाखाली आयोजित या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर हरिनाममय झाला.* *“कलीयुगातून तरून जाण्याकरिता भगवंताचे नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे,”…

Read More

*पाळधी रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा द्यावा; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाकडे निवेदन* “जीएम रामाश्रय पांडे व डीआरएम पंकज सिंह यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा; स्थानिक प्रवाशांच्या सुविधेसाठी पाठपुरावा” *पाळधी, प्रतिनिधी दिनांक 27 मे : धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या प्रवासी गाड्यांना अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी मागणी युवा नेते तथा तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. पाळधी रेल्वे स्थानकाच्या दौऱ्यावर आलेले मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) रामाश्रय पांडे आणि भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) पंकज सिंह यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी निवेदन सादर करत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.* निवेदनात नमूद करण्यात आले आहे…

Read More