Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

अजनी धरणातून उद्या (१५ मे) पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार ! *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना ; ११ गावांना मोठा दिलासा* *जळगाव/धरणगाव, प्रतिनिधी | दि. १४ मे : वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि ग्रामीण भागात निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार उद्या दि. १५ मे २०२६ रोजी अजनी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी बिगर सिंचन आवर्तन सोडण्यात येणार आहे. निवासी जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांच्या आदेशानुसार गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी अजनी धरणातून सुमारे १५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग अंजनी नदीपात्रात सोडण्याची कार्यवाही सुरू केली आहे. या निर्णयामुळे धरणगाव…

Read More

पाळधी बायपास येथील गेल्या 3 महिन्या पासून नॅशनल हायवे येथील हायमस्त पोल चे लाईट बंद असल्या मुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे जळगाव कडून पाळधी येतांना मोठं मोठ्या कंपन्या असल्यामुळे पाळधी व पाळधी आजूबाजूचे जवळपास ५० गावांतील तरुण नागरिक कामानिमित्त रहदारी करत असतात रात्री बे रात्री त्यांना या रस्त्याने कामा निमित्ताने जावे लागतात रात्री लाईट बंद असल्या मुळे पाळधी चौफुली वरती मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे ही बाब पाळधी येथील माजी सरपंच अरुण पाटील यांच्या लक्षात आले जर लवकरात लवकर लाईट चालू न केल्यास मोठे आंदोलन छेडन्यात येईल असे सांगितले आहे या अश्या गैरसोयी अरुण पाटील यांनी तीव्र नाराजी…

Read More

धरणगावच्या सुरक्षिततेस नवे बळ! *पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक ‘मिनी फायटर’ अग्निशमन व रेस्क्यू वाहनाचे लोकार्पण !* *धरणगाव / जळगाव दिनांक 12 मे – धरणगाव शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या अत्याधुनिक मिनी फायटर अग्निशमन व रेस्क्यू वाहनाचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. महाराष्ट्र शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांच्या माध्यमातून धरणगाव नगरपरिषदेला हे वाहन उपलब्ध झाले आहे.* राज्यातील ५४ नगरपरिषदांना अग्निशमन व रेस्क्यू वाहने देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून धरणगावला हे अत्याधुनिक वाहन प्राप्त झाले आहे. शहरातील वाढते नागरीकरण, अरुंद रस्ते आणि…

Read More

*गाव विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री गुलाबराव पाटील* जळके येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण तर दूध डेरी इमारतीचे भूमिपूजन; रामदेववाडी –कुऱ्हाड रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ *जळगाव / पाळधी दिनांक 10 मे – जळके येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले तसेच नवीन दूध डेरी इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोल – ताशांचा गजर व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. ग्रामपंचायत व दूध डेरीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच संचालक मंडळाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.* कार्यक्रमापूर्वी रामदेववाडी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर रामदेववाडी ते कुऱ्हाडदे या सुमारे…

Read More

*गावोगावी “मायेची दृष्टी”; उत्तर महाराष्ट्रात GPS चे प्रथमच फिरते नेत्रालय जनसेवेत* बिलखेडा-आसोदा शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद *पाळधी / धरणगाव / जळगाव प्रतिनिधी, दि. 5 मे – फिरते नेत्रालय गावागावातील गरिबांच्या दारात आरोग्य सेवा पोहोचवत आहे. जेष्ठ नागरिक असोत किंवा सर्वसामान्य, त्यांच्या कोणत्याही अडचणींसाठी मी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागात “गावातच उपचार” ही संकल्पना प्रत्यक्ष उतरली असून अत्याधुनिक फिरते नेत्रालय आता जनतेच्या सेवेत दाखल झाले आहे. जळगाव ग्रामीण मतदार संघात जीपीएस मित्रपरिवाराने मोतीबिंदू मुक्त करण्याच्या दिशेने उचललेले हे पाऊस आरोग्यसेवा संवेदनाने सामाजिक बांधिलकीचा जिवंत आदर्श ठरत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* धरणगाव तालुक्यातील बिलखेडा तसेच…

Read More

*भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश* पाळधी (दि.०२/०५/२०२६) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांचेद्वारा फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या १२ वी परिक्षेचा भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा १००%, वाणिज्य शाखेचा १००% , कला शाखेचा निकाल ९८% निकाल लागला असून महाविद्यालयातील खालील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. *कला शाखेतून* कु. प्रांजली किरण महाजन ही विद्यार्थिनी ८६.१७% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने तर पूजा ज्ञानेश्वर भोई ही ८२.८३ % गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने तसेच कु. दिपाली रवींद्र काकडे ही ७८.५०% गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. *वाणिज्य शाखेतून* चि. शुभम धनराज कासट…

Read More

*पारंपारिक लोककला व संस्कृती टिकवण्यासाठी कलाकार जपला पाहिजे” – पालकमंत्री गुलाबराव पाटील* गर्जा महाराष्ट्र माझा कार्यक्रमाद्वारे विविध लोककलांचा व संस्कृतीचा जागर *जळगाव, दि. १ मे (प्रतिनिधी) – “गर्जा महाराष्ट्र माझा” हा शासनाचा जिल्हास्तरीय उपक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या अस्मिता, परंपरा आणि लोककलेचा जागर करणारा उत्सव आहे. लोककला आणि कलावंतांच्या जतनासाठी शासन कटिबद्ध असून, संस्कृती टिकवायची असेल तर कलाकार जपलाच पाहिजे, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. लोककला ही माणसाला माणसाशी जोडणारी सशक्त शक्ती असून, लोककलावंतांच्या सन्मान आणि उन्नतीसाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.* पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले की, शाहीर अण्णा भाऊ…

Read More

महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा पाळधी बु. येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील एज्युकेशनल कॅम्पस मध्ये १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य मा. प्रतापराव गुलाबरावजी पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. यावेळी ध्वजारोहणाचा मान शाळेचे स्वच्छता सेवक चावरे मामा यांना देण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल घेत मा. प्रतापराव पाटील यांनी शाल, श्रीफळ व कपडे देऊन विशेष सत्कार केला. वर्षभर संपूर्ण कॅम्पस स्वच्छ व नीटनेटका ठेवणाऱ्या चावरे मामांच्या कार्याचे यावेळी सर्वांनी कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात मा. प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या ऐतिहासिक महत्त्व सांगत राज्याच्या प्रगतीत प्रत्येक…

Read More

*“सेवा हेच खरे व्रत” : प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फिरते नेत्रालय सेवेत* घंटागाडीचे लोकार्पण, गरजूंना मदतीचा हात; रक्तदान शिबिर व सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस ठरला जनसेवेचा उत्सव जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव; “भावी आमदार” बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण *पाळधी/धरणगाव/जळगाव, दि. २८ एप्रिल : “सेवा हेच खरे व्रत” या भावनेतून पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आणि विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जीपीएस ग्रुप, पाळधी यांच्या वतीने अत्याधुनिक फिरते नेत्र तपासणी ॲम्बुलन्स जळगाव ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेत आजपासून दाखल करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उत्साहात पार पडला.…

Read More

लेख 2 *“सेवेतून घडलेलं नेतृत्व… जळगाव ग्रामीणचा विश्वास – प्रतापराव पाटील”* समाजाच्या वेदना ओळखून त्यावर निस्वार्थपणे उपाय करणारे नेतृत्व आजच्या काळात दुर्मिळ झाले आहे. अशा परिस्थितीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात एक नाव सतत आशेचा किरण बनून उभे राहते, ते म्हणजे प्रतापराव गुलाबराव पाटील. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र ही ओळख असली तरी प्रतापरावांनी वडिलांच्या पावलावरपाऊल ठेवत स्वतःच्या कार्यातून निर्माण केलेली स्वतंत्र ओळख अधिक ठळक आहे. त्यांनी नेहमीच “मी कोणाचा मुलगा आहे” यापेक्षा “मी कोणासाठी उभा आहे” हे कृतीतून सिद्ध केले आहे. महात्मा गांधींचा विचार आहे, “स्वतःला शोधायचे असेल, तर स्वतःला इतरांच्या सेवेत हरवून टाका.” या विचाराचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रतापराव पाटील.…

Read More