लेख 2 *“सेवेतून घडलेलं नेतृत्व… जळगाव ग्रामीणचा विश्वास – प्रतापराव पाटील”* समाजाच्या वेदना ओळखून त्यावर निस्वार्थपणे उपाय करणारे नेतृत्व आजच्या काळात दुर्मिळ झाले आहे. अशा परिस्थितीत जळगाव ग्रामीण मतदारसंघात एक नाव सतत आशेचा किरण बनून उभे राहते, ते म्हणजे प्रतापराव गुलाबराव पाटील. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र ही ओळख असली तरी प्रतापरावांनी वडिलांच्या पावलावरपाऊल ठेवत स्वतःच्या कार्यातून निर्माण केलेली स्वतंत्र ओळख अधिक ठळक आहे. त्यांनी नेहमीच “मी कोणाचा मुलगा आहे” यापेक्षा “मी कोणासाठी उभा आहे” हे कृतीतून सिद्ध केले आहे. महात्मा गांधींचा विचार आहे, “स्वतःला शोधायचे असेल, तर स्वतःला इतरांच्या सेवेत हरवून टाका.” या विचाराचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रतापराव पाटील.…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
प्रतापराव पाटील हे नेतृत्व गाजवणारे नेते आहेत, जे वडील, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सामाजिक वसा पुढे नेत समाजाच्या प्रत्येक घटकासाठी न्याय आणि मदत मिळवून देतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक लोकांचे जीवन बदलले आहे, आणि त्यांच्या कार्याने संपूर्ण जिल्ह्यात प्रेरणादायी उदाहरणे निर्माण झाली आहेत. लोकांच्या हक्कांसाठी अढळ आवाज जिल्हा परिषदेतील त्यांच्या कार्यामुळे स्थानिक समाजात अनेक सकारात्मक बदल घडले आहेत. प्रतापराव पाटील हे खरे अर्थाने गोरगरिबांचा आवाज आहेत आणि समाजसेवेच्या कार्यात अग्रगण्य आहेत. प्रतापराव पाटील – गोरगरिबांचा आवाज आणि सामाजिक सेवक वडील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी समाजसेवेत विशेष स्थान निर्माण केले आहे.…
*रक्तदानातून जपली मानवतेची परंपरा” – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिबिर उत्साहात संपन्न* प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५५ पेक्षा जास्त बाटल्या रक्तसंकलन *पाळधी / जळगाव (प्रतिनिधी) – वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या क्षणांना सामाजिक कार्याशी जोडणे ही कौतुकास्पद बाब असून रक्तदानासारख्या उपक्रमांमुळे समाजात मानवतेची भावना अधिक दृढ होते. अशा उपक्रमांमधून सेवा आणि संवेदनशीलतेची जाणीव वाढीस लागते असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* माजी जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपूत्र प्रतापराव पाटील यांच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर पाळधी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत…
*मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हास्तरीय समिती बैठकीत योजनेचा सखोल आढावा *जळगाव, दिनांक 24 एप्रिल (जिमाका): राज्य शासनाची मुख्यमंत्री बळीराजा शेतपानंद रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी योजना आहे. या योजनेची संबंधित यत्रणांनी जिल्हयात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.* जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात “मुख्यमंत्री बळीराजा, शेतपाणंद, रस्ते, योजना” जिल जिल्हास्तरीय समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी…
*वारकऱ्यांच्या व्यासपीठावर मला उर्जा मिळते” – पालकमंत्री गुलाबराव पाटील* तरडे येथे वारकरी गुणीरत्न पुरस्कार व महंत पदवी दीक्षाप्रदान सोहळा; संत विचारांचा जागर *पाळधी/धरणगाव/जळगाव (प्रतिनिधी) दिनांक 20 एप्रिल -“वारकऱ्यांचे व्यासपीठ हे संतांच्या विचारांचे व्यासपीठ आहे. या ठिकाणी राजकारण नको. येथे येताना मला नेहमीच वेगळी ऊर्जा मिळते. संतांचे विचार केवळ ऐकण्यासाठी नाहीत, तर आचरणात आणण्यासाठी आहेत. याच विचारांतून माणूस आणि समाज घडतो. वारकरी संप्रदाय ही आपली संस्कृती आणि ओळख असून तिचे जतन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत श्रीकांतदासजी महाराज होते.* पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, तरडे सारख्या पवित्र भूमीत परमार्थाचे जे कार्य…
*डिजिटल एसटीकडे मोठे पाऊल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते NCMC 700 कार्डचे वाटप* *NCMC कार्डमुळे एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल – पालकमंत्री गुलाबराव पाटील* *पाळधी/धरणगाव/जळगाव | प्रतिनिधी दि. 20 एप्रिल – एसटी ही ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असून तिला डिजिटल स्वरूप देणे ही काळाची गरज आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळेल तसेच एसटीची कार्यप्रणाली अधिक गतिमान व प्रवाशाभिमुख होईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘RuPay On-The-Go’ प्रणालीवर आधारित NCMC (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड योजना सुरू केली असून या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले. धरणगाव तालुक्यातील…
*दुपारी बाहेर पडू नका; उन्हाशी खेळ जीवावर बेतू शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे नागरिकांना थेट आवाहन* *पाळधी/धरणगाव/जळगाव, प्रतिनिधी (दि. १७ एप्रिल) – जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका गंभीर बनत चालला असून नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची विशेष काळजी घ्यावी, उन्हाशी खेळ करू नका; सावधगिरीच हा सर्वोत्तम उपाय आहे. स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या… उन्हाळा काही दिवसांचा असतो, पण आपला जीव अमूल्य आहे,” असे भावनिक शब्दांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना थेट सतर्क राहण्याचे आवाहन केले.* सध्या उन्हाचा पारा धोकादायक पातळीवर पोहोचत असून दुपारी १२ ते ४ या वेळेत सूर्यप्रकाश अत्यंत तीव्र असतो. या काळात शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असे…
*उन्हाळ्यात पाणी व वीजपुरवठा अखंडितपणे सुरु ठेवावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !* जिल्ह्यात आजपर्यंत एकही “टँकर” सुरु नाही – केवळ १४ विहिरी अधिग्रहित – नागरिकांना दिलासा *जळगाव, दि.17 (जिमाका) : पाणीपुरवठा व वीज ही मुलभूत व अत्यावश्यक सेवा असून, उन्हाळ्याच्या काळात कोणत्याही परिस्थितीत पाणी व वीजपुरवठा खंडित होऊ नये. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून नागरिकांना अखंडितपणे सेवा द्यावी,” असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.* पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात जिल्ह्यातील पाणीटंचाई व महावितरण कडील विविध विषयांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली…
धडाकेबाज कारवाई! ३२ गुन्ह्यांचा सराईत आरोपी जेरबंद; उत्कृष्ट कामगिरीबद्दल एपीआय कंडारे यांचा एसपींकडून गौरव पाळधी/धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव तालुक्यातील पाळधी परिसरात घडलेल्या गंभीर गुन्ह्याचा वेगाने छडा लावत पोलिसांनी अल्पावधीत आरोपीला अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या प्रभावी आणि तत्पर कारवाईबद्दल एपीआय कंडारे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्यात मयत व्यक्तीचा मृतदेह हा धरणगाव शिवारातील रेल्वे रुळांवर संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान पोलिसांनी फिर्यादी महिला व साक्षीदारांचा शोध घेत…
झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविरोधात शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन आज पहिला दिवस धरणगाव/जळगाव, दि. १४ एप्रिल २०२६ — जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा तसेच झुरखेडा गावातील शेतकरी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघावा या मागणीसाठी झुरखेडा येथे आजपासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी उपोषण स्थळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून भेट दिली व लोकनियुक्त सरपंच यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी शासन निर्णयांचे उल्लंघन करून शेतकऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – २०१७ अंतर्गत व्याजाची बेकायदेशीर वसुली केल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी…