Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

*बाबासाहेबांचे विचारच समाजपरिवर्तनाची खरी ताकद” – युवा नेते प्रतापराव पाटील* पाळधी व पिंप्री येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी *पाळधी/पिंप्री प्रतिनिधी दिनांक 14 एप्रिल -“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना ही देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि न्याय देणारी आहे. त्यांच्या विचारांमुळे समाजात शिक्षण, समानता आणि बंधुता यांचे महत्त्व रुजले आहे. बाबासाहेबांचे विचारच समाजपरिवर्तनाची खरी ताकद असून, आजच्या तरुणांनी त्यांचा वारसा पुढे नेणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हाच खरा बदलाचा मार्ग असून, त्याद्वारेच समाजाची प्रगती शक्य असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते प्रतापराव पाटील यांनी केले.* भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती…

Read More

*हक्काचा प्रत्येक मतदार सुरक्षित ठेवा; प्रत्येक बूथ मजबूत करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्पष्ट आवाहन* किंवा *मतदार सुरक्षितता हीच प्राथमिकता ; प्रत्येक बूथ भक्कम करण्याचे निर्देश ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील* *पाळधी/धरणगाव/जळगाव दि. ११ एप्रिल (प्रतिनिधी) – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी शुद्धीकरण हे केवळ एक अभियान नसून ती संघटनात्मक ताकदीची खरी कसोटी आहे. “मतदार यादी ही ग्राम पातळीचे राज्य स्तरापर्यंत च्या निवडणुकीची विजयाची शिदोरी आहे. एकही हक्काचा मतदार वंचित राहू नये आणि एकही बनावट नाव शिल्लक राहू नये, यासाठी प्रत्येक बीएलएने रणांगणात उतरावे,” असे स्पष्ट आणि ठाम प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी…

Read More

*“सुरांच्या स्वरगंगेतील एक अजरामर आवाज आज शांत झाला…”* भारताच्या संगीतविश्वाला आपल्या अद्वितीय आणि बहुरंगी आवाजाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका Asha Bhosle यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक कलाकार नाही, तर भारतीय संगीताची एक सजीव परंपरा हरपली आहे. आशाताईंचा आवाज हा काळाच्या पलीकडे जाणारा होता. शास्त्रीय, भावगीत, गझल, तसेच चित्रपटसंगीत अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपल्या गायकीची अमिट छाप उमटवली. त्यांच्या प्रत्येक गीतामध्ये भावनांची एक वेगळीच खोली जाणवते, जी पिढ्यान्‌पिढ्या रसिकांच्या मनात घर करून राहिली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या सुरांनी केवळ मनोरंजनच नाही, तर संस्कृती आणि परंपरेचे संवर्धन केले. त्यांच्या कार्यातून…

Read More

🚆 पाळधी स्थानकावर अडकलेल्या प्रवाशांना दिलासा; प्रतापराव पाटील यांच्याकडून २५० पाण्याचे जार उपलब्ध उधना ते हसनपूर ही प्रवासी ट्रेन सकाळी ११ वाजल्यापासून पाळधी रेल्वे स्थानकावर थांबलेली होती. रेल्वे लाईन क्लिअर नसल्यामुळे तब्बल तीन तासांचा विलंब झाला होता. या अनपेक्षित थांब्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. उन्हाच्या कडाक्यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांची विशेषतः हालअपेष्टा होत होत्या. स्थानकावर मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नव्हती. अशा कठीण परिस्थितीत पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांचे चिरंजीव तथा मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी तत्काळ परिस्थितीची दखल घेतली. त्यांनी तातडीने पुढाकार घेत…

Read More

*शिवसेना जनसंपर्क कार्यालय हे सर्वसामान्यांचे न्यायालय – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्र्यांच्या हस्ते नशिराबादमध्ये शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण; महिला आघाडीची घोषणा, मान्यवरांचा गौरव *नशिराबाद / जळगाव प्रतिनिधी, दि. ११ एप्रिल – “शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नाही, तर जनतेच्या सुख-दुःखाशी घट्ट नाळ जोडलेली एक जिवंत चळवळ आहे. सर्वसामान्य माणसाच्या अडचणी ऐकून त्याला न्याय देणे आणि संकटात खंबीरपणे उभे राहणे हीच शिवसेनेची ओळख आहे. पंकज महाजन यांच्या पुढाकारातून उभे राहिलेले हे जनसंपर्क कार्यालय केवळ कार्यालय न राहता सर्वसामान्यांचे न्यायालय बनले पाहिजे. इथून जाणारा प्रत्येक नागरिक समाधान आणि न्याय मिळाल्याच्या भावनेनेच परतला पाहिजे,” असा दमदार व भावनिक संदेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा…

Read More

*शेवटचा हक्काचा मतदार मॅप होईपर्यंत शांत बसू नका – पालकमंत्री गुलाबराव पाटील* मतदार यादी शुद्धीकरणात 100% यश मिळवण्यासाठी शिवसेनेकडून बीएलए प्रशिक्षण *जळगाव, दि. १० एप्रिल (प्रतिनिधी) : मतदार यादी शुद्धीकरण हे निवडणुकीच्या विजयाचे भक्कम अधिष्ठान असून “मतदार यादी म्हणजे निवडणुकीचा पाया आहे. हा पाया मजबूत असेल तर विजयाची इमारत आपोआप उभी राहते. त्यामुळे प्रत्येक मतदार तपासून, प्रत्येक बूथ मजबूत करण्याचा निर्धार करा. प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करावी, BLO सोबत सतत संपर्क ठेवावा आणि बोगस मतदारांना हद्दपार करत हक्काचे मतदार सुरक्षित करावेत. जोपर्यंत शेवटचा मतदार मॅप होत नाही, तोपर्यंत शांत बसू नका. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या…

Read More

पाळधी – तालुका धरणगाव चांदसर येथून रोज हजारो वाहने रेती घेऊन इतर जिल्हात जात आहे तसेच चांदसर येथील शेकडो ट्रेकटर रोज रात्री रेती उपसा करत आहे यात मुख्यप्रवाहात दलाल लोकांची धुमाकूळ चालू आहे ते रोज रात्री हजारो 10 चक्के व 12 चक्के वाहनांनी रेती चांदसर येथुन पाळधी मार्गे छत्रपती संभाजी नगर , जळगाव , धुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात आहे एक वेळ अशी पण होती की चांदसर येथून एक ब्रास रेती वाहतूक करणे म्हणजे तारेवरची कसरत होती मग आता मोठ्या प्रमाणात रेती वाहतून का सुरू आहे यांचे कोड काही सुटत दिसत नाही आताच गेल्या काही आठवढ्यात दोनगाव या ठिकाणी…

Read More

*पाळधीत दृष्टीदानाचा महायज्ञ; शेकडो डोळ्यांना उजेड* २३५ मोतिबिंदू रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया; ५८३ नागरिकांनी केली नोंदणी *पाळधी / धरणगाव/ जळगाव प्रतिनिधी दिनांक ९ एप्रिल – डोळ्यांना दृष्टी देणं म्हणजे केवळ वैद्यकीय उपचार नाही, तर एखाद्या कुटुंबाच्या आयुष्यात आनंदाचा दिवा पेटवणं आहे. एका व्यक्तीला दिसायला लागलं की संपूर्ण घर उजळतं – हीच खरी समाजसेवा आहे. सेवा हीच आपल्या राजकारणाची खरी ताकद आहे. गरीब, वंचित माणसाच्या आयुष्यात प्रकाश आणणं, त्याच्या अंधाराशी लढणं – हेच आपलं कर्तव्य आहे आणि अशी कामं सतत सुरू राहिली पाहिजेत.असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यांनी केले.* समाजसेवेचा खरा अर्थ म्हणजे गरजूंना नवजीवन देणे……

Read More

*सामाजिक विकासातून समाजबंध अधिक दृढ ! ; डीपीडीसीच्या २३ लाख निधीतून उभारलेले सभागृह समाजासाठी नवी ऊर्जा – पालकमंत्री गुलाबराव पाटील* धरणगावात २२ पेक्षा अधिक सभागृहांसाठी सुमारे ९ कोटींचा ऐतिहासिक निधी; पालकमंत्र्यांच्या हस्ते बडगुजर समाजाच्या सभागृहाचे लोकार्पण ! *पाळधी/धरणगाव /जळगाव (प्रतिनिधी) दिनांक ९ एप्रिल -“धरणगाव शहरात आतापर्यंत २२ पेक्षा अधिक विविध सामाजिक सभागृहांची कामे मंजूर करून जवळपास अनेक पूर्णत्वास आणली आहेत. यासाठी सुमारे ९ कोटींचानिधी उपलब्ध करून दिला आहे. बडगुजर समाजाच्या मागणीनुसार उभारलेले हे सुंदर सभागृह समाजाच्या एकतेसाठी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी आणि विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी उपयोगी पडावे अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.* धरणगाव शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उभारणीला…

Read More

*मतदार यादी शुद्धीकरणासाठी बीएलएंना शिवसेनेचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार !* पाळधी/जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांची भव्य विभागीय कार्यशाळा पाळधी येथे उत्साहात संपन्न *जळगाव (प्रतिनिधी) दि. ६ एप्रिल : मतदार यादी शुद्धीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत, “प्रत्येक पात्र मतदार सुरक्षित राहिला पाहिजे आणि बोगस नावे यादीतून हद्दपार झाली पाहिजेत, हीच लोकशाहीची खरी ताकद आहे,” असे प्रतिपादन निवडणूक आयोगाचे माजी उपायुक्त अविनाश सणस यांनी केले. “…हीच लोकशाहीची खरी ताकद आहे,” असे प्रतिपादन अविनाश सणस यांनी केले. १९५० पासून आतापर्यंत आठ वेळा एसआयआर पार पडले असून, सध्या सुरू असलेले पुनरिक्षण हे नववे असल्याचे” त्यांनी स्पष्ट केले. पुढील काळात प्रत्येक मतदारसंघनिहाय कार्यशाळांच्या माध्यमातून बीएलएंना विशेष…

Read More