Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

*जळगावात भव्य आर्ट गॅलरी उभारणार ! – पालकमंत्री गुलाबराव पाटील* बालचित्रकार अभिराज निकमच्या ‘यथार्थ’ प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी घोषणा *जळगाव, दि. ३ एप्रिल (प्रतिनिधी) : जळगाव शहरात मोठ्या शहरांच्या धर्तीवर भव्य आर्ट गॅलरी व कला संकुल उभारण्यात येणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. बालचित्रकार अभिराज निकम यांच्या ‘यथार्थ’ या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.* यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, “अभिराज हा केवळ रंग भरत नाही, तर भावना आणि वास्तवाला आकार देतो. अशा गुणी कलाकारांना प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी आहे. हा बालचित्रकार राज्यात नव्हे तर देशात जळगावचे नाव उज्ज्वल करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी अभिराजच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल बोलताना…

Read More

मांस विक्रते यांचा पुन्हा सुळसुळाट प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली… पाळधी शहरातील मटण, चिकन , विक्रतेकडून घाणीचे समस्या व श्वानांची संख्या वाढल्या ने चिकन, मटण , मच्छी मार्केट बंद करण्यात आले होते कारान शाळेत जाणारे विध्यार्थी , जेष्ठ नागरिक ,महिला वर्ग येणाऱ्या जाणाऱ्या लोकामध्ये असुरीक्षता जाणवत होती या निर्णयाचे गावकरी यांनी अभिनंदन केले होते पण काही काळ लोटताच प्रशासनाचा या आदेशाला केराची टोपली दाखवत परत त्याच ठिकाणी मांस विक्री सुरू केले असून गांवकरी मध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या बाबत प्रशासन ला विचारणा केली असता उडवा उडवी चे उत्तर दिली सदर बाबवर प्रशासनाने लवकर दखल न घेतल्यास गावकरी महिला वर्ग…

Read More

*बिलवाडी गावाजवळील पुलासह चौक सुशोभीकरण मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील* गावाच्या एकजुटीचे कौतुक; विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन उत्साहात संपन्न *बिलवाडी / जळगाव/पाळधी प्रतिनिधी दि. 3 एप्रिल – “बिलवाडी गावाने नेहमीच मला भरभरून प्रेम आणि सहकार्य दिले आहे. गावातील ग्रामस्थांची एकजूट ही खरोखरच कौतुकास्पद आहे. गावाजवळील नदीवर पुलाचे काम लवकरच मंजूर करणार असून गावातील चौकाचे सुशोभीकरणही करण्यात येईल. अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ते बिलवाडी येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.* *या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपूजन* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय संरक्षण भिंत, दलित वस्तीत सामाजिक सभागृह (बौद्ध विहार) व…

Read More

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष, प्रतापराव पाटील यांनी देखील खेळली पारंपारिक पाचपावली पाळधी, ता. धरणगाव – येथील पारंपरिक धार्मिक वारसा जपत दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र चावदशीच्या निमित्ताने भवानी मातेचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. संपूर्ण गावात श्रद्धा, उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या दिवशी काही भक्तगण भवानी मातेचे स्वरूप धारण करून गावभर फेरी काढत भाविकांना दर्शन देतात, ही अनेक वर्षांची परंपरा आहे. यावर्षी पाळधी खुर्द येथील जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने भवानी मातेचे आकर्षक “पार्ट” सादर करण्यात आले. यात तीन लहान भवानी व आठ मोठ्या भवानींचा सहभाग होता. लहान वयातील मुलांनी साकारलेल्या भवानी मातेच्या…

Read More

*हनुमान जयंती हा श्रद्धा, शक्ती आणि सेवाभाव जागवणारा दिवस – पालकमंत्री गुलाबराव पाटील* हनुमान जयंतीनिमित्त एकलग्न व बोरगाव खुर्द येथे २५ लाखांच्या आमदार निधीतून सभा मंडपांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न *पाळधी/धरणगाव/जळगाव प्रतिनिधी | दि. २ एप्रिल (हनुमान जयंती) – हनुमान जयंती हा केवळ सण नसून श्रद्धा, शक्ती आणि सेवाभाव जागवणारा दिवस आहे. मारुती मंदिर ही आपल्या गावांची श्रद्धास्थाने असून त्यांचा विकास म्हणजे आपल्या संस्कृतीचा सन्मान आहे. मंदिर परिसर सुशोभित करण्यासाठी व भाविकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,” अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.* धरणगाव तालुक्यात हनुमान जयंतीच्या पवित्र व उत्साहपूर्ण वातावरणात एकलग्न (१० लाख) व…

Read More

*जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव; सलग चौथ्या वर्षी 100% निधी खर्च *जळगाव, दि. १ एप्रिल :(जिमाका) जिल्हा वार्षिक योजना (DPDC) अंतर्गत निधीच्या प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीमुळे जळगाव जिल्हा राज्यात सलग चौथ्यांदाअव्वल ठरला असून, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण/ आदिवासी घटक (TSP/OTSP) व अनुसूचित जाती (SCP) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात विविध शासकीय विभागांच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 834 कोटी 61 लाख 89 हजार रुपयांचा संपूर्ण निधी 100 टक्के खर्च करण्यात प्रशासनाला यश आले आहे. विशेष म्हणजे, सलग चौथ्या वर्षी हा विक्रम प्रस्थापित झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या…

Read More

आज दिनांक 30 मार्च रोजी जळगाव जिल्ह्यात व धरणगाव व जळगाव तालुक्यातील वादळी वारा पाऊस व गारपीट मुळे शेकडो शेतकरी बांधवांचे शेत पिकांचे मोठे नुकसान झाले असून यात मुख्य पिके गहू , मका, ज्वारी , बाजरी ,केळी व फळबाग या पिकांचे मोठे नुकसान झाले शेतकरी बांधवांचे तोंडाला आलेला गास गेला असून हे सर्व लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री गुलाबरावजी पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गुघे साहेब व स्थानिक तालुका पातळीवर तहसीलदार याना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून उद्या पासून पंचनामे ला सुरुवात होणार असून तरी सर्व शेतकरी बांधवांनी स्थानिक अधिकारी यांच्या शी संपर्क साधावा

Read More

*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी सेनेकडून सत्कार !* शाळेची वेळ कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागत *पाळधी /जळगाव प्रतिनिधी दिनांक२८ – जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा आज त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सेना (महिला व पुरुष कार्यकारिणी) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. विशेषतः उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळेची वेळ सकाळी ७.०० ते साडेबारा ऐवजी कमी करण्याची मागणी शिक्षक-शिक्षकेतर सेनेने केली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांना दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा…

Read More

महावितरणचा भोंगळ कारभार; शॉर्टसर्किटमुळे शेतकऱ्याचा गहू जळून खाक पाळधी (ता. धरणगाव) : महावितरण विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्याला बसला आहे. पाळधी येथील पारधी शिवारात गट क्रमांक ३७८ मध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी योगेश सतीश पाटील यांचा सुमारे दोन ते अडीच एकरांवरील गव्हाचे पीक पूर्णपणे जळून खाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील विद्युत तारा सैल व जीर्ण अवस्थेत असल्यामुळे अचानक शॉर्टसर्किट झाले आणि त्यातून ठिणग्या उडाल्या. या ठिणग्यांमुळे शेतातील उभ्या गव्हाच्या पिकाला आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, पाळधी शिवारातील शेजारील शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिकांच्या मदतीमुळे…

Read More

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानीवृत्त अधिकारी संघटनेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ४.२१ लाखांची मदत *मुंबई/पाळधी/जळगांव प्रतिनिधी दि. 24 मार्च – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानीवृत्त अधिकारी व कर्मचारी संघटना, अमरावती यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ४ लाख २१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. हा धनादेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जलगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.* राज्यात अलीकडेच आलेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने ही रक्कम देण्यात आली असल्याचे संघटनेने पत्राद्वारे कळविले आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याचा हा प्रयत्न असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे. या प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील…

Read More