Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क : 8999349004 | 7020387330

*नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील* जागतिक महिला दिनानिमित्त, मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय विभागांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान *जळगाव दिनांक ८ मार्च : – आई, बहीण, पत्नी आणि मुलगी या चार शब्दांमध्ये स्त्रीचे संपूर्ण विश्व सामावलेले असून या चार नात्यांमुळेच कुटुंब उभे राहते, संस्कार रुजतात आणि समाजाचे भविष्य घडते. महाराष्ट्राची भूमी ही जिजाऊ, सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांसारख्या कर्तृत्ववान महिलांनी पावन केलेली आहे. या भूमीत स्त्री केवळ कुटुंबाचा आधारस्तंभ नाही, तर समाज परिवर्तनाची एक मोठी शक्ती आहे. आज प्रशासनातील विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत असून प्रत्येक ठिकाणी महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आणि कष्टाने स्वतःची कार्यक्षमता…

Read More

*महिलांच्या न्यायासाठी ‘भरोसा’चा आधार – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्र्यांचे हस्ते ‘भरोसा सेल व समुपदेशन केंद्र इमारतीचे’ भूमिपूजन *जळगाव प्रतिनिधी | दि. ८ मार्च :यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक वाद आणि पीडितांना तातडीची मदत मिळवून देण्यात भरोसा सेल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या केंद्रासाठी स्वतंत्र व आधुनिक इमारत उभारल्यामुळे नागरिकांना अधिक सक्षम, संवेदनशील आणि सुसज्ज सेवा देणे शक्य होईल. महिलांना न्याय आणि आधार देण्यासाठी प्रशासन नेहमीच तत्पर असून महिलांच्या न्यायासाठी ‘भरोसा’चा नेहमीच आधार राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.* महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक वाद आणि संकटात सापडलेल्या महिला-बालकांना तातडीची मदत व समुपदेशन मिळावे…

Read More

*लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील* सोनवद येथे ‘छ. शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ : पालकमंत्र्यांच्या हस्ते हजारो शासकीय सेवांचे प्रत्यक्ष वाटप *पाळधी / धरणगाव / जळगाव प्रतिनिधी, दि. ७ मार्च: शासनाचा खरा अर्थ म्हणजे लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे होय. एखाद्या शेतकऱ्याची जमीनविषयक अडचण दूर झाली, एखाद्या विद्यार्थ्याला आवश्यक दाखला मिळाला किंवा एखाद्या कुटुंबाला घरकुलाचा लाभ मिळाला, तर त्या लाभार्थ्याच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधानच या शिबिराचे खरे यश आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील सोनवद बु. येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’च्या प्रसंगी ते बोलत होते. या महसूल…

Read More

*गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील* जनता शासनाच्या दारी नाही… शासनच जनतेच्या दारी”; महाराजस्व समाधान शिबिरातून शेकडो नागरिकांना योजनांचा थेट लाभ *भोकर / आसोदा / जळगाव प्रतिनिधी दिनांक 7 मार्च : छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य उभे करताना “रयतेचा राजा म्हणजे रयतेची सेवा” हा विचार ठेवला होता. त्याच विचाराने शासन आज जनतेच्या दारी पोहोचत आहे. एखाद्या गरीब आईला तिच्या मुलासाठी दाखला मिळणे, एखाद्या शेतकऱ्याचा जमीन प्रश्न सुटणे किंवा एखाद्या कुटुंबाला घरकुल मिळणे… या आनंदातूनच शासनाच्या कार्याचे खरे समाधान मिळते. गोरगरिबांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा असून, सेवा करण्यासाठीच आपले जीवन आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. भोकर…

Read More

*ग्रामीण विकासाला बळ देणारा अर्थसंकल्प – पालकमंत्री गुलाबराव पाटील* *पाळधी/जळगाव प्रतिनिधी दिनांक 6 मार्च :* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, महिला व ग्रामीण विकासाला बळ मिळणार असल्याचे मत जळगाव जिल्ह्यचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. राज्याची अर्थव्यवस्था सध्या देशातील सर्वात गतिशील अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. ती 7.9 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्मार्ट शेती आणि सर्वसमावेशक विकासावर भर देत शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. या शिवाय महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शब्द दिला होता. तो आज पूर्ण केला आहे.…

Read More

*जीपीएस परिवार व मुक्ती फाउंडेशन तर्फे* *शामखेडा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न* दिनांक २८/०२/२०२६ सामाजिक बांधिलकीतून सेवाभावी संस्था जीपीएस परिवार व मुक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून धरणगाव तालुक्यातील श्यामखेडा या गावी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन युवा नेर्तृत्व प्रतापभाऊ गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर एल मल्टिपेशालिटी हॉस्पिटल ,जिल्हा सामान्य रुग्णालय नेत्र विभाग यांच्या सहकार्याने उत्साहात संपन्न झाले जवळपास एकशे पस्तीस पुरुष महिला नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला,या आरोग्य तपासणी ,औषधोपचार ,मार्गदर्शन शिबिरात हृदयरोग( हार्ट )रक्तदाब (बीपी ),मधुमेह( डायबेटिस ), ऑक्सिजन लेव्हल ,जनरल तपासणी ,मोतीबिंदू तपासणी आदि करण्यात आल्या. याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी,शिवसेना शाखा प्रमुख शिबिर आयोजक गणेश भिंगाणे…

Read More

*_भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पाळधी, ता. धरणगाव, जि‌. जळगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे शिवजयंती (तिथीप्रमाणे) उत्साहात साजरा…!_* भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय पाळधी, ता. धरणगाव, जि‌. जळगाव यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीप्रमाणे) उत्साहात साजरा करण्यात आली. यावेस संस्था अध्यक्ष मा. श्री. विक्रमराव पाटील, मा. श्री. प्रतापराव पाटील, संस्था समन्वयक मुख्याध्यापक मा. श्री. दत्तात्रय कंखरे, मा. प्राचार्य अजिंक्य जोशी व आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळेस प्रा. भूषण पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर सखोल व तथ्यात्मक मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकां कडूनही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत मनोगत व्यक्त करण्यात आले.…

Read More

“धरणगावचा जलसंकल्प : पाणी अडवा–पाणी जिरवा, शेती समृद्ध करा” *भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील* तालुक्यातील सुमारे २१० कि.मी. नाले व नदीपात्रांचे खोलीकरण आणि रुंदीकरण होणार; लोकसहभागातून उपक्रम *पाळधी / धरणगाव / जळगाव प्रतिनिधी, दि. १ मार्च : धरणगाव तालुक्यात वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळ आणि पुराच्या दुश्चक्रावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी ‘जलसंकल्प धरणगावचा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम महाराष्ट्र भूषण जेष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू करण्यात आला असून भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. नाला खोलीकरण म्हणजे शेतीच्या भविष्यासाठीचा विमा आहे. नाला खोलीकरणातून पाणी थांबते, पाणी जमिनीत मुरते आणि त्यामुळे विहिरी व बोअरवेल जिवंत राहतात.…

Read More

*खेळातून संघभावना, संस्कृतीतून संस्कार आणि आत्मविश्वासातून यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील* जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धांचा उत्साहात समारोप *जळगाव (प्रतिनिधी), दि. २८ फेब्रुवारी – स्पर्धेतून जिद्द निर्माण होते, जिद्दीतून आत्मविश्वास आणि आत्मविश्वासातूनच यश प्राप्त होते. जीवनात खेळ आणि स्वगुणांना खूप महत्त्व असते. प्रत्येकाच्या अंगी काही ना काही विशेष गुण असतात. स्वतःतील गुणांची ओळख करून त्या दिशेने मार्गक्रमण केल्यास यशाच्या शिखरावर पोहोचण्यास वेळ लागत नाही,” असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* जिल्हा परिषद अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पारितोषिक वितरण…

Read More

*खेळातून संघभावना, संस्कृतीतून संस्कार आणि आत्मविश्वासातून यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील* जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या क्रीडा-सांस्कृतिक स्पर्धांचा उत्साहात समारोप *जळगाव (प्रतिनिधी), दि. २८ फेब्रुवारी – स्पर्धेतून जिद्द निर्माण होते, जिद्दीतून आत्मविश्वास आणि आत्मविश्वासातूनच यश प्राप्त होते. जीवनात खेळ आणि स्वगुणांना खूप महत्त्व असते. प्रत्येकाच्या अंगी काही ना काही विशेष गुण असतात. स्वतःतील गुणांची ओळख करून त्या दिशेने मार्गक्रमण केल्यास यशाच्या शिखरावर पोहोचण्यास वेळ लागत नाही,” असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* जिल्हा परिषद अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पारितोषिक वितरण…

Read More