दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश *जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, परीक्षा प्रक्रिया कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी, यासाठी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि प्रामाणिकपणे परीक्षांना सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे.* दि. २५/११/२०२५ रोजी शिक्षणमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील मार्गदर्शनानुसार राज्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या संदेशात नमूद केले की, “विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण हा…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !* ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करण्याचे पालकमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन *पाळधी/जळगाव | प्रतिनिधी, दि. ८ फेब्रुवारी – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक कारणांमुळे व पर्याय निवडीतील चुकांमुळे काही पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुन्हा एकदा ई-केवायसी करून माहिती दुरुस्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली असून, यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला ठोस व स्पष्ट निर्देश दिले असून, जिल्ह्यातील…
*तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळावे – मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील* पाळधी येथे तरुण उद्योजकांसाठी भव्य मार्गदर्शन मेळावा संपन्न *पाळधी / जळगाव (प्रतिनिधी) दि. ५ फेब्रुवारी : तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळावे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मराठी माणूस हा नोकरी मागणारा नाही, तर नोकरी देणारा झाला पाहिजे, असे प्रेरणादायी प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाळधी येथील शासकीय विश्रामगृह येथे GPS मित्र परिवाराच्या वतीने भव्य रोजगार व उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उद्योग केंद्राचे…
*जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुढील वर्षासाठी ७५१ कोटी ७० लक्ष रुपयांच्या जिल्हा प्रारूप आराखड्यास मंजुरी !* पालकमंत्र्यांकडून चालू आर्थिक वर्षातील ₹८३४ कोटी ६२ लक्ष निधीच्या कामांचा घेतला आढावा जळगाव, प्रतिनिधी दि. २ फेब्रुवारी :- जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार अनिल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सन २०२६–२७ या पुढील आर्थिक वर्षासाठी ₹७५१ कोटी…
*“विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प”* पायाभूत सुविधा, शेती, उद्योग व महिला सक्षमीकरणावर ठोस भर – महाराष्ट्रालाही मोठा लाभ जळगाव प्रतिनिधी – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प हा विकसनशील भारताला विकसित भारताकडे नेणारा दिशादर्शक व संतुलित अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाचे नियोजनबद्ध रूप, उद्योग व उद्योजकतेला प्रोत्साहन, तसेच गुंतवणूक व रोजगार निर्मितीसाठी खंबीर आणि दीर्घकालीन उपाययोजना या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येतात. पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय हा देशाच्या आर्थिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे रस्ते, रेल्वे, दळणवळण, औद्योगिक वसाहती आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि…
पाळधी येथे जीपीएस मित्रपरिवार यांच्यामार्फत मोफत उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळावा जीपीएस मित्रपरिवार मार्फत नेहमी च सामाजिक उपक्रम राबविण्यात येत राहतात याच उपक्रमातील एक भाग म्हणून उद्योजक व व्यवसायिकांकरिता पाळधी येथे दि ०५/०२/२०२६ मोफत उद्योग व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेला आहे सदर मेळाव्यास जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी सीएमईजीपी व पीएमईजीपी या योजनेबद्दल माहिती देणार आहेत, तसेच बँकांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ इतर मागासवर्गीय महामंडळ तसेच अमृत योजनेबद्दल या मेळाव्यात सर्व शासकीय कर्ज योजनांची माहिती तसेच कर्ज देताना बँकेची भूमिका उद्योग व्यवसायाची निवड, जिल्हा उद्योग केंद्राकडून मिळणारे अनुदान,विविध महामंडळाच्या योजनांची माहिती या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात देण्यात येणार…
*आधुनिक शेतीकडे नव्या पिढीने वळने आवश्यक – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्र्यांचे हस्ते,खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शनाचे उद्घाटन कृषी, संस्कृती व ग्रामीण जीवनाचा संगम जळगावात *जळगाव, दि. 1 फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा) – नव्या पिढीने आधुनिक शेती विषयी नवनवीन माहिती घेऊन आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे तसेच शेतीमध्ये “ए आय “या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* खान्देशची समृद्ध कृषी परंपरा, लोकसंस्कृती आणि पशुधनाचा वारसा जपणाऱ्या ‘खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शन २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन आज राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे झाले त्यावेळी ते…
*अवकाळी पावसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीर – पालकमंत्री गुलाबराव पाटील* पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेतली परिस्थितीची पाहणी *जळगाव, दि. 31 जानेवारी (जिमाका) – जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून नियमानुसार मदत दिली जाईल. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या असून शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.* गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या…
पाळधी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली पाळधी (ता. धरणगाव) | प्रतिनिधी : पाळधी येथे जीपीएस मित्रपरिवाराच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली सभेस सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वपक्षीय ऐक्याचे दर्शन या सभेत घडले. श्रद्धांजली सभेप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा आणि कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेतला. कठोर शिस्त, निर्णयक्षम नेतृत्व, प्रशासनावर असलेली पकड आणि सामान्य जनतेसाठी झटणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांची ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या राजकीय जीवनातील काही आठवणी व किस्से सांगत…
*पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली* *जळगाव, दि. 30 : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.* यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील तसेच आमदार किशोर आप्पा पाटील उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी दिवंगत नेत्याच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात तसेच सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची…