*“गावागावात सुविधा, हाच आमचा अजेंडा” – पालकमंत्री गुलाबराव पाटील* जळगाव तालुक्यातील पाच गावांत कोट्यवधींच्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण ! *जळगाव प्रतिनिधी दि. १७ जानेवारी – विकास म्हणजे केवळ निधी मंजूर करणे नाही, तर तो प्रत्यक्ष गावाच्या रस्त्यांवर, शाळांच्या खोल्यांत, पाण्याच्या नळांत आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांपर्यंत दिसला पाहिजे. म्हणूनच योजना कागदावर न ठेवता जमिनीवर उतरवण्यावर आमचा ठाम भर असून ‘गावागावात सुविधा, हाच आमचा अजेंडा’ आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील विविध गावांतील विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पणप्रसंगी केले.* जळगाव तालुक्यातील गाढोदा, पडसोद, भोकर, किनोद व कठोरा या पाच गावांमध्ये एकाच दिवशी रस्ते, पाणीपुरवठा, शैक्षणिक…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील* श्यामखेडा, भोणे, बिलखेडा व जांभोरे येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न ! *पाळधी / धरणगाव / जळगाव, दि. १७ जानेवारी – ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या पायाभूत सुविधा, मूलभूत गरजांना प्राधान्य आणि सर्वसामान्यांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवणारा विकास हाच आपल्या कामाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील विविध गावांत कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण प्रसंगी केले.* ते पुढे म्हणाले की, “गावाचा सर्वांगीण विकास झाल्यावरच गावाची खरी ओळख निर्माण होते. ही ओळख भक्कम करण्यासाठी निधीची कधीही कमतरता भासू दिली…
*आधी मतदान मग सारे काम* शहरातील दिव्यांगांनी स्वयंस्फूर्त मतदान करून सुदृढांसमोर आदर्श निर्माण करावा…. डिस्ट्रिक्ट आयकॉन मुकुंद गोसावी जळगाव — मतदान सर्वात श्रेष्ठदान असून ते आपले प्रथम राष्ट्रीय कर्तव्यही आहे.आधी मतदान मग सारे काम या अनुषंगाने शहरातील सर्व दिव्यांग प्रवर्गात असलेल्यांनी आपल्या व्यंगाला न जुमानता मतदान कार्यात स्वयंस्फूर्त सहभाग घेऊन सुदृढ समाजासमोर आदर्श निर्माण करावा असे आवाहन मतदान जनजागृती कार्याचे डिस्ट्रिक्ट आयकॉन मुकुंद गोसावी यांनी दिव्यांग समस्या केंद्र येथील मतदान जनजागृती कार्यक्रमाप्रसंगी केले. घटनेने मतदार राजा म्हणून मतदारांना सर्वोच्च पदवी बहाल केली असून याची जाणीव ठेवून मतदानाचा टक्का वाढवावा.यावेळी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे केंद्रप्रमुख एस.पी.गणेशकर,संमिश्र केंद्राचे अक्षय महाजन,रमजान तडवी,विद्यार्थ आदी…
जिपीएस मित्र परिवाराच्या नेत्र शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद १४१० रुग्णांची नोंदणी; ५१० रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया पाळधी (ता. धरणगाव) | मा. ना. गुलाबराव पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून तसेच जि. प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नातून जिपीएस मित्र परिवारातर्फे भव्य नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा मोठा व अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सकाळी ७ वाजेपासून गावागावातून आबालवृद्ध नागरिकांनी नेत्र तपासणीसाठी गर्दी केली. शिबिरात एकूण १४१० रुग्णांची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी ५१० रुग्णांना पनवेल येथील सुप्रसिद्ध शंकरा नेत्र रुग्णालयात मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. शिबिरात सहभागी रुग्णांसाठी नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात…
भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मिडियम स्कुल आणि भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालय वडली यांच्या संयुक्त वार्षिक संमेलन आरंभ 2026 आयोजित नुकतेच झाले विद्यार्थ्यांचा कला गुण व सुजनशीलतेचा उसत्व रंगतदार तसेच उत्सहात सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ना.गुलाबरावजी पाटील साहेब पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वछता मंत्री महाराष्ट्र राज्य संस्थेचे सचिव श्री प्रतापराव पाटील.मा जिल्हा परिषद सदस्य आमचे मार्गदर्शक श्री विक्रमजी गुलाबरावजी पाटील श्री धनराज कासट केंद्रप्रमुख भोईसर तसेच संचालक पदाधिकारी यांना विशेष उपस्थिती व मार्गदर्शनाखाली कार्यक्रम साजरा करण्यात आला विध्यार्थीनी समाज प्रबोत्मक नाटिका अंधश्रद्धा निर्मूलन लुप्त होत असलेली लोककला छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक प्रसंग पोवाडा अशी विविध प्रकारचे…
असोदा गावातून नवीन वर्षानिमित्त स्वच्छतेचा संदेश, तुषार महाजन मित्र परिवारातर्फे नवीन वर्षाचे अनोखे स्वागत.. असोदा गावातील स्मशानभूमीत खूप सारा कचरा, धूळ आणि घाणीचे साम्राज्य होते, गावातील तुषार महाजन मित्र परिवारातर्फे नवीन वर्षाचे स्वागत स्मशानभूमी स्वच्छता करून करण्याचे ठरवले. त्यानुसार सकाळीच सर्व मित्र परिवार स्मशानभूमीत जमून पूर्ण स्मशानभूमी झाडून सर्व कचरा बाहेर फेकून स्मशानभूमीची ओटे देखील संपूर्ण स्वच्छ करण्यात आले. यानंतर स्मशानभूमी अत्यंत स्वच्छ आणि प्रसन्न दिसत होती. गावातून कर्मकांडा निमित्त आलेल्या नागरिकांनी तेथेच सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून अभिनंदन केले. गावातील ग्रामस्थांनी देखील या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. स्वच्छ भारत मिशन चा आदर्श ठेवून या मित्र परिवाराने स्वच्छतेचे काम हाती…
“स्पोर्ट्स फिस्टा 2025-26” उत्साहात साजरा. पाळधी येथील भाऊसाहेब गुलाब रावजी पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 2 दिवसीय स्पोर्ट्स फिस्टा चे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री विक्रम दादा पाटील ,संस्थेचे सचिव मा. श्री.प्रताप दादा पाटील आणि नूतन मराठा महाविद्यालयाचे मुख्य क्रीडा प्रशिक्षक श्री सुभाष वानखेडे सर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेच्या नर्सरी ते 9 वी पर्यंतच्या विविध खेळाडूंनी भाग घेतला. 100 मीटर धावणे, रिले रेस,गोळा फेक, थाळी फेक,बुद्धिबळ, टग ऑफ वॉर अश्या विविध खेळांची पहिल्या दिवशी संपूर्ण कॅम्पस दणाणून गेला. दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय खेळाडू वर्षा सोनवणे…
*मुक्ती फाउंडेशन तर्फे नववर्षाचे स्वागत* मतदान,रक्तदान,अवयवदान,अपघात टाळू वाहतूक नियम पाळू यासह नशामुक्त,व्याधिमुक्त,आनंदी जीवनाने *आरोग्य शिबिरासह गोसेवेचा अनेकांनी घेतला लाभ..* जळगाव –नववर्षाच्या स्वागता निमित्त पूर्वसंध्येला सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशन तर्फे दिनांक ३१ डिसेंबर २०२५ बुधवार रोजी विशेष उपक्रमाचे आयोजन पावन पुत्रदा एकादशीच्या मुहूर्तावर करण्यात आले होते . नववर्षाच्या सुरुवातीपासून आपण सारे मतदान कार्यात पूर्ण सहभाग देऊन चांगले उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रशासनासोबत कार्य करू,वर्षातून किमान चारवेळा रक्तदान करू,जिवंतपणी अवयवदान,मृत्यू पश्चात नेत्रदान, देहदान करू नावारूपास कायम राहू,अपघात टाळू — वाहतूक नियम पाळू यासह सोबतच दारू,गुटखा,तंबाखू, सुपारीजन्य पदार्थ टाळू व्यसनमुक्त,व्याधिमुक्त राहू आनंदी जीवन जगू या अनुषंगाने विशेष जनजागृती करण्यात आली . या प्रसंगी…
*पाळधी शहरातील क्रॉंकिटीकरणं रस्त्यांचे ते आठवडे बाजारामधील मुख्य रस्त्याचे काम पूर्ण* *वाहतुकीची कोंडी टळणार असल्याने नागरिकांना दिलासा* *पाळधीची विकासाकडे वाटचाल* *ना.गुलाबराव पाटील यांच्या निधीतून* पाळधी बु व पाळधी खु येथील मुख्य रस्ता म्हणजे पाळधी बाजार पेठ ते सावदा चौफुली व डॉ व्ही के चौधरी यांच्या दवाखान्यापासून ते शनिंनगर पर्यत हा मुख्य रस्ता ना गुलाबरावजी पाटील मार्गदर्शनाने व मा.जिल्हा परिषद सदस्य युवानेते प्रतापराव पाटील प्रयत्नांनी मुख्य रस्ते काँक्रीटीकरण पूर्ण करून रहदारी साठी मार्ग मोकळा करण्यात आले आहे या मध्ये पाळधी बाजर पेठ येथील काँक्रीटीकरण झाल्या मुळे सर्व प्रकारचे व्यापारिवर्गात आनंद उत्साव्हाचे वातावरण पसरले आहे यात प्रामुख्याने हे काँक्रीटीकरण चे कामे न…
योगेश पाटील (पिंटू शेठ) यांचा नशिराबाद नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकार *शिवसेना–भाजपा युतीच्या माध्यमातून नशिराबादचा विकास आदर्श ठरेल – पालकमंत्री गुलाबराव पाटील* नशिराबाद | जळगाव प्रतिनिधी, दि. 29 डिसेंबर – नशिराबाद नगरपरिषदेच्या राजकीय व प्रशासकीय वाटचालीत आज एक नवा आणि ऐतिहासिक अध्याय सुरू झाला. योगेश पाटील उर्फ पिंटू शेठ यांनी नशिराबाद नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार औपचारिकरित्या स्वीकारला. हा पदभार स्वीकार समारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “नगरपरिषदेचा कारभार लोकाभिमुख, पारदर्शक व सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन चालविला तर नशिराबादचा विकास निश्चितच आदर्श ठरेल. यापूर्वीही…