*ई-बसेस म्हणजे हरित प्रवासाची नवी ओळख – पालकमंत्री गुलाबराव पाटील* आरामदायी व परवडणाऱ्या बसेस जिल्हावासीयांच्या सेवेत पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह कार्यशाळा ते विमानतळापर्यंत केला ई बसने प्रवास *जळगाव प्रतिनिधी, दि. २७ सप्टेंबर – “जळगाव जिल्ह्यात दाखल झालेल्या ई-बसेस या पर्यावरण वाचविण्याचे नवे साधन आहेत. धूर व आवाज प्रदूषण कमी करून स्वच्छ हवा उपलब्ध करून देतील. इंधन बचतीमुळे प्रवासाचा खर्च कमी होईल आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात वातानुकूलित, आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे या ई-बसेस म्हणजे हरित प्रवासाची नवी ओळख आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.* महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या ७० ई-बसेसमधील पहिल्या टप्यातील १३…
Author: संपादक : प्रशांत झवर | आबा माळी
*महावितरण कंपनीच्या विविध योजनांची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत-पालकमंत्री गुलाबराव पाटील* *जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मंजूर असलेली महावितरण कंपनीची विविध योजनांची प्रलंबित कामे कालबद्ध कार्यक्रम तयार करून तात्काळ पूर्ण करावीत, असे निर्देश, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेत.* जिल्हाधिकारी कार्यालयातील, जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित महावितरण कंपनी, कृषी विभाग अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार अमोल जावळे आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल…
Gps मित्र परिवार आयोजित गरबा व दांडिया महोत्सव ला अतभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे रोज वेगेवगळे बक्षीशे ठेवण्यात आले असून यात फ्रीज, वाशिंग मशीन, पाण्याचे जार, खुर्ची , ट्रॉली बँग, पिको फॉल मशीन असे अजून बरेच बक्षीशे वाटप करण्यात येत आहेत यात रोज गरबा दांडिया ला हेजरी भरण्यात येत आहे रोज गरबा दांडिया ला जो येईल त्या युवक किव्हा युवतीला शेवटच्या दिवशी बक्षीशे देण्यात येणार असून रोज स्पर्धकांना ची निवड करण्या साठी बाहेरून परीक्षक मागवण्यात येत आहे यात जो बेस्ट डान्स, बेस्ट ड्रेस अश्या विविध स्पर्धा असून युवक युवतींना चे परीक्षक निर्णय घेऊन बक्षीशे देतात हे सर्व पारदर्शक असते या साठी…
*भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील वरिष्ठ महाविद्यालय पाळधी येथे स्वच्छता हीच सेवा -२०२५ मोहीमेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा…!* भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त विशेष मार्गदर्शन शिबिरामध्ये व्याख्यान सत्र व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा विभागीय समन्वयक, जळगाव प्रा. डॉ. दिनेश पाटील, संस्था अध्यक्ष मा. श्री. विक्रमराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. प्रतापराव पाटील, संस्था समन्वयक, व भाऊसो गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. दत्तात्रय कंखरे, मा. प्राचार्य…
गाव तेथे बौद्धविहार देणार मुकुंद नन्नवरे यांची माहिती, आमोदा बु. येथे शिवसेना मागासवर्गीय बैठकीत पाळधी | प्रतिनिधी जळगाव तालुका शिवसेना शिंदे गट मागासवर्गीय सेनेची बैठक रविवारी आमोदा बु. बौद्धविहारात झाली. जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत मागासवर्गीयांच्या विविध समस्या व अन्य विषयावर चर्चा झाली. यावेळी जळगाव तालुक्यातील प्रत्येक गावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून बौद्ध विहार उभारण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव ननन्वरे यांनी सांगितले. तालुक्यात लवकरच घरकुल, रेशनकार्ड, गरजूंना धान्य, जातीचे दाखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजने अंतर्गत विहिरींचा लाभ मिळवून देणे यासह अन्य विविध शासकीय योजनांचा लाभ गरजूं पर्यंत पोहचविण्यासाठी गटनिहाय शिबिर घेण्याचेही नियोजन यावेळी करण्यात…
*पाचोरा शहर व परिसरात,अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तात्काळ मदत देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील* आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची आपत्तीग्रस्तांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही *पाचोरा/जळगाव प्रतिनीधी दि.22 सप्टेंबर – पाचोरा शहर व परिसरातील, गावांमध्ये अतिवृष्टीमुळे, बाधित झालेल्या कुटुंबांना शासनातर्फे तात्काळ मदत दिली जाईल असा विश्वास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. या भागात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे,हिवरा नदीला आलेल्या पुरामुळे सकाळी शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नुकसान झालेल्या भागाची प्रत्यक्ष पाहणी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली, यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.* या पाहणी दरम्यान, पालकमंत्री यांच्या समवेत आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील यांनी प्रत्यक्ष…
शारदीय नवरात्री घटस्थापना च्या शुभमुहूर्तावर पाळधी बु येथे आज आराध्य दैवत आई भवानी माता मंदिर परिसरात सुशोभीकरण अंतर्गत काँक्रीटीकरण चे भूमिपूजन झाले असून तसेच नवीन पाण्याची टाकी खंडेराव मंदिर परिसरात काँक्रीटीकरण , आरोग्य केंद्र येथे महादेव मंदिर भूमिपूजन असे विविध भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते पार पडला असून या वेळी उपस्थित मध्ये मा.जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, मा.सभापती मुकुंदराव नन्नवरे , विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, लोकनियुक्त सरपंच विजू बापू पाटील, सचिनदादा पवार, अनिल भैय्या कासट , मा.सरपंच अरुण पाटील, श्रीकृष्ण नाना साळुंखे , सुरेश तोताराम पाटील, सुरेश पाटील दोनगावकर, प्रशांत झंवर , आबा…
एसटी महामंडळात १७ हजार जागांवर भरती, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय, पगार मिळणार… ST Corporation Recruitment : एसटी महामंडळात रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली आहे. १७ हजार ४५० जागांसाठी एसटी महामंडळात भरती होणार आहे. मुंबई : एसटी महामंडळाकडून महत्त्वाचा, मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडून १७ हजार ४५० कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या देण्यात येणार आहेत. यात चालक आणि सहाय्यक अशा पदांसाठी भरती होणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. एसटी महामंडळात रोजगाराची संधी एसटी महामंडळाच्या ३००व्या कंत्राटी बैठकीमध्ये राज्यासाठी हा महत्त्वाचा, मोठा निर्णय घेण्यात आला आहे.…
दिवाळी नंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहे यात नेते मंडळी कार्यकर्ते व हितचिंतक यांचा समावेश आहे पाळधी – चांदसर जिल्हा परिषद गटात मागील पंचवार्षिक चे सदस्य प्रतापराव पाटील भरघोस मतांनी निवडून आल्याने पाळधी जिल्हा परिषद गटात विविध विकास कामे मार्गी लागले मागील पंचवार्षिक ला जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील जनतेसमोर नवखे होते पण गेल्या 5 ते 7 वर्षात जिल्हा परिषद गट च नव्हे तर पूर्ण जळगाव ग्रामीण मध्ये त्यांचा वाढता जनसंपर्क रात्री आहोरात्री कार्यकर्ते यांच्या साठी सुख दुःखात जाणे जनसंपर्क ठेवणे व आपल्या प्रेमळ स्वभावाने तरुणाईला भुरड घातली आहे गेल्या विधानसभेला…
*पाझर तलावामुळे सिंचन, मत्स्यव्यवसाय व ग्रामविकासाला मिळणार चालना – पालकमंत्री गुलाबराव पाटील* वसंतवाडी (जळके तांडा) पाझर तलाव जलपूजनाने भरला विकासाचा नवा विश्वास *जळगाव प्रतिनिधी दि. २० सप्टेंबर – पाझर तलावामुळे मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. याशिवाय विहिरींच्या पाण्याची पातळी लक्षणीय वाढली असून उन्हाळ्यात देखील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. याचा थेट फायदा शेतकरी आणि ग्रामस्थांना होईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिपादन केले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वसंतवाडी (जळके तांडा) पाझर तलावातील जलपूजन शनिवारी करण्यात आले.* *मागील वर्षी मंजूर निधी, यंदा शंभर टक्के भरला तलाव* मागील वर्षी या तलावाच्या दुरुस्तीकरिता मंत्री…